आजचे राशी भविष्य 20 नोव्हेंबर 2020 Today's Horoscope

आजचे राशी भविष्य 20 नोव्हेंबर 2020 Today's Horoscope

मेष -

भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करीत बसू नका. आज तुम्हाला भावूकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. आपले धन संचय करण्यासाठी आज आपल्या घरातील लोकांसोबत तुम्हाला बोलण्याची आवश्यकता आहे. त्यांचा सल्ला तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत करेल. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे. म्हणून मिळणार्‍या सर्व संधींचे सोने करा. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल.

वृषभ -

तेलकट आणि तिखट आहार टाळा. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा. मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. तुमचे व्यक्तित्व असे आहे की, जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतीत होऊन जातात आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करतात. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल.

मिथून -

कलात्मक काम मनाला विरंगुळा मिळवून देईल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. आपल्या मुलांबरोबरचे आपले नातेसंबध निकोप असू द्यात. भूतकाळ बाजूला सारून उज्ज्वल आणि आनंदी भविष्याकडे लक्ष असू द्या. तुमच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळेल. कामाचा डोंगर असला मित्रमंडळींमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील. मात्र कोणालाही शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होत नाही ना, तसेच इतर लोक आपल्या उदार आणि स्नेहपूर्वक वागण्याचा गैरफायदा घेत नाहीत ना हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल.

कर्क -

आपल्या मित्रांबरोबरील अथवा कुटुंबियांबरोबरील रम्य सहली तुम्हाला आराम मिळवून देतील. आज आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढा. रात्री ऑफिस मधून घरी येण्याच्या वेळी आज सावधानतेने वाहन चालवा अथवा दुर्घटना होऊ शकते आणि बर्‍याच दिवसांपर्यंत तुम्ही आजारी राहू शकतात.

सिंह -

आज शांततेत असाल पण अचानक मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा. कामच्या ठिकाणी ज्याचे तुमच्याशी फार जुळत नव्हते आज त्या व्यक्तीशी तुमचा सुसंवाद होईल. संद्याकाळच्या वेळी तुम्ही कुठल्या जवळच्या व्यक्तीच्या घरी वेळ घालवण्यास जाऊ शकतात परंतु, या वेळात तुम्हाला त्यांची कुठली गोष्ट वाईट वाटू शकते आणि तुम्ही ठरवलेल्या वेळेच्या आधी परत येऊ शकतात.

कन्या -

शारिरीक व्याधीपासून मुक्तता मिळण्याची शक्यता आहे. कुणी जुना मित्र आज तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतो आणि जर तुम्ही त्यांची आर्थिक मदत केली तर, तुमची आर्थिक स्थिती थोडी तंग होऊ शकते. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुम्हाला तीव्र दु:ख देईल. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या. आपल्या घरातील वस्तू आवरण्याचा आज तुम्ही प्लॅन कराल परंतु, तुम्हाला यासाठी आज रिकामा वेळ मिळणार नाही.

तूळ -

अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. कौटुंबिक जबाबदार्‍या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. तुमची मेहनत आणि चिकाटीने काम करण्याची जिद्द याचा फायदा होईल आणि त्यामुळे विश्वास आणि पाठिंबा मिळेल. रिकामा वेळ आज व्यर्थ वादामुळे खराब होऊ शकतो ज्यामुळे दिवसाच्या शेवटी तुम्हाला खिन्नता होईल.

वृश्चिक -

अधिक कोलेस्टेरॉल असलेला आहार करणे टाळा. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांशी जवळिक साधून काम करा, आयुष्यातील चढ-उतार त्यांच्याशी शेअर करा. आपला हा बदललेला स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजुबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. आपल्या वाटेत येणार्‍या सर्वांशी अत्यंत नम्र, सौम्य आणि आकर्षकपणे वागा.

धनु -

मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. जर तुम्ही आपल्या घरातील व्यक्तीकडून काही उधार घेतले असेल तर, आज त्यांना ते परत करा अथवा तुमच्या विरुद्ध ते त कार्यवाही करू शकतात. तुम्ही इतरांच्या चुका विनाकारण दाखविल्यामुळे नातेवाईक तुमच्यावर टीका करतील. अशाप्रकारे वेळ दवडला जातो याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. यातून तुम्हाला काहीच फायदा होत नाही. त्यापेक्षा तुमच्या सवयी बदला. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे. प्रेमाचा वर्षाव करा.

मकर -

मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. कुटुंबातील लोकांसोबत आपली समस्या व्यक्त करण्यात तुम्हाला हलके वाटेल परंतु, बर्‍याच वेळा तुम्ही आपल्या अहंकाराला पुढे ठेऊन घरातील लोकांना गरजेच्या गोष्टी सांगत नाही. तुम्ही असे करू नका असे करण्याने चिंता अधिक वाढेल कमी होणार नाही. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. गरजेच्या कामाला वेळ न देणे आणि व्यर्थ कामात वेळ घालवणे आज तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते.

कुंभ -

आरोग्य एकदम चोख असेल. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. आजच्या दिवशी आपल्या कुंटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करणे ही तुमची प्राथमिकता असेल. व्यावसायिक प्रश्न विनासायास सोडविण्यासाठी तुमचे कौशल्य वापरा. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. आज तुमच्या कष्टाचे चीज होईल. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात.

मीन -

मतभिन्नता आणि दडपण यामुळे तुम्ही चिडचिडे आणि बैचेन व्हाल. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. कामाच्या ताणतणावांचे ढग तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दूर राहून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. असे करणे तुमच्या हिताचे ही असेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com