Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधसचिनच्या पंजातील कौशल्य!

सचिनच्या पंजातील कौशल्य!

सचिन तेंडुलकर हे नाव माहित नाही, असा क्रीडारसिक शोधून सापडणार नाही. सचिनचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईतील दादर येथे झाला. वडील रमेश तेंडुलकर हे एक सुप्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि कवी आणि त्यांची आई रजनी यांनी विमा उद्योगात कार्यरत होत्या. त्यांचा टेनिसमध्येही रस होता. लहानपणी ते टेनिसपटू मॅकेन्रोचे चाहते होते. त्यांच्या खोडकर प्रवृत्तींला आळा घालण्यासाठी मोठा अजित तेंडुलकर यांनी 1984 मध्ये सचिन यांची क्रिकेटशी ओळख करून दिली. रमाकांत आचरेकर त्यांचे क्रिकेट खेळातील गुरू. शिवाजी पार्कवर सकाळी आणि संध्याकाळी आचरेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन अनेक तास नेटवर गोलंदाजीचा सराव करायचे. त्याकाळी गोलंदाज होण्याचे स्वप्न होते. पुढे मात्र महान फलंदाज झाले. या वाटचालीत त्यांच्या यशाला हाताच्या पंजातील कौशल्य, निर्धार व चिकाटीचे हस्तसामुद्रीकदृष्ट्या विश्लेषण करणार आहोत.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

1987 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी सचिन वेगवान गोलंदाज म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी चेन्नई येथील एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये सहभागी झाला. परंतू ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक वेगवान गोलंदाज डेनिस लिली गोलंदाजीवर प्रभावित नव्हते. फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना त्यांनी केली. 11 डिसेंबर 1988 रोजी 15 वर्षे 232 दिवस वय असलेल्या सचिनने वानखेडे स्टेडियमवर गुजरात विरुद्धच्या सामन्यात मुंबई (तत्कालीन बॉम्बे) संघाकडून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यात नाबाद 100 धावा केल्या. पदार्पणात शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय असा सन्मान या खेळीमुळे मिळाला. वानखेडे स्टेडियमच्या क्रिकेट सराव नेटमध्ये भारतीय संघ सरावासाठी आला होता. त्यावेळी भारताचे सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज कपिल देव यांनी सचिनचा खेळ पाहिल्यानंतर प्रशंसा केली. तात्कालिक मुंबईचे कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी सचिन याची संघात खेळण्यासाठी निवड केली.

- Advertisement -

त्यानंतर देवधर आणि दुलीप ट्रॉफीमध्ये सचिनने शतक झळकावले. 1998 मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध खेळताना त्याचे पहिले द्विशतक (204) मुंबईसाठी होते. देशांतर्गत तिन्ही प्रथम श्रेणी स्पर्धांमध्ये (रणजी, इराणी आणि दुलीप ट्रॉफी) पदार्पणात शतक झळकावणारा तो एकमेव खेळाडू आहे. सचिन मुंबईकडून 5 रणजी ट्रॉफी फायनल खेळला, ज्यात मुंबईने 4 जिंकले. 16 व्या वर्षी नोव्हेंबर 1989 मध्ये कराची येथे पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले. भारताकडून कसोटीसोबत वनडेमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. सचिनने टिट्वेंटी क्रिकेटही गाजवले. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत तो मुंबई इंडियन्सकडून खेळला. 2013 मध्ये कसोटीसोबत प्रथमश्रेणी क्रिकेटमधून सचिन निवृत्त झाला. मात्र त्याआधी अनेक विक्रम आपल्या नावावर करून ठेवले आहेत.

दैदिप्यमान यशात हातांच्या पंजातील कौशल्य!

एक काळ असा होता कि सचिनशिवाय भारतीय क्रिकेटची कल्पना होत नव्हती. अशा कीर्तीसाठी नशीबाची साथ लागते. हातावर आर्थिक भरभराट, प्रसिद्धी व शारीरिक तंदरुस्ती आवश्यक असते. हातामधील कला कौशल्य, निर्धार व त्याच्यासाठी घेतलेली मेहनत यामुळेच नशिब फळाला येत. सचिनच्या हाताच्या पंजात कौशल्य, निर्धार व चिकाटी आहे. हातावरील रेषा सामान्य आहेत. मात्र हाताचा पंजा असामान्य गुणांचा आहे. सचिन फलंदाजी उजव्या हाताने करत असले तरी ते डावखुरे आहेत. त्यासाठी आधी डाव्या हाताचे कारकत्व बघूया.

