त्रैमासिक भविष्य - तूळ Quarterly Futures -Libra

कमी श्रमात विपुल धनप्राप्ती
त्रैमासिक भविष्य - तूळ Quarterly Futures -Libra

सौ. वंदना अनिल दिवाणे

जुलै - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयस्थानी केतू-गुरू-प्लुटो चतुर्थात शनी, पंचमात नेपच्यून षष्ठात मंगळ, सप्तमात हर्षल, नवमात शुक्र, दशमात बुध, लाभात रवि अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते अशी आहेत. राशीचे चिन्ह तराजू आहे. राशी स्वामी शुक्र, तत्त्व-वायू, चर राशी असल्याने स्वभाव चंचल. पश्चिम दिशा फायद्याची आहे. लिंग-पुरुष, त्यामुळे काही बायकांची वागणूक पुरुषी थाटाची. रजोगुणी, स्वभाव-क्रूर, प्रकृती-कफ, वात, पित्त. शुभ रत्न-हिरा, शुभ रंग-सफेद, शुभ दिवस-शुक्रवार, देवता-लक्ष्मी व संतोषी माता. शुभ अंक-6, शुभ तारखा - 6/15/24. मित्र राशी - मिथुन, मकर, कुंभ, धनू, कर्क. शत्रु राशी - सिंह, संशोधन कार्याची आवड. आत्मविश्वास दांडगा. वाणी आकर्षक व प्रभावशाली. नकारात्मकक गुण ईर्षा, घमेंड व अतिधूर्तता. मानसिक संतुलन चांगले. विनोदी वृत्ती.

दशमात बुध आहे. विद्याव्यासंगात वृद्धी होईल. राजकारण्यांची लोकप्रियता वाढेल. अनेक प्रकारच्या धंद्यांत उत्तम यश मिळेल. वक्तृत्वाला बहर येईल. प्रतिभेच्या परिसस्पर्शाने पुनित झालेले लेखन लेखकांच्या लेखणीतून उतरेल. सज्जनांची संगत प्राप्त होईल. या सर्वांची परिणाम म्हणून आर्थिक आवक चांगली आणि सन्मार्गाने असल्यामुळे तणावरहित स्थिती राहील.

स्त्रियांसाठी - नवमात शुक्र आहे. महिलांच्या व्यक्तिमत्त्वात सौद्याच्या दृष्टीने वृद्धी होईल. पती-पुत्र सुख उत्तम राहील. मात्र कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे..

विद्यार्थ्यांसाठी - माता-पिता-गुरू यांच्या बोलण्याला लेक्चरबाजी न समजता त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा. विद्येची आवड असणार्‍या मित्रांची निवड करावी. म्हणजे अभ्यासात प्रगती होईल.

शुभ तारखा -2, 3, 6, 12, 13, 15, 16, 17, 19, 20, 25, 28, 29

ऑगस्ट - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयस्थानी गुरू-केतू-प्लूटो चतुर्थात शनी, पंचमात नेपच्यून, सप्तमात मंगळ- हर्षल, नवमात राहू, दशमात शुक्र, लाभात रवि, व्ययात बुध अशी ग्रहस्थिती आहे.

एकादशातील रविमुळे आर्थिक आवक वाढेल. मागे केलेल्या श्रमाचा मोबदला आता चांगल्या प्रकारे मिळू शकेल. पराक्रमाला जोर येईल. धार्मिक वृत्ती राहील. शत्रूंवर विजय मिळेल. संयम चांगला असल्यामुळे चारित्र्य शुद्ध होईल. मित्र चांगले व चांगल्या कुलातील मिळतील. हाताखालच्या लोकांकडून कसून काम करून घ्याल.

दशमात शुक्र हा एक उत्तम शुभयोग आहे. सर्व प्रकारचे भाग्य तुमच्याकडे चालत येईल. मातृ-पितृ सुख उत्तम राहील. उद्योग व्यवसाय नोकरी सर्वच बाबतीत प्रगती होईल. कमी श्रमात विपुल धनप्र्राप्ती होईल. त्याचबरोबर बोनस म्हणून मोठेपणाही मिळेल. प्र्रकृती उत्तम राहील. विलासी साधनांची व सौंदर्याची आवड वाटेल. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना याची विशेष प्रचिती येईल. नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना नोकरी मिळेल. तीही मोठ्या अधिकाराची,

स्त्रियांसाठी - दशमातील शुक्र महिलांना किचनमधील गॅस व मुलांच्या अभ्यासातून वेळ काढून अर्थार्जनासाठी व्यापार करण्यासाठी संदेश देत आहे. लेखिकांना महिला संबंधित लेख चांगले जमतील.

विद्यार्थ्यांसाठी - शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र चांगले अभ्यासू असतील.

शुभ तारखा - 1, 2, 3, 11, 12, 16, 18, 21, 25, 27, 28, 29

सप्टेंबर - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी बुध, द्वितीयात केतू, तृतीयात गुरू-प्लूटो, चतुर्थात शनी, पंचमात नेपच्यून, षष्ठात मंगळ, सप्तमात हर्षल, अष्टमात राहू, लाभात शुक्र, व्ययात रवि अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयात गुरू आहे. या स्थानी गुरू असता मनुष्य पराक्रमशील असतो. मात्र अपेक्षेप्रमाणे सुस्थिती लवकर लाभणार नाही. पत्नीचा सल्ला फायद्याचा राहील. कंजूषपणा करण्याकडे कल राहील. धनसंग्रहात अडचणी येतील. बांधवाकडून म्हणावे तसे सुख मिळणार नाही. हा गुरू स्वराशीचा असल्याने शुभ फळ मिळेल. शेजारी व मित्र यांचे उत्तम सहकार्य प्राप्त होईल. राजकीय कार्यकर्ते नेत्यांना हा गुरू विशेष चांगला आहे. विशेष पराक्रम न दाखविताही त्यांची भाग्यवृद्धी होईल. मात्र शत्रुसंख्या वाढेल.

सप्तमात हर्षल विवाहाच्या बाबतीत विवाहोत्संकांना चमत्कारीक अनुभव देईल. अन्य जनांना पत्नीसंबंधी काही विवंचना निर्माण होण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घ्यावी. मुळात विवाह उशिरा होण्याची शक्यता आहे. विवाह संबंध ठरला असे वाटेल व ऐनवेळी विवाह दुसर्‍या स्थळी व्हावा असाही अनुभव येईल. विरोधकावंर नैतिक विजय मिळेल.

स्त्रियांसाठी - व्यक्तिमत्त्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेंट द्यावीशी वाटेल. पतिराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थीदशा हा खर म्हणजे जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा - 4, 5, 9, 10, 11, 13, 14, 15,19, 20, 22, 25, 26, 27, 28, 30, 31

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com