स्थावर मालमत्तेतून आर्थिक लाभ होतील

त्रैमासिक भविष्य - कन्या
त्रैमासिक भविष्य - कन्या
त्रैमासिक भविष्य - कन्या Quarterly Prediction - Virgo

ऑगस्ट - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या षष्ठस्थानी प्लूटो-शनी, अष्टमात गुरु-नेपच्यून, सप्तमात गुरू-नेपच्यून, अष्टमात राहू-हर्षल, नवमात मंगळ,लाभात रवि-शुक्र, व्ययात बुध अशी ग्रहस्थितीे आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे टो, पा, पी, पु, पे, पो अशी आहेत. राशीचे चिन्ह एका हातात धान्याची ओंबी, दुसर्‍या हातात अग्नी घेऊन नौकेत बसलेली स्त्री असे आहे. राशी स्वामी बुध आहे. राशी तत्व पृथ्वी असल्याने स्वभाव सहनशील आहे. द्विस्वभाव राशी असल्याने निर्णय घेण्यास वेळ लागतो. त्वरीत निर्णय घेतला तरी कृतीसाठी उशीर लागतो. दक्षिण दिशा फायद्याची आहे. लिंग स्त्री असल्याने स्वभाव सौम्य, लाजाळू व धीटही. वात प्रकृती. राशीचा अंमल पोटावर आहे. शुभ रंग-हिरवा, शुभ रत्न-पाचू, शुभ वार - बुधवार, शुभ अंक-5, शुभ तारखा-5/14/23. मित्र राशी- तुला, शत्रु राशी - कर्क.

लाभस्थानी रवि आहे. आर्थिक आवक वाढेल. मागे केलेल्या कामाचा मोबदला आता चांगल्या प्रकारे मिळू शकेल. संयम चांगला असल्यामुळे चरित्र शुद्ध राहील. मित्र चांगले व मोठ्या कुळातील मिळतील. पराक्रमास जोर येईल.

स्त्रियांसाठी - नातेवाईक व शेजारीपाजारी यांचे संबंध चांगले राहील. त्यामुळे महिलांचा स्वभाव आनंदी व उत्साही राहील. गायनवादनादी ललित कलात प्रगती होईल. कोणतेही काम नीटनेटकेपणाने केल्याने मानसिक समाधान मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी -तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा - 2, 3, 4, 9, 10, 13, 15, 16, 17, 20, 22, 28, 29, 30, 31

सप्टेंबर - 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी बुध, द्वितीयात केतू, पंचमात शनी-प्लुटो, सप्तमात गुरू-नेपच्यून, अष्टमात राहू- हर्षल,नवमात मंगळ, व्ययात रवि-शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

नवमात मंगळ आहे. स्वभाव काहीसा लहरी व उतावळा राहील.पत्नीच्या नातेवाईकांकडून मदतीची विचारणा होण्याची शक्यता आहे.

लग्नी बुध आहे. प्रवास सुखदायक घडतील. त्यातून आर्थिक लाभ होतील.विद्याव्यासंगात भर पडेल. मित्रमंडळींना भेटून चेहर्‍यावर प्रसन्नता झळकेल. अडचणींच्या वेळी मित्रमंडळ मदतीला धावून येईल. स्वधर्मावर श्रद्धा राहील.

सप्तमात नेपच्यून आहे. भागीदारीचे व्यवहार टाळा. फसवणूकीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. विवाह ठरवितांना चौकशी करावी. अन्यथा विश्वासघातकी जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. च

द्वादशात शुक्र आहे. वैवाहिक जीवन सुखी राहील. मात्र कुटुंबास पुरेसा वेळ देणे शक्य होणार नाही.

स्त्रियांसाठी - महिलांना पतीराजांचे उत्तम सहकार्य प्राप्त होईल. मात्र कलह टाळण्यासाठी नम्रतेचे पथ्य पाळा. उत्साह चांगला राहील. कलाकौशल्यात प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.

शुभ तारखा - 1, 4, 7, 8, 10, 11, 12, 14, 17, 21, 22, 26, 27, 30

ऑक्टोबर- 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी केतू, पंचमात शनी-प्लूटो, षष्ठात नेपच्यून, सप्तमात गुरू, अष्टमात राहू-हर्शल, नवमात मंगळ, व्ययात रवि-बुध-शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

सप्तमात गुरू आहे. विवाहोत्सुक तरूण तरूणींना फारच चांगला जोडीदार मिळेल. थोर लोकांची संगत मिळेल. स्वजातीच्या उन्नतीसाठी कार्य कराल. लबाड लोकांना वश कराल. नवविवाहीतांचा भाग्योदय होईल. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. स्वतःच्या सामर्थ्याविषयी गर्व वाटेल.पण संयम ठेवणक आवश्यक आहे. विद्वान लोकांत मान मिळेल.

पंचमात शनी आहे. शरीरप्रकृती सुदृढ राहील. शत्रुवर विजय मिळवाल. स्थावरासंबंधी लाभ होतील. सार्वजनिक संस्था, राजकारण, अति महत्त्वाच्या लोकांशी संबंध यात चांगले यश मिळेल. नोकरीत यश मिळेल. व्यापार्‍यांना लाभ होत राहतील.

पंचमात प्लुटो आहे. नाना साधनांनी सुखप्राप्ती करण्यासाठी धडपड कराल. बुद्धीचे ज्ञानग्रहण सामर्थ्य चांगले राहील. सतत उत्साह असल्यामुळे कार्यक्षमता उत्तम राहील.

स्त्रियांसाठी - द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक आहे.

विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परीक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. याकडे दुर्लक्ष करा. भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा - 3, 4, 5, 8, 10, 11, 17, 18, 19, 21, 24, 26, 30, 31

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com