आजचे राशी भविष्य 26 नोव्हेंबर 2021 Today's Horoscope

आजचे राशी भविष्य 26 नोव्हेंबर 2021 Today's Horoscope
Horoscope

मेष -

नैराश्याच्या जाणीवेला हावी होऊन देऊ नका. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल.

वृषभ -

सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. खाजगी आयुष्याबरोबरच कोणत्यातरी सामाजिक धर्मादाय कामात स्वत:ला गुंतवा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. पण ते काम करताना खाजगी आयुष्याला धक्का लागणार नाही हे देखील पाहावे लागेल. दोन्ही पातळ्यांवर समान लक्ष असणे गरजेचे आहे. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुमचा रिकामा वेळ आज मोबाइल आणि टीव्ही पाहण्यात खर्च होऊ शकतो.

मिथून-

निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल. कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या. परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. कुटुंब-मुले आणि मित्रमंडळी यांच्यासमवेत वेळ घालवल्याने तुमच्या मनाला पुन्हा एकदा उभारी मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर, कधी एकटे राहून तथापि, एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही तरी ही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी खास खरेदी करेल.

कर्क -

तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैश्याची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकतात आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्व ही देऊ शकतात. कर्मकांडे घरच्या घरीच करणे हिताचे ठरेल. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा, नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. घरात हरवलेली कुठलीही वस्तू आज तुम्हाला मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला आपल्या बालपणाची आठवण येऊ शकते आणि तुम्ही उदास राहून आपला वेळ एकटा घालवू शकतात.

सिंह -

तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बर्‍याच दिवस याच कामात असाल तर, आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. मुलांच्या बक्षिस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरु शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल.

कन्या -

तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बर्‍याच दिवस याच कामात असाल तर, आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. मुलांच्या बक्षिस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरु शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल.

तूळ -

स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. आजचा दिवस जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा. क्वचित भेटीगाठी होणार्‍या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. जवळच्या व्यक्तींपासून दूर गेलात तर कुणीतरी खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. संधी येण्याची, काहीतरी घडण्याची वाट पाहत बसू नका, त्याऐवजी स्वत:हून नव्या संधींचा शोध घ्या. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस.

वृश्चिक -

मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. नातेवाईंकाच्या घरी जाऊन एखाद-दोन दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम, विश्रांती मिळेल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होईल.

धनू -

क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. तुमच्या माता पक्षाने धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. काही लोक तुमच्यासाठी गंभीर परिस्थिती निर्माण करतील परंतु तुम्ही त्यांच्याकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही, तुमचे हृदय धडधडेल. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा.

मकर -

शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. लहान मुले तुम्हाला व्यस्त ठेवतील आणि तुम्हाला आनंदही देतील. आपण केलेल्या कामाचे श्रेय दुसर्‍या कोणालाही घेऊ देऊ नका.

कुंभ -

आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले असते. तुमचा शेजारी उधार मागण्यास येऊ शकतो. धन देण्यापूर्वी त्याची विश्वसनीयता जाणून घ्या अथवा धनहानी होऊ शकते. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल तर असेलच पण आपल्यासाठी खूपच मनोरंजक ठरेल. लोकांच्या भाऊगर्दीमध्ये तुम्ही नशीबवान आहात हे तुम्हाला कळून चुकेल कारण तुमचा/तुमची जोडीदार उत्तम आहे.

मीन -

संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. आज तुमचे भाऊ बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतात आणि त्यांच्या मदतीने तुम्ही स्वतः आर्थिक दबावात येऊ शकतात तथापि, स्थिती लवकरच सुधारेल. पुन्हा एकदा आनंदी सोनेरी दिवस येण्यासाठी आपल्या रम्य आठवणीचा आधार घ्या. तुमच्या योजना आहे तशा राबविण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल, त्यात खूप अडचणी येतील. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बर्‍याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरतात परंतु, आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com