दूरदृष्टीयुक्त जीवन

सद्गुरुंचा संदेश
दूरदृष्टीयुक्त जीवन

विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आपल्याला उपलब्ध असणार्‍या सर्व सोयी सुविधा असूनसुद्धा, मानवता अजूनही गोंधळलेल्या स्थितीतच दिसते, पूर्णतः गोंधळलेली. जगातील बहुतांश लोक त्यांचे आयुष्य त्यांना स्वतःच्या आयुष्यात काय हवे आहे हे जाणून न घेताच जगतात. आणि जरी काय हवे आहे हे त्यांना माहिती असेल, तरीसुद्धा ते निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारी इच्छा किंवा दूरदृष्टी त्यांच्याकडे नसते. बहुतेक वेळा ते त्यांना सहज सोप्या वाटणार्‍या किंवा त्यांच्या आवाक्यात असणार्‍या गोष्टींचा स्वीकार; त्यांच्या आयुष्यात खरोखरच त्यांची आवश्यकता आहे की नाही हे पाहताच करतात.

एखाद्या मनुष्याकडे त्याने आयुष्यात स्वतःसाठी आणि भोवतालच्या जगासाठी काय करायला हवे हे पाहण्याची दूरदृष्टी असेल, तर ते निर्माण करणे त्याच्या क्षमतेच्या पलीकडे नाही. ते कदाचित ह्या जन्मात घडेल, किंवा कदाचित आणखी एक-दोन जन्म लागतील पण आपल्याला जे हवे आहे ते नक्की मिळेल. कारण त्या व्यक्तीची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी स्पष्ट आहे आणि आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी त्याचीच ओढ लागलेली असते, त्याच्यासाठी आयुष्यातल्या सर्वोच्च गोष्टी त्याच्या पायापाशी लोळण घेतील. पण माणूस बहुतेक वेळा गोंधळलेल्या मनस्थितीतच असतो आणि त्याला नको असणार्‍या गोष्टींच्या मागे धडपडत असतो.

तुम्हाला जे सर्वोच्च वाटते, केवळ त्याचा शोध घ्या. ते घडणार आहे की नाही याने काही फरक पडत नाही, पण फक्त अशी दूरदृष्टी ठेऊन आयुष्य जगणे ही सुद्धा एक अतिशय उन्नत, मुक्त करणारी आणि आनंददायी प्रक्रिया आहे. ती गोष्ट उद्या घडणार आहे का शंभर वर्षांनी हा मुद्दा नाही. शेवटी याचा निकाल काय लागेल याची तुम्ही चिंता करत नाही. मुद्दा केवळ इतकाच आहे की तुमच्याकडे दूरदृष्टी आहे आणि तुम्ही तुमचे जीवन त्यासाठी वाहून घेतले आहे. परमोच्च प्राप्तीचा सुद्धा हा सर्वात सोप्या मार्गांपाइकी हा एक मार्ग आहे. संपूर्ण गीता हेच सांगते आहे - तुम्हाला हे हवं आहे. त्याप्रती तुमचं जीवन समर्पित करणे, शेवटी ते साध्य होतं की नाही याची चिंता करू नका. याप्रकारे जीवन जगणे हीच खुद्द एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे.

दूरदृष्टी ठेवून आयुष्याची वाटचाल करणे हा आपल्यामधील आणि बाह्य जगातील सीमित मर्यादांच्या पल्याड जाण्यासाठी एक महत्वाचा मार्ग आहे. तुम्हाला काय हवे आहे हे तुमच्या मनात पूर्णपणे स्पष्ट असेल आणि तुम्ही त्यावर वाटचाल करू लागलात, की जे आज अशक्य वाटते, ते उद्या तुमच्या आयुष्याची एक सहज घडणारी प्रक्रिया बनेल. कुठल्याच अडी-अडचणी शिवाय ते तुमच्या पायाशी लोळण घेईल. पण प्रत्येक क्षणी, तुम्ही जर तर्कशुद्ध प्रश्न विचारत बसलात, की हे साध्य होईल की असाध्य आहे? तर मग तुम्ही तुमच्या मनात निर्माण केलेला हा गोंधळ आणि सोबत भोवतालच्या जगात निर्माण केलेल्या या गोंधळामुळे, अवघं जगच गोंधळात पडतं. म्हणून आपल्याला खरोखरच ज्याबद्दल आस्था, जिव्हाळा आहे याबद्दल स्वतःमध्ये दूरदृष्टी निर्माण करण्याची वेळ आता आली आहे.

एक योगी, द्रष्टा, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सदगुरु हे भारतातील पहिल्या 50 अतिशय प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सदगुरूंना भारत सरकारतर्फे 2017 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित क रण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.