कृपा आणि भक्ती

सद्गुरुंचा संदेश
कृपा आणि भक्ती

तुम्ही जर स्वत:कडे एक यंत्र म्हणून पाहिले, तर तुमच्याकडे मेंदू आहे, शरीर आहे, तुमच्याकडे सर्व काही आहे. आणि ज्याला तुम्ही कृपा म्हणता ते म्हणजे वंगण आहे. तुमच्याकडे वंगणविरहित एक उत्तम इंजिन आहे, पण तुम्ही प्रत्येक गोष्टीत अडकून पडता. यासारखे असंख्य लोक पृथ्वीवर आहेत. ते हुशार आहेत, ते सक्षम आहेत, परंतु कृपेचं वंगण नसल्यामुळे त्यांच्या जीवनातील प्रत्येक पावलावर ते अडकुन पडतात. कृपा म्हणून जे काही मानले जाते ते काही लोकांचे जीवन व्यापून टाकत आहे असे दिसते आणि इतर सर्वांसाठी प्रत्येक गोष्ट एक संघर्षच आहे असे दिसून येते.

जेणेकरुन जीवनाची प्रक्रिया कृपाशील होईल, म्हणून ही कृपा प्राप्त करून घेण्यासाठीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भक्ती. पण मन खूप धूर्त आहे; ते कोणालाही किंवा कशासाठीही स्वत:ला झोकून देऊ शकत नाही. आपण भक्तीची गाणी गाऊ शकता, परंतु त्यात तुमची स्वतःची काही गणिते असतात, सर्व ठीक आहे, परंतु देवाने माझ्यासाठी काय केले? मोजमाप करणारी मने श्रद्धाळू असू शकत नाहीत. श्रद्धाळू बनण्याचा प्रयत्न करणे म्हणजे केवळ वेळ आणि आयुष्याचा अपव्यय होईल. मी तथाकथित भक्तीगीते आणि संगीत कितीही ऐकतो. ते खूप व्यावहारिक हिशेब आहे. त्यामध्ये भक्ती नाही.

भक्त हा कोणा एकाचा भक्त नसतो; भक्ती हा एक गुण आहे. भक्ती म्हणजे विशिष्ट तल्लिनता. तुम्ही सतत एका गोष्टीकडे लक्ष देता. एकदा एखादी व्यक्ती अशी झाली, तिचे विचार, भावना आणि सर्व काही एकाच दिशेने होऊ लागले की आता त्या व्यक्तीस नैसर्गिकरित्या कृपा प्राप्त होईल; तो ग्रहणशील होतो. तुम्ही कोणाची भक्ती करता, तुम्ही कोणाचे भक्त आहात हा मुद्दाच नाही. नाही, मला भक्त व्हायचे आहे, पण देव अस्तित्वात आहे की नाही याची मला शंका आहे. हे सर्व मनातल्या विचारांचे खेळ आहेत. तुम्हाला हे माहिती असणे आवश्यक आहे, की देव अस्तित्वात नाही. परंतु जेथे भक्त आहे तेथे देव अस्तित्त्वात आहे.

भक्तीची शक्ती अशी आहे की ती निर्मात्याची निर्मिती करू शकते. आपण भक्ती म्हणून ज्याचा संदर्भ घेतो त्याची खोली अशी आहे की देव अस्तित्वात नसला तरी तो अस्तित्वात आणू शकतो. भावनिक अनुभव म्हणून भक्ती जाणून घेणे ही एक गोष्ट झाली. भक्तीला जीवनाचा अत्युत्तम परिमाण समजणे ही वेगळी गोष्ट आहे. फक्त भावना म्हणून भक्ती जाणून घेणे कदाचित तुमचे आयुष्य थोडे गोड करते; परंतु भक्ती तुमचे जीवन गोड बनविण्याच्या उद्देशाने नाही; तर तुम्ही जसे आहात त्या मार्गाने तुम्हाला पूर्णपणे नष्ट करणे हा भक्तीचा हेतू आहे. फक्त थोडं चांगलं बनणं, हा भक्तीचा हेतू नाही; भक्ती म्हणजे विरून जाणे. भक्ती या शब्दाचा मूळ शब्द म्हणजे विरघळणे. जो स्वतःला विलीन करण्यास तयार आहे तोच खरा भक्त होऊ शकतो.

Related Stories

No stories found.