Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधलोक टीका का करतात ?

लोक टीका का करतात ?

एखादी गोष्ट स्विकारणे आणि काही नवीन निर्माण करण्यापेक्षा टीका करणे आणि नाकारणे नेहेमीच अधिक हुशारीचे भासण्याचा कल निर्माण झालेला आहे.

विरोधक नेहेमीच अधिक हुशार वाटतात कारण ते केवळ टीकाच करतात, ते इतर काहीही करत नसतात. काहीतरी निर्माण करणार्‍या व्यक्ती बुद्धिमान भासत नाहीत कारण जेव्हा तुम्ही काही निर्माण करत असता, तेव्हा तुम्ही अनेक चुका करत असता.

- Advertisement -

काही गोष्टी बरोबर होतात, काही चुकीच्या होतात. केवळ बसून टीका करणारी व्यक्ती अचानक खूप बुद्धिमान वाटू लागते, पण त्यांच्यापैकी फारच थोड्या व्यक्ती खरोखरच काहीतरी निर्माण करीत असतात.

अशा लोकांनी टीका केली तर काही हरकत नाही, पण काही व्यक्ती निर्लज्जपणे प्रत्येक गोष्टीवर टीका करत राहतात कारण कोणतीही गोष्ट नष्ट करणे हे काहीतरी निर्माण करण्यापेक्षा नेहेमीच अधिक शक्तीशाली वाटते. जर मी तुमची देखभाल करून तुम्हाला वाढवलं तर त्यात नाट्यमय असं काही नाही.

पण मी जर दहा जणांसमोर तुम्हाला खाली लोळवले तर ते नक्कीच नाट्यमय दिसेल. म्हणून चित्रपटांमध्ये एखाद्याला लोळवणे हे नेहेमीच नाट्यमय करून दाखवले जाते. कोणालातरी खाली लोळविल्याशिवाय चित्रपट बनूच शकत नाही कारण तसे करणे नाट्यमय आणि परिणामकारक असते. टीका करण्याबद्दल सुद्धा असेच आहे. टीका करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गोष्टीला खाली लोळवण्यासारखेच आहे.

सकारात्मक दृष्टीकोनापेक्षा एखाद्याने घेतलेला नकारात्मक दृष्टीकोनच अधिक हुशारीचा भासतो. त्यामागे काहीतरी कारणमीमांसा असते, पण ते एक अपरिपक्व कारण असते. जेव्हा तुमची कारणमीमांसा अपरिपक्व असते, तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट नाकारू शकता.

जेव्हा तुमची कारणमीमांसा परिपक्व होते, तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करायला शिकता कारण तुम्हाला जीवनाची प्रक्रिया समजते. तुम्ही केवळ तार्कीकदृष्ट्या विचार करत नाही, तर अस्तित्वाच्या विवेकाच्या आधाराने विचार करता. तुमच्यामध्ये केवळ तार्किक जाणच नव्हे, तर जीवनाचीही अधिक जाण आलेली असते.

(जागतिक पातळीवर नावाजलेले द्रष्टे योगी, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरु हे भारतातील पहिल्या 50 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत.सद्गुरूंना भारत सरकारने 2017 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविले आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या