आर्थिक आवक वाढेल

त्रैमासिक भविष्य - कन्या
आर्थिक आवक वाढेल

सौ. वंदना अनिल दिवाणे

फेब्रुवारी-2023

महिन्याच्या सुरुवातीला राशी धनस्थानी केतू, चतुर्थात बुध, पंचमात रवि-प्लुटो, षष्टात शुक्र-शनि-नेपच्यून, सप्तमात गुरू, अष्टमात राहू-हर्षल, नवमात मंगळ अशी ग्रहस्थितीे आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे टो,पा,पी,पु, णा,ठा,पे,पो अशी आहेत. राशीचे चिन्ह एका हातात धान्याची लोंबी व दुसर्‍या हातात अग्नी घेऊन नौकेत बसलेली स्त्री आहे. राशी स्वामी-बुध, राशी तत्त्व पृथ्वी असल्याने स्वभाव सहनशील आहे. द्विस्वभावी राशी असल्याने निर्णय घेण्यास वेळ लागतो. लवकर निर्णय घेतला तरी कृतीस उशीर लागेल. दक्षिण दिशा फायद्याची आहे. लिंग स्त्री असल्यामुळे स्वभाव थोडासा सौम्य, लाजाळू व धीटही आहे. वातप्रकृती. राशीचा अंमल पोटावर असल्याने पोटाच्या विकाराची काळजी घ्या. शुभ रंग-हीरवा, शुभ रत्न-पाचू, शुभ अंक-4, शुभ दिन- बुधवार, रविवार. शत्रू राशी- कर्क,

पंचमात प्लुटो आहे. नाना साधनांनी सुखप्राप्ती करण्याची धडपड करण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल. बुद्धीचे ज्ञानग्रहण सामर्थ्य उत्तम राहील. सतत उत्साह असल्यामुळे कार्यक्षमता उत्तम रारहील. हातात घेतलेल्या कामात विजय मिळेल. रात्र वैर्‍याची आहे. विद्याव्यासंग वाढेल. नोकरीपासून सुख मिळेल.

स्त्रियांसाठी - षष्ठतील शुक्र नोकरी करू इच्छिणार्‍या तरुणींना तशी संधी उपलब्ध करून देईल. सप्तमातील गुरूमुळे जोडीदाराशी चांगले पटेल.सहनशीलता उत्तम राहील.

विद्यार्थ्यांसाठी -पंचमात प्लुटो आहे. विद्यार्थ्यांचे ज्ञान ग्रहण सामर्थ्य चांगले राहील. उत्साह टिकून राहील. त्यामुळे अभ्यासात मनाला एकाग्र करणे शक्य होईल. प्रगतीकारक काळ आहे.

शुभ तारखा -3, 4, 6, 7, 8, 10, 11, 14, 17, 22, 24, 25, 28

मार्च - 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीच्या धनस्थानी केतू , पंचमात - प्लुटो,षष्ठात रवि-बुध-शनि, सप्तमात गुरू- शुक्र-नेपच्यून, अष्टमात राहू - हर्षल, नवमात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

नवमात मंगळ आहे. स्वभाव काहीसा उतावळा राहील. .पत्नीच्या नातेवाईकांकडून मदतीची विचारणा केली जाईल. मंगळ-शुक्र शुभ योगामुळे उत्साह टिकून राहील. कलाकौशल्यात प्रगती होईल. विवाहोत्सुकांचे विवाह जुळतील.

सप्तमस्थानी गुरू आहे. थोर लोकांची संगत प्राप्त होईल. उत्तम स्थळी प्रवास घडेल. लबाडांना वश करून घ्याल. कोर्ट कचेर्‍यांच्या कामात यश मिळेल. स्वतःच्या सामर्थ्याबद्दल गर्व वाटेल. गर्वाविषयी संयम ठेवणे आवश्यक आहे. विद्वान लोकांत मान मिळेल. पिता व गुरूंबद्दल आदर ठेवा. त्यांच्या आशिर्वादाने भविष्यात जीवन उत्कर्षाकडे वाटचाल करू शकाल. उत्तम स्थळी प्रवास घडेल. लोकांचा सहवास प्राप्त होईल.

स्त्रियांसाठी - नातेवाईक व शेजार्‍यांशी संबंध चांगले राहिल्यामुळे महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी होईल. गायनवादनादी कलात प्रगती होईल. कोणतेही काम नीटनेटकेपणाने केल्यामुळे मानसिक समाधान मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी -तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा - 1, 4, 5, 8, 9, 11, 16, 18, 22, 23, 27, 28, 29, 30, 3े1

एप्रिल -2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी केतू, पंचमात प्लुटो, षष्ठात शनी, सप्तमात गुरू-रवि-बुध- नेपच्यून, अष्टमात शुक्र-राहू-हर्शल, दशमात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

सप्तमस्थानी बुध आहे. विवाहोत्सुकांचे विवाह सहज जुळतील. भावी पत्नी सुविद्य असेल. व्यापार्‍यांना चांगले भागीदार मिळतील. त्यामुळे आर्थिक आवक वाढेल. कला कोशल्यात प्रगती होईल. विनोदप्रियतेमुळे घरात व घराबाहेर तणाव रहाणार नाही.

षष्ठस्थानी शनी आहे. शत्रुवर सहज मात कराल. थोर लोकांशी मैत्री होईल. देश व स्वधर्म याबद्दल फार आदर वाटेल. हाताखालचे लोक खूश रहातील. हातून सत्कर्मे घडतील. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना पशुधनापासून धनप्राप्ती होईल.

सप्तमात नेपच्यून आहे. भागीदारीचे व्यवहार टाळावेत. फसवणुकीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. हीच गोष्ट विवाहाच्या बाबतीत ठरवितांना नीट चौकशी करावी. अन्यथा विश्वासघातकी जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.

सप्तमात रवि आहे. थोर व्यक्तीची वादविवाद कराल पण बोलण्याच्या भरात कळत नकळत अपमान होऊ नये यावर लक्ष ठेवावे.

स्त्रियांसाठी - अष्टमात शुक्र आहे. महिलांना ‘ग‘ ची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष राहतील. कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी-विद्यार्थ्यांनी स्वास्थाची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहिण्याचा सराव वाढविणे फायद्याचे राहील.

शुभ तारखा - 1, 2, 4, 6, 7, 13, 14, 16, 17, 21, 22, 23, 25, 26, 28, 29, 30

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com