स्वर्ग आणि नरक तुमची निवड

सद्गुरुंचा संदेश
स्वर्ग आणि नरक तुमची निवड

जेव्हा माणूस मरतो, तो आपले शरीर टाकतो, आणि सोबत आपली सदसदविवेकबुद्धी सुद्धा. पण मनाचा स्मृतींचा हिस्सा मात्र तसाच कार्यरत राहतो. आणि या शाबूत स्मृती मनोवृत्ती म्हणून कार्यरत असतात. या स्थितीत मृत व्यक्तीला निवड करणे शक्य नाही कारण त्याने आपली सद्सद्विवेकबुद्धी गमावली आहे. आता असे निवड स्वातंत्र्य नसल्यामुळे, जर त्याचा स्मृती कोश दुःख आणि क्लेशांनी भरलेला असेल, तर हे दुःख लाखो पटींनी वाढू शकते.

उदाहरणार्थ, याक्षणी जर तुम्ही रागावलात, तर तुम्ही तुमची सदसदविवेकबुद्धी वापरून राग नियंत्रणात ठेवू शकता. पण जर ही सदसदविवेकबुद्धी जर तुमच्याजवळ नसती तर हा राग उफाळून उद्वेग बनला असता. म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, मग त्या क्षणापर्यंत जे काही त्यांच्या मनात साठलेलं असो, मृत्यूची ती शेवटची घटका अत्यंत महत्त्वाची असते कारण जर आयुष्यभर त्यांची मनोदशा सामान्यतः आनंदी असेल तर मृत्यू पश्चात तीच स्थिती अनेक पटीने वाढते. आणि मनोदशा सामान्यतः क्लेशदायक स्थितीत असेल तर ते सुद्धा कित्येक पटीने वाढू शकते.

जर एक व्यक्ती अत्यंत क्लेशकारक दशेत असेल तर आपण म्हणतो ही व्यक्ती नरकात गेली आहे. जर ती अत्यंत आनंदावस्थेत पोहचली असेल तर आपण म्हणतो ती स्वर्गात गेली आहे. स्वर्ग आणि नरक ही काही भौगोलिक ठिकाणं नाहीयेत. ह्या अनुभवाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत विशेषकरून मृत्यूनंतर.

योग परंपरेत एक सुंदर कथा आहे. एक चौर्‍यांशी वर्षाचा योगी होता आणि त्याच्या आसपास असलेल्या सर्वांना तो सांगत सुटला, तुम्हाला माहीत आहे मी मरणार आहे आणि लवकरच मी स्वर्गात जाणार. इतर योग्यांनी त्याला थांबवून विचारलं, तुम्हाला कसं माहित तुम्ही स्वर्गात जाणार? देवाच्या मनात काय चाललंय तुम्हाला माहीत आहे का? योगी म्हणाला, देवाच्या मनात काय चाललंय त्याच्याशी मला काय करायचंय. माझ्या मनात मात्र काय चाललंय मला माहीत आहे.

एक योगी, द्रष्टा, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरु हे भारतातील पहिल्या 50 अतिशय प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सदगुरूंना भारत सरकारतर्फे 2017 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com