आजचे राशी भविष्य 10 नोव्हेंबर 2020 Today's Horoscope

राशी भविष्य
राशी भविष्य

मेष -

प्रवासास तुमची प्रकृती चांगली नाही म्हणून लांबचे प्रवास टाळा.

आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांशी जवळिक साधून काम करा, आयुष्यातील चढ-उतार त्यांच्याशी शेअर करा. आपला हा बदललेला स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल. सहकार्‍यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल. दिवस उत्तम आहे आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडल्यामुळे तुमच्यावरील तणाव वाढेल.

वृषभ -

तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे तुमच्या अवतीभवतीच्या लोकांवर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. मित्रमंडळी मदतीसाठी तत्पर असतील आणि आपणास खरा आधार देतील. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील. मात्र कोणालाही शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होत नाही ना, तसेच इतर लोक आपल्या उदार आणि स्नेहपूर्वक वागण्याचा गैरफायदा घेत नाहीत ना हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे.

मिथून -

आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. आजच्या दिवशी तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. कार्यालयीन कामकाजात गुंतून राहिल्यामुळे जोडीदाराशी तुमचे संबंध तणावाचे बनतील. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाबद्दल आज कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान केला जाईल. आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल परंतु, या कामात तुम्ही इतके व्यतीत होऊ शकतात की, तुमचे गरजेचे काम ही सुटून जातील.

कर्क -

तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील. त्यामुळे तुमच्यां कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. तरुणाईचा सहभाग असणार्‍या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. स्त्री सहकारी तुमचे नवे काम पूर्ण करण्याकामी मदत करतील. या राशीतील मुले खेळण्यात दिवस घालवू शकतात माता-पिताला त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे दुखापत होण्याची शक्यता आहे.

सिंह -

कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याची तब्येत तुमच्या तणावाचे कारण ठरू शकते. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत. या राशीतील जे लोक रचनात्मक कार्याने जोडलेले आहे आज त्यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्हाला वाटू शकते की, रचनात्मक करण्यापेक्षा उत्तम नोकरी करणे होते. या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यात समस्या येऊ शकतात. आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांमुळे खराब करू शकतात. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल.

कन्या -

विजयोत्सव साजरा केल्याने तुम्हाला अतीव आनंद मिळेल. मित्रमंडळींसमवेत हा आनंद साजरा करा. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी इतर आउटडोअर उपक्रमांकडे असणार्‍या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या भांडण आजच सोडवा. उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा, नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. जे लोक बर्‍याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो.

तूळ -

काही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. परंतु तुम्ही भांबावून न जाता आणि त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. कामाच्या ठिकाणचे आणि घरातील ताणतणाव तुम्हाल शीघ्रकोपी बनवतील. कार्य क्षेत्रात कुठल्या कामात खराबी असण्यामुळे तुम्ही आज चिंतीत राहू शकतात आणि या बाबतीत विचार करून आपला किमती वेळ खराब करू शकतात.

वृश्चिक -

आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. तुमच्या ओळखीचे कुणतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल, त्यामुळे अवघडल्यासारखे वाटेल. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठावठिकाणा ठेवणार नाहीत. सातत्याने विविध गोष्टींवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढून त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण पडेल.

धनु -

उत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रण ठेवा आणि दुराग्रही स्वभावावर नियंत्रण ठेवा. खासकरून पार्टीमध्ये त्यामुळे एखाद्याचा मूड खराब होईल. आजच्या दिवशी मादक पदार्थांचे सेवन करू नका. नशेमध्ये तुम्ही काही किमती वस्तू हरवू शकतात. जुने संबंध, ओळखी आणि मित्रांची मदत होईल. अतिशय गरजेच्या वेळी चपळाईने कृती करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुमचे कौतुक होईल. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमच्या जोडादाराने दिलेल्या सरप्राइझमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल.

मकर -

चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. आज कुठल्या पार्टीमध्ये तुमची भेट अश्या व्यक्ती सोबत होऊ शकते जे आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्वाचा सल्ला देऊ शकतो. इतरांच्या कामात नाक खूपसणे आज टाळले तर बरे. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत. नवे प्रस्ताव आकर्षक वाटतील, पण उतावीळपणे कोणताही निर्णय घेणे शहाणपणाचे ठरणार नाही. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार्‍या लोकांसोबत जाण्यास विरोध करा. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल.

कुंभ -

प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. ज्या व्यापार्‍यांचे संबंध परदेशात आहे त्यांना आज धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून, आज विचारपूर्वक निर्णय घ्या. भरपूर आनंदाचा दिवस, जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षिसही मिळेल. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून वाचनात पूर्ण वेळ घालवाल. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात तुमचं किती महत्त्व आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

मीन -

आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. आज तुम्हाला धन संबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे परंतु, तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीला ही नफ्यामध्ये बदलू शकतात. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस अस्वस्थतेत जाईल. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्यके शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com