सचिन यांच्या डाव्या हाताचा पंज्या- हस्तसामुद्रिकशास्त्रात ज्या बोटाखाली जो ग्रह आहे, त्या ग्रहाच्या नावाने ते बोट ओळखले जाते. पहिले बोट गुरु, दुसरे शनी, तिसरे रवि व चौथे करंगळीच्या बुध ग्रहाचे म्हणून ओळखले जाते. अंगठा हा स्वतंत्र आहे. या अंगठ्याच्या सानिध्यात खालचा मंगळ व शुक्र ग्रहाचा प्रभाव पाहावयास मिळतो. सचिन यांच्या हातावरील ग्रह उंचवट्याचा उभार अत्यंत शुभदायी आहे. बोटांची ठेवण हातामधील कौशल्य दाखवीत आहे. गुरुचे बोट जाड व स्वतंत्र आहे. या बोटांमुळे आयुष्यात काहीतरी करण्याची उर्मी मिळाली आहे. शनी व रवीची बोटे एकत्र एकमेकांजेवळ आहेत. या दोन बोटांच्या ग्रहांमुळे शनी ग्रहाची चिकाटी, स्थिरता व चिकीत्सा दिली आहे. रवीचे बोट गुरु बोटापेक्षा लांब आहे. त्यामुळे मान सन्मान तर मिळालाच शिवाय प्रत्येक सन्मानानंतर किंवा प्रत्येक विक्रमानंतर शनीच्या अधिपत्याखाली असणारी एकाग्रता व चिकाटी ढळली नाही.

उजवा हात- हस्तसामुद्रिकशास्त्र फक्त रेखाशास्त्र नव्हे. रेषा सुख दुःखाचा कालनिर्णय दाखवितात. ज्या ग्रहावर आहे, त्या ग्रहाचे कारकत्व त्या रेषेला लाभते. परंतु ग्रह व हाताचा आकार यामध्ये बोटे महत्वाची भूमिका निभावतात. विविध प्रकारचे असंख्य कलाकौश्यल्यांचे हात व बोटे व संपूर्ण हातांची निर्मिती ही ब्रह्माकडून होत असते. बोटांची पेरे फुगीर आहेत. निमुळती नाहीत. हस्तसामुद्रिकशास्त्रानुसार मनुष्याचे संवेदनांचे ग्रहण पहिल्या प्रथम बोटांकडून होते व नंतर मेंदू, डोळे व कान यांच्या सहाय्याने संवेदनांचे पृथ्थकरण होते. टोकदार बोटे असले की संवेदना विना विचार करता अंतर मनात ग्रहण केल्या जातात. बोटाची टोके बोथट किंवा त्यावर गोलाई आकाराची असली कि संवेदनांचा प्रवेश विचारपूर्वक होत असतो.

उपजत गुण-जसे संशोधक ते विविध कलेत नैपुण्य, अनेक विषयातील कल्पना विस्तार व नवनिर्मिती, गायन, वादन ते अभिनय, नृत्य, नेतृत्व गुण ,क्रीडा, व्यापार, शेयर मार्केट, विश्लेषण व चिकित्सा, अध्यात्म, साहित्य, कवी, लेखक अशा हजारो प्रकारचे नैपुण्य ही ब्रह्माची देणगी मानली जाते. या उपजत देणगीमध्ये त्या त्या गुणांच्या शुभ ग्रहांचा प्रभाव व्यक्तीमध्ये आढळतो. सर्वात महत्वाचे म्हणजे हातावरची बोटे व त्यावरील प्रत्यक्ष पेर्‍यांचे विविध विषयातील नैपुण्या त्या व्यक्तीत पहावयास मिळते. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना हातावरील बोटे हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. नुसत्या बोटांच्या आकारावरून, त्या बोटात असलेल्या सांध्यावरून व्यक्तिमत्वाची ठळक ओळख होते. एखादे बोट जास्त वाकडे असेल किंवा खूप जाड किंवा बारीक असेल तर त्या बोटाखालील ग्रहांच्या शुभ अशुभ गुणधर्मात बदल होतो.

