शनी भरपूर लाभ देईल

त्रैमासिक भविष्य - मेष
शनी भरपूर लाभ देईल

सौ. वंदना अनिल दिवाणे

जानेवारी - 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी राहू-हर्षल. , द्वितीयात मंगळ, सप्तमात केतू , नवमात रवि-बुध, दशमात शुक्र-शनी-प्लुटो, लाभात नेपच्यून, व्ययात गुरू अशी ग्रहस्थितीे आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे चू, चे, चो, ला, ली, ले,लू, लो अशी आहेत. राशी चिन्ह मेंढा आहे. राशी स्वामी - मंगळ, तत्व-अग्नी, चर राशी असल्यामुळे स्वभाव अतिशय चंचल आहे. पूर्व दिशा फायद्याची आहे. लिंग-पुरूष, वर्ण - क्षत्रिय, स्वभाव-क्रूर, पित्त प्रकृती. राशीचा अंमल डोक्यावर असल्यामुळे डोक्याला इजा होणार नाही याची काळजी घ्या.

शुभ रंग-लाल, शुभ रत्न-पोवळे, शुभ दिवस-मंगळवार, रविवार. देवता-शिव,भैरव, मारूती. शुभ अंक-9, शुभ तारखा-9/18/27, मित्र राशी-सिंह,तुला,धनु. शत्रु राशी- मिथून, कन्या. स्वभाव अत्यंत क्रोधी, कुटुंबाचे उत्तम प्रकारे पालनपोषण कराल. आव्हान स्वीकारण्याीच खुमखुमी.

दशमात शुक्र हा उत्तम शुभयोग आहे. सर्व प्रकारचे भाग्य तुमच्याकडे चालत येईल. मातृ-पितृ सुख उत्तम राहील. व्यवसाय, नोकरी सर्वच बाबतीत प्रगती होईल. कमी श्रमात विपुल धनसंपत्ती प्राप्त होईल. बोनस म्हणून मोठेपणाही मिळेल. प्रकृती उत्तम राहील.

स्त्रियांसाठी - दशमातील शुक्र महिलांना किचनमधील गॅस व मुलांच्या अभ्यासातून वेळ काढून अर्थार्जनासाठी व्यापार करण्याचा संदेश देत आहे. लेखिकांना महिलांसंबंधित लेख चांगले जमतील.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. क्लासेसमुळे बरीच धावपळ होईल.

शुभ तारखा -1, 4, 5, 9, 11, 14, 15, 22, 24, 26, 27

फेब्रुवारी-2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी राहू-हर्शल, द्वितीयात- मंगळ, सप्तमात केतू , नवमात - बुध, दशमात रवि-प्लुटो, लाभात शुक्र-शनि, व्ययात गुरू अशी ग्रहस्थिती आहे.

नवमात बुध आहे. पुत्रसुख उत्तम मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. तिही सरळ मार्गाने . सत्पुरूषाच्या सेवेपासून लाभ होतील. लेखक वर्गाच्या हातून प्रमिभासंपन्न लिखाण होईल. काहिंना परदेशगमनाची संधी मिळेल. धार्मिक मते जुन्या वळणाची असूनही नवीन विचार प्रवाहाचे स्वागत होईल.

राशीच्या लाभात असलेला शनी भरपूर लाभ देईल. धनप्राप्तीच्या बाबतीत साडेसातीतून सुटका झाल्याने याची प्रचिती येईल. तेजस्वीपणाला धार चढेल. कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणारे शत्रू नष्ट होतील किंवा सुतासारखे सरळ वागतील. धनसंग्रह करणे शक्य होईल. सत्संगाची गोडी वाटेल. स्त्रियांना आवश्यक असलेंल्या वस्तूचा व्यापार करणार्‍या व्यापार्‍यांना विशेष लाभ होतील. संततीच्या बाबतीत चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. मुलांच्या स्वास्थ्याकडे विशेष लक्ष द्यावे. लबाड नातेवाईकांकडून अथवा मित्रांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. दशमस्थानी असलेला प्लूटो हा नेतृत्त्वासाठी फार चांगला आहे. प्रतिपक्षाशी विरोध पत्करून यशस्वी होऊ शकाल.

स्त्रियांसाठी - महिलांचा धार्मिकतेकडे कल राहील. बोलताना कटू शब्द वापरण्याचे टाळल्यास घरात तणावरहित वातावरण राहील. अपघातातूून आश्चर्यकारकरित्या सुटका होईल. पतीराज तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही. विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांनी स्वास्थ्याची काळजी घ्यावी. विदयेेत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोेबर लिहीण्याचा सराव वाढविणे फायद्याचे राहील.

शुभ तारखा - 3, 4, 6, 7, 8, 10, 11, 14, 16, 17, 22, 24, 25, 28

मार्च - 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी राहू-हर्षल, द्वितीयात मंगळ, सप्तमात केतू, दशमात रवि, लाभात रवि-बुध-शनी, व्ययात गुरू-शुक्र-शनि अशी ग्रहस्थिती आहे.

राशीच्या तनुस्थानी हर्शल असल्याने धाडसाकडे कल राहील. स्वभाव कमालीचा लहरी व चंचल एवढेच नव्हे तर इतरांना विचीत्र वाटेल असा राहील. राजकारणात असाल तर भाषणातून आश्वासनांतून पाऊस पाडाल. मात्र श्रोते त्यावर विश्वास ठेवेल असे नाही. स्वतःला कितीही फिल गुड वाटले तरी इतरांना वाटेलच असे नाही. लोकाचार व रूढी यांच्याविरूद्ध वर्तन ठेवण्यात भूषण वाटेल. स्वभाव क्षणात शांत तर क्षणात उतावळा राहील.

व्ययात नेपच्यून आहे. संशोधनासारख्या कामात चांगले यश मिळेल. गुप्तहेर खात्यातील कर्मचार्‍यांना आरोपी पकडण्यात यश मिळेल. सामाजिक मान्यता मात्र तशी मिळणार नाही. हॉस्पिटल व तुरुंगाच्या संबंधित कामापासून लाभ होतील. लोकोपयोगी काम करण्यात फार आनंद वाटेल.

व्ययस्थानी गुरू आहे. वितंडवादावर नियंत्रण ठेवावे. ब्रम्हांडाच्या पाठीमागे असलेल्या ईश्वरी सत्तेबद्दल म्हणावा असा विश्वास वाटणार नाही. अध्यात्मात प्रगती होईल.

स्त्रियांसाठी - द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक आहे.

विद्यार्थ्यांसाठी- माता पिता, गुरूजन वर्ग, वृद्धांच्या बोलण्याला लेक्चरबाजी न समजता त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा. विशेषतः विद्येची आवड असणार्‍या मित्रांची निवड करावी म्हणजे अभ्यासात प्रगती होईल.

शुभ तारखा - 1, 4, 5, 8, 9, 11, 16, 18, 22, 23, 27, 28, 29, 30, 31

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com