त्वरित निष्कर्ष काढणे

त्वरित निष्कर्ष काढणे
संत राजिंदर सिंह जी महाराजSant Rajinder Singh ji Maharaj

आपले जीवन जगत असताना अनेकदा आपली अशी सवय बनते की, आपण इतरांविषयी चुकीच्या धारणा बनवून घेतो. आपण कोणाचीही परिस्थिती किंवा जीवनातील हालहवाल जाणून न घेता त्यांची आलोचना करतो आणि त्यांच्याविषयी त्वरित मत पक्के करतो. अशावेळी आपण असा विचार करित नाही की, आपण सुद्धा चुकीचे असू शकतो. इतर लोक असे वर्तन का करीत आहे हे न जाणताच आपण त्वरित निष्कर्षाप्रत पोहोचतो.

एखादी व्यक्ती आपली मदत करण्याचा किंवा काही बाबींना चांगले करण्याचा प्रयत्न करते, तरीसुद्धा आपण धीर ठेवून हे जाणण्याचा प्रयत्न करीत नाही की, ती व्यक्ती हे सर्व का करीत आहे? आणि आपण त्यांना फटकारतो. आपल्या कामा दरम्यान आपणास कोणाची निंदा करण्यापूर्वी किंवा मत पक्के करण्यापूर्वी दोनदा विचार करण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत आपल्याला पूर्ण बाब माहित नसते की, एखादी व्यक्ती कोणत्या हेतूने अथवा कोणत्या कारणाने काही करीत आहे तेव्हा अशावेळी योग्य हेच होईल की काही मिनिटे थांबून आपण त्यांना त्यासंबंधी विचारूया. बर्‍याचदा आपल्याला असेही आढळते की, एखादी व्यक्ती मदत करण्याचा प्रयत्न करते परंतु आपण आपल्या जीवनात इतके व्यस्त होतो की याविषयी काही जाणून घेण्यासाठी आपण वेळच काढत नाही.

जेव्हा कोणी एखाद्याची आलोचना करतो तेव्हा इतरही त्यामध्ये सामील होतात. त्यांना कोणत्याही स्थितीची काहीच माहिती नसते आणि तरीसुद्धा घाईने काही लोक चुकीची गोष्ट पसरवितात.

समस्येचे त्वरित निराकरण करणे चांगले आहे, परिस्थितीला आणखी जास्त बिघडण्यापूर्वी आपण परिस्थितीला समजून तिला ठीक केले पाहिजे. आपण इतरांचे मूल्यांकन करण्यापासून स्वतःला वाचवले पाहिजे. जर आपण इतरांची आलोचना करण्यात फसलो तर, आपले मन भ्रामक विचारांनी भारून जाते. जे विचार आपणास आंतरिक शांति पासून दूर घेऊन जातात. आपण जे काही करतो ते आपल्यापर्यंत पुन्हा परत येते. आपले विचार, आपले बोल आणि कृती यांची फळं मग ती चांगली असो अथवा वाईट, त्यांना आपल्याला भोगावेच लागते. जेव्हा आपण एखाद्या ची निंदा करतो तेव्हा आपल्याला त्याचे फळ अवश्य भोगावे लागते कारण की, आपण शब्दांद्वारे त्यांना यातना पोहोचवलेल्या असतात.

आपल्या मनाच्या शांति करितां आणि शांत मनाने ध्यान-अभ्यास करण्यासाठी आपण एखाद्याविषयी चुकीची धारणा बनवणे आणि त्वरित निर्णय घेणे ही सवय स्वतःला जडवून घेणे फायदेशीर होईल. याऐवजी आपण प्रेमळ आणि स्नेही बनू आणि सत्यता जाणण्याचा प्रयत्न करावा. आपले असे वर्तन आपल्या अंतरीय शातीमध्ये आपणास योगदान देईल आणि हीच शांती आपल्या सभोवतालच्या वातावरणात आणि पूर्ण विश्वात पसरली जाईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com