Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधयोग धर्माच्या पलीकडचे तंत्रज्ञान

योग धर्माच्या पलीकडचे तंत्रज्ञान

तुम्ही कोणत्या धर्माचे पालन करता याचा तुमच्या योग तंत्र प्रणालीचा वापर करण्याच्या क्षमतेशी काहीही संबंध नाही, कारण योग हे एक तंत्रज्ञान आहे.

हे तंत्रज्ञान, तुम्ही कशावर विश्वास ठेवता, आणि कशावर नाही, यात फरक करत नाही. तुमचा कशावर विश्वास आहे किंवा नाहीये ही केवळ एक मानसिक प्रक्रिया आहे – त्याचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा काहीही संबंध नाही. गुरुत्वाकर्षण जितके ख्रिस्ती आहे, तितकाच योग हिंदू आहे.

- Advertisement -

केवळ आयझ्याक न्यूटन, जो ख्रिस्ती संस्कृतीत राहत होता, त्याने गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडला म्हणून गुरुत्वाकर्षण ख्रिस्ती बनते का? त्याचप्रमाणे योग सुद्धा एक तंत्रज्ञान आहे. जे कुणी त्याचा वापर करून घेण्यास इच्छुक आहेत, ते त्याचा वापर करून घेऊन शकतात. योगात एक विशिष्ठ धर्माचा अंश आहे हा विचार करणे सुद्धा मूर्खपणाचे आहे.

काही अडाणी लोक योगशास्त्राला हिंदू असा शिक्कामोर्तब करण्याचे कारण म्हणजे हे शास्त्र, या तंत्रज्ञानाचा शोध आणि वाढ या संस्कृतीत झाली. आणि ही संस्कृती एक बोली स्वरूपाची असल्यामुळे साहजिकच त्यांनी हे शास्त्र या देशाच्या संस्कृतिक सामर्थ्यावर उभारलं, आणि या भूमीवर बोलीभाषेतून लोकांसमोर आणले, जो हिंदू पद्धतीने जीवन जगण्याचा मार्ग होता.

हिंदू या शब्दाची उत्पत्ती सिंधु या शब्दापासून झालेली आहे, जी एक नदी आहे. ही संस्कृती सिंधु, किंवा इंडस नदीच्या काठावर वाढली असल्याने, या संस्कृतीचे नाव हिंदू असे पडले. आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे – हिंदू म्हणजे कुठलीही तत्व प्रणाली नाही; तो एक धर्म सुद्धा नाही.

तुम्ही कुठल्याही पुरुष देवतेची पुजा करून हिंदू असू शकताफ तुम्ही कुठल्याही स्त्री देवतेची पुजा करून हिंदू असू शकता; तुम्ही गाईची पुजा करून हिंदू असू शकता; तुम्ही कुणाचीही पुजा करण्याचे सोडून दिले तरीही तुम्ही हिंदू असू शकता. यामध्ये कोणत्याही विशिष्ट श्रद्धा प्रणालीवर विश्वास ठेवावा लागत नाही. तुमच्यासाठी जे सर्वोत्तम आहे, ते तुम्ही करू शकता आणि तरीसुद्धा तुम्ही हिंदू म्हणून असू शकता कारण ती एक भौगोलिक आणि सांस्कृतिक ओळख आहे, धार्मिक ओळख नाही.

म्हणूनच, योगाचे शास्त्र आणि तंत्रज्ञान या संस्कृतीत वाढल्याने आणि समृद्ध झाल्याने, साहजिकच काही मार्गानी ते हिंदू जीवन पद्धतीशी जोडले गेले आहे. योगशास्त्राला जोडलेला सांस्कृतिक रंग दूर करणे, आणि योग एक शुद्ध शास्त्र, एक तंत्रज्ञान म्हणून जगासमोर प्रस्तुत करणे, जेणेकरून याचा फायद सर्वांना मिळू शकतो, हीच माझ्या कार्याची मूलभूत प्रक्रिया आहे.

(जागतिक पातळीवर नावाजलेले द्रष्टे योगी, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरु हे भारतातील पहिल्या 50 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत.सद्गुरूंना भारत सरकारने 2017 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविले आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या