अंगठा-हातावर अंगठ्याला स्वतंत्र स्थान आहे व तो बोट म्हणून ओळखला जात नाही तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात निर्णय क्षमतेसाठी अंगठ्याच्या आकारावरून, लांबीवरून अंगठ्यात कमी जास्त कारकत्वात वसलेले असते. व्यक्ती कोणत्याही ग्रहाच्या प्रभावाखाली असली तरी अंगठ्यात त्या ग्रहाच्या कारकत्वाची साधक बाधक निर्णय क्षमता सम्मिलीत असते. अंगठ्यावर वरचा मंगळ ग्रह व शुक्र ग्रहाचा अंमल असतो व त्या व्यक्तीच्या निर्णय क्षमतेत या दोन ग्रहांचा प्रभाव पाहावयास मिळतो. वैवाहिक सौख्याचा कारक शुक्र ग्रह आहे व जलद निर्णय क्षमता व आक्रमकता वरच्या मंगळ ग्रहात आहे. सचिन यांचा डाव्या हाताचा अंगठा मजबूत आहे. अंगठ्यावर तीन पेरे आहेत. पहिले पेर मोठे आहे. त्यामुळे त्यांच्या क्रिकेटच्या खेळातील विविध नैपुण्यासाठी सविस्तर विचार मंथन होऊ शकते. अंगठ्याचे दुसरे पेर प्रमाणात व स्वच्छ आहे. त्यावर आडव्या रेषा नाहीत. अंगठ्याचे दुसरे पेर उत्तम असता व्यक्ती ठरवलेले काम निर्धारित वेळेच्या आधी करते. थोडक्यात ठरवलेल्या कामाची अमंलबजावणी विनाआळस लगेचच करते त्यात दिरंगाई होत नाही. हाच गुण सचिन यांना त्यांच्या जीवनात त्यांच्या बॅटिंगची शैली विकसित करण्यात कामाला आला.

करंगळी – हस्तसामुद्रिकशास्त्रात हाताच्या आकाराला महत्व आहे. त्यात बोटांच्या लांबीला किंवा छोटे बुटके बोट असेल तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात बदल दिसून येतात. सचिन यांचे वक्तृत्व ओघवते नाही. ते बोलताना अडखळतात. कारण सचिन यांच्या हातावरील करंगळी बुटकी आहे. करंगळीच्या खाली बुध ग्रह आहे. करंगळीला बुध ग्रहाचे कारकत्व लाभलेले असता वाकचातुर्य व वक्तृत्व लाभते. सचिन यांची करंगळी हाताच्या इतर बोटांच्या प्रमाणात छोटी असल्याने बुध ग्रहात न्यूनता आली आहे. सचिन यांच्या दोन्ही हाताच्या पंज्यांची बोटांची ठेवणं एकसारखी आहे. हातावरील रेषा अति शुभदायी नसल्या तरी त्या रेषेत अशुभत्व नाही. उजव्या हातावरील भाग्य रेषा वय वर्ष 16 पासूनच शुभ आहे. त्यामुळे सचिन यांना वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच आर्थिक लाभ मिळण्यास सुरवात झाली. दोन्ही हातावरच्या मुख्य रेषा शुभत्व घेऊन आल्या आहेत. त्यावर आडव्या रेषां नाहीत. दोन्ही हातावरील चंद्र ग्रह शुभ आहे व उभार घेतलेला आहे. त्यामुळे स्वप्नरंजन नाही. मस्तक रेषासुध्दा चंद्र ग्रहावर उतरल्या नाहीत.

मस्तक रेषा व आयुष्य रेषा एकत्र उगम पावत असून वयाच्या 25 वर्षापर्यंत एकत्र आहेत. अशी स्थिती असता व्यक्ती मोठ्यांच्या सल्ल्यानुसार वागत असते व वयाच्या 25 नंतर स्वतंत्र निर्णय घेण्यात समर्थ असतो. सचिन यांच्या हाताच्या व बोटांच्या आकाराची वैशिठ्ये असामान्य आहेत. त्यामुळेच त्यांच्या हाताचा पंजा व त्यातील कौशल्य अद्वितीय आहे. सचिन यांच्या दैदिप्यमान यशात हातांच्या पंजातील जादुई कौशल्य अद्भुत आहे. हाताने करावयाच्या कामात कौशल्य प्राप्त करण्यासाठी अंगठा मजबूत व ताकदवान लागतो. अंगठा मजबूत असेल तर व्यक्तीच्या अंगी निर्धार असतो आणि जे ठरवले ते करूनच दाखवितात. सचिन यांच्या यशात हातांच्या पंजातील कौशल्यामुळे त्यांची खास शैली विकसित झाली व त्यांना क्रिकेटच्या इतिहासात दैदिप्यमान कर्तृत्व गाजविता आले.

8888747274

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

- Advertisment -

ताज्या बातम्या