Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधधनप्राप्तीचा वेग वाढेल

धनप्राप्तीचा वेग वाढेल

सप्टेंबर – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयस्थानी केतू, पंचमात शनि-प्लूटो, षष्ठात गुरू-नेपच्यून, अष्टमात हर्षल,नवमात राहू, लाभात रवि-बुध, व्ययात मंगळ-शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

- Advertisement -

तुमची रास – राशीची आद्याक्षरे टो,पा,पी,पु,ना,

ठा,पे,पो अशी आहेत. राशीचे चिन्ह एका हातात गव्हाची लोंबी व दुसर्‍या हातात अग्नी घेऊन नौकेत बसलेली अशी स्त्री आहे. राशी स्वामी -बुध, तत्त्व-पृथ्वी, असल्याने स्वभाव सहनशील.

द्विस्वभाव राशी असल्याने निर्णय घेण्यास वेळ लागतो. त्वरीत निर्णय घेतला तरी कृतीस वेळ लागतो. दक्षिण दिशा फायद्याची आहे. लिंग स्त्री असल्याने स्वभाव सौम्य व लाजाळू आणि धीटही. वात प्रकृती. राशीचा अंमल पोटावर आहे. शुभ रंग हिरवा. शुभ रत्न पाचू, शुभ दिन बुधवार, रविवार. शुभ अंक- 5, शुभ तारीख- 5, 14, 23. मित्र राशी- तुला, शत्रु राशी- कर्क, गणरायाची उपासना फजदायी असेल.

लाभात रवि आहे. यामुळ आर्थिक आवक वाढेल. मागे केेलेल्या श्रमाचा मोबदला चांगल्याप्रकारे मिळू शकेल. पराक्रमाला जोर येईल. धार्मिक वृत्ती राहील. संयम चांगला असल्यामुळे चारित्र्य चांगले राहील. मित्र चांगले व मोठ्या कुळातील मिळतील. हाताखालच्या लोकांकडून कसून काम करून घ्याल.

स्त्रियांसाठी –द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक आहे.

विद्यार्थ्यांसाठी –पंचमात गुरू आहे. विद्येतील प्रगतीसाठी तो अतिशय शुभ आहे. वाडवडिलांच्या पुण्याई व आर्शिवादामुळे अभ्यासात मन एकाग्र होईल.

शुभ तारखा – 1, 3, 7, 8 9 10, 13, 14, 15, 16, 19, 21, 23, 29, 30

ऑक्टोबर- 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयस्थानी रवि-मंगळ-बुध, तृतीयात शुक्र-केतू, चतुर्थात प्लूटो, पंचमात शनी- गुरू, षष्ठात -नेपच्यून, अष्टमात हर्षल, नवमात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

लग्नी बुध आहे. प्रवास सुखदायक घडतील. त्यातून आर्थिक लाभही होतील. विद्याव्यासंगात भर पडेल. मित्रमंडळींशी मिळून मिसळून वागाल. चेहर्‍यावर प्र्रसन्नता झळकेल. अडी अडचणीच्या वेळी मित्रांच्या मदतीला धावून जाल. स्वधर्मावर चांगली श्रद्धा राहिल.

पंचमात गुरू आहे. पंचमस्थानातील गुरू हा स्वतंत्र भाग्ययोग असतो. वैभव प्राप्त होईल. विद्वत्तेचा लौकीक सगळीकडे पसरेल. सत्पुत्र सुख प्राप्त होईल. वाडवडिलाच्या पुण्याईने भाग्योदय होईल. संततीसुख चांगले राहील. लेखनाची आवड असल्याच हातून चांगले लिखाण होईल. लोक शिक्षणात भाग घेण्याची संधी. सट्ट्यासारख्या व्यवहारात भाग घ्यावासा वाटेल.

पंचमात रवि आहे. शरीरप्र्रकृती सुदृढ राहील. शत्रुवर विजय मिळेल. स्थावरासंबंधी लाभ होतील. मुलांची प्रगती होईल. नोकरीत यश मिळेल. व्यापार्‍यांना लाभ होतील.

स्त्रियांसाठी – तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल. गायनवादनादी कलात प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी – पंचमात प्लुटो आहे. विद्यार्थ्यांचे ज्ञान ग्रहण सामर्थ्य चांगले राहील. उत्साह टिकून राहील. त्यामुळे अभ्यासात मनाला एकाग्र करणे शक्य होईल. प्रगतीकारक काळ आहे.

शुभ तारखा – 2, 3, 8, 10, 12, 13, 14, 15, 17, 18, 19, 20, 21, 24,26, 28, 29, 30

नोव्हेंबर – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी बुध-रवि-मंगळ, तृतीयात केतू, चतुर्थात शुक्र, पंचमात गुरु-शनी-प्लूटो, षष्ठात नेपच्यून, अष्टमात हर्षल नवमात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