नेते जन्माला येतात की घडवले जातात?

सद्गुरुंचा संदेश
नेते जन्माला येतात की घडवले जातात?

नेते नेहमीच घडवले जातात. तुम्ही स्वत:ला जन्मापूर्वी घडवले आहे की जन्मानंतर, ते केव्हा घडतं याने काहीच फरक पडत नाही, परंतु नेते नेहमी घडवले जातात. पण विषय फक्त इतकाच आहे की विशिष्ट व्यक्तीकडे त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल एक विशिष्ट आकर्षण आणि शैली असू शकते ज्यामुळे त्याला जरा अधिक सहजतेने नेतृत्व करण्यात मदत होते.

पण जे लोक फक्त त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आकर्षणाच्या जोरावर नेतृत्व करतात ते लोकांवर अनर्थ ओढवू शकतात. आकर्षण हे तुमच्यासाठी तसेच इतरांनासुद्धा खूप मादक असू शकतं. आणि तुम्ही त्यांना अनर्थाच्या दिशेने नेऊ शकता. अनेक नेते जे त्यांच्या मागे मोठ्या संख्येने लोकं जमा करू शकले ते जगासाठी विनाशकारी ठरले. त्यांनी लोकांना लढाया आणि विनाशकारी परिस्थितीत ढकललं कारण त्यांनी केवळ व्यक्तिगत आकर्षणातून नेतृत्व केले.

आम्हाला असे लोक हवेत जे शहाणपणाने नेतृत्व करतात. नेता नेहमीच आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेला असणे गरजेचे नाही. तुम्ही पाहाल की ज्या गोष्टी मानवासाठी खरोखर महत्त्वाच्या आहेत, त्या आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेल्या व्यक्तींनीच केल्या आहेत असं नाही. त्या गोष्टी समजूतदार लोकं करत आहेत; ज्यांना काय करावे आणि काय करू नये हे माहीत आहे. तुम्ही कुणीही असा, सध्या काहीही असा, या गोष्टी तुम्ही निर्माण केल्या आहेत. प्रश्न केवळ हा आहे की एकतर तुम्ही स्वतःला जाणीवपूर्वक घडविले आहे किंवा नकळतपणे. तुम्ही अजाणतेणे स्वत:ला घडवलं आहे म्हणून तुम्ही गोंधळून गेलेले आहात - कधी हा गोंधळ यशस्वी होतो तर कधी अयशस्वी. तुम्ही कुठल्याही मार्गाने घडवले गेले असाल, जर तुम्ही स्वत: ला अजाणतेपणी घडवलं आहे, तर तुम्ही इतरांच्या दृष्टीनेच यशस्वी आहात. तुमच्या स्वत:च्या जीवनाच्या अनुभवानुसार तुम्ही यशस्वी असणार नाही. तुम्ही जर स्वतःला जाणीवपूर्वकरित्या घडवले असेल तरच तुम्ही तुमच्या स्वतःच्या दृष्टीने यशस्वी आहात. आणि हे खूप महत्वाचे आहे की तुम्ही तुमच्या स्वत: च्या दृष्टीकोनातून यशस्वी होणे; इतरांच्या तुलनेत नाही.

नेत्याचे केवळ समुहावरच नव्हे तर आपल्या अंतरंगावर सुद्धा त्याचे प्रभुत्व असले पाहिजे. जर तो स्वत: बद्दल काही करीत नसेल तर इतरांशी तो काय करतो ते केवळ योगायोगानेच घडेल आणि कोणत्याही क्षणी तो संपूर्ण डोलारा कोलमडेल. नेतृत्त्वाचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांच्या जमावावर बसायला हवं. नेतृत्व म्हणजे तुमच्या आत तुम्ही अव्वलस्थानी आहात. तुमच्या क्षमतेनुसार, जेव्हा तुमच्या क्षमता पूर्णपणे अभिव्यक्त होतात, तेव्हा गोष्टी घडून येतील. जिथं कौशल्य, क्षमतांचा प्रश्न आहे, तेव्हा माणसांना कशासाठीही प्रशिक्षित केले जाऊ शकते. हे खरंय की, काही लोकांमध्ये उपजत काही प्रतिभा असू शकतात, परंतु तुमच्याकडे जरी नैसर्गिक प्रतिभा असल्या तरी त्या देखील तुम्हीच निर्माण केल्या आहेत, परंतु अजाणतेपणी. जर तुम्ही स्वत: ला एक सजग नेता घडवलं, तुम्ही सुसंगत आणि समजूतदारपणाने कार्य कराल जे एक आकर्षक व्यक्तिमत्वावर अवलंबून राहण्यापेक्षा खूपच चांगले आहे.

Related Stories

No stories found.