सृष्टीकर्ते व्हा

सद्गुरुंचा संदेश
सृष्टीकर्ते व्हा

आयुष्य आपल्याला जर आपल्या इच्छेप्रमाणे जायला हवे असेल तर पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला खरेच काय हवे आहे. याबद्दल विचारांची स्पष्टता असणे. आपल्याला जर काय हवे आहे तेच माहीत नसेल तर हवे तसे निर्माण करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण असा विचार करतो, हीच ती गोष्ट! ही एक गोष्ट जर मला मिळाली तर माझे आयुष्य छान होईल.

तुम्हाला ती गोष्ट मिळते आणि तुम्हाला जाणवते की - ही ती नाही. आणि मग तुम्ही अजून एका गोष्टीच्या मागे लागता, ती मिळाल्यावर मग अजून एका. हे चक्र चालूच रहाते. आपल्याला खरेच काय हवे आहे, प्रत्येक माणसाला खरेच काय हवे आहे, ह्याचा विचार केला तर समजते की आपल्याला आनंदाने आणि शांतीपूर्ण आयुष्य जगायचे असते, आणि नात्यांचा विचार करता माणसाला प्रेमळ आणि जिव्हाळ्याचे नाते हवे असते. किंवा दुसर्‍या शब्दात सांगायचं झालं तर, प्रत्येक जण फक्त सुख शोधत असतो - स्वतःमध्ये आणि आजूबाजूला.

जेव्हा शरीर सुखावह होते तेव्हा आपण त्याला आरोग्य आणि आनंद म्हणतो. जेव्हा मन सुखावह होते तेव्हा आपण त्याला शांती आणि आनंद म्हणतो. जेव्हा आपल्या भावनां सुखावह होतात तेव्हा आपण त्याला प्रेम आणि करुणा म्हणतो. जेव्हा आपल्या आंतरिक उर्जा सुखावह होतात तेव्हा आपण त्याला हर्ष आणि परमानंद म्हणतो. आपल्याला जर आपल्यामध्ये एक आनंदी व्यक्ति आणि सभोताली प्रेमळ आणि शांतीपूर्ण वातावरण निर्माण करायचे असेल तर असे जग निर्माण करण्याची वेळ आता आली आहे आणि त्या कामात आता आपण स्वतःला झोकून द्यायला हवे.

या करता आपण स्वतःला फक्त आनंदी, प्रेमळ आणि समाधानी असणे इतकेच गरजेचे आहे. ङ्गआज मी जिथे कुठे जाईन, तिथे शांत, प्रेमळ आणि आनंदी जग निर्माण करेन या सुस्पष्ट विचाराने रोज दिवसाची सुरुवात करायला पाहिजे. आपण दिवसातून 100 वेळा जरी अडखळलो तरी आपल्याला 100 धडे शिकायला मिळतात. एका ध्येयाप्रती वाहून घेतलेल्या माणसाला अपयश असे काही असत नाही. आपल्याला हवे आहे ते निर्माण करण्यासाठी आपण स्वतःला वाहून घेतले तर आपले मन संघटीत होते.

मनाची तयारी झाली की आपल्या भावना संघटीत होतात. आपण ज्या प्रकारे विचार करतो त्या प्रमाणे आपल्या भावना निर्माण होत असतात. एकदा का आपले विचार आणि भावना संघटीत झाल्या की आपली ऊर्जा पण त्याच दिशेने संघटीत होते. आपल्या भावना, विचार आणि ऊर्जा संघटीत झाल्या की आपले शरीर संघटीत होते. या चारी गोष्टी एका दिशेने संघटीत झाल्या की आपल्याला हवे ते निर्माण करण्याची आणि ते प्रत्यक्षात घडवून आणण्याची आपली क्षमता अभूतपूर्व असते. आपण अनेक अर्थांनी सृष्टीकर्ते असतो.

Related Stories

No stories found.