सांपत्तीक लाभ होतील

त्रैमासिक भविष्य - तूळ
सांपत्तीक लाभ होतील

सप्टेंबर - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी केतू, चतुर्थात शनि-प्लूटो, पंचमात गुरू-नेपच्यून, सप्तमात हर्षल,अष्टमात राहू, दशमात रवि-बुध, लाभात मंगळ-शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे रा,रि,रो, ता,ती,तू, ते अशी आहेत. राशीचे चिन्ह तराजू आहे. राशी स्वामी- शुक्र, तत्त्व- वायु, चर राशी असल्याने स्वभाव चंचल. पश्चिम दिशा फायद्याची. लिंग पुरूष त्यामुळे काही स्त्रियांची वागणूक पुरूषी थाटाची असते. रजोगुणी, स्वभाव क्रूर, त्रिदोष प्रकृती. राशीचा अंमल मांड्यांवर. शुभ रत्न हिरा, शुभ रंग सफेद, शुभ दिवस- शुक्रवार, देवता- लक्ष्मी, संतोषी माता. शुभ अंक-6, शुभ तारखा- 6,15, 21. मित्र राशी- मिथून, मकर, कुंभ, धनु, कर्क. शत्रु राशी - सिंह. संशोधन कार्याची आवड. आत्मविश्वास दांडगा. वाणी आकर्षक. नकारात्मक गुण ईर्षा, घमेंड, अतिधूर्तता. मानसिक संतुलन चांगले.

एकादशात मंगळ आहे. सांपत्तीक लाभ होतील. त्यासाठी मित्रांचे सहकार्य मिळेल. मात्र मित्रांची पारख हवी. सामाजिक कार्याची आवड वाटेल. स्थावर ईस्टेटीसंबंधी लाभ होण्याचा संभव आहे.

स्त्रियांसाठी -धार्मिक वृत्तीमुळे महिलांचे मानसिक स्वास्थ उत्तम राहील. परदेशगमन करणार्‍या महिलांचा भाग्योदय होईल. कला क्षेत्रात विशेषतः लेखनात चांगले यश मिळेल. पुत्रसुख उत्तम मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांनी स्वास्थाची काळजी घ्यावी. विद्येत प्रगती उत्तम राहील. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहीण्याचा सराव वाढवणे फायद्याचे राहील.

शुभ तारखा - 1, 3, 7, 8 9 10, 13, 14, 15, 16, 19, 21, 23, 29, 30

ऑक्टोबर- 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशी धनस्थानी शुक्र-केतू, तृतीयात प्लूटो, चतुर्थात शनी- गुरू, पंचमात -नेपच्यून, सप्तमात हर्षल, अष्टमात राहू , व्ययात रवि-मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

सप्तमात हर्षल विवाहाच्या बाबतीत विवाहोत्सुकांना चमत्कारीक अनुभव देतील. तर अन्य जणांना काही विवंचना देतील वेळीच काळजी घ्या. विरोधकांवर नैतिेक विजय मिळवाल. पण त्यातू आर्थिक लाभ मात्र होणार नाही. नव्या ओळखीतून फायदा होईल.

चतुर्थस्थानी गुरूमुळे संसारात सुखी व्हाल. नावलौकीकात भर पडेल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. धिमा व समाधानी स्वभाव असल्यामुळे कोणत्याही अडचणीत पराभव होणार नाही. जमीन- जुमला, संपत्तीची आवक नेहमीप्रमाणे चालू राहील. भाग्योदयासाठी घरापासून जास्त दूर जाण्याची गरज नाही. पोकळ डौल मिरवण्याची आवड निर्माण होईल. त्यामुळे लोकात हसे होण्याची शक्यता आहे. परदेशगमन करून भाग्य आजमावे.

स्त्रियांसाठी - द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल.

नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी - शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा - 2, 3, 8, 10, 12, 13, 14, 15, 17, 18, 19, 20, 21, 24,26, 28, 29

नोव्हेंबर - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या राशीस्थानी बुध-रवि-मंगळ, द्वितीयात केतू, तृतीयात शुक्र, चतुर्थात गुरु-शनी-प्लूटो, पंचमात नेपच्यून, सप्तमात हर्षल अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

लग्ना रवि आहे. पराक्रमास जोर येईल. कामाच्या घाईत भोजनाकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार नाही. त्यामुळे आहार कमी राहील. स्वभाव उदार राहील. बुद्धी तीव्र राहील. मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घ्या.

लग्नी बुध आहे. प्रवास सुखकारक घडतील. त्यातून आर्थिक लाभ होतील. विद्याव्यासंगात भर पडेल. मित्रांशी मिळून मिसळून वाागाल. चेहर्‍यावर प्रसन्नता झळकत राहील. अडचणीच्या वेळी मित्रांच्या मदतीला धावून जाल. स्वधर्मावर श्रद्धा राहील.

तृतीयात शुक्र आहे. कृपनवृत्ती राहील. आळसाचे आकर्षण वाटेल. डोळ्यांचे विकार होण्याची शक्यता आहे. कवी वर्गास उत्तम कविता सुचतील. काम नीटनेटकेपणाने पार पाडाल. नातेवाईक व शेजारी यांचे उत्तम सुख लाभेल.

स्त्रियांसाठी - तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल. गायनादी कलात प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी -विदयार्थीदशा हा खर म्हणजे जन्मभर चालविण्याचा वसा आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या उंबरठ्यावर असाल तर पंचमातील नेपच्यून योग्य शाखेत प्रवेश करून देईल.

शुभ तारखा - 1, 4, 5, 6, 9, 10, 12, 13, 16, 20, 21, 23, 24, 25, 28, 30

Related Stories

No stories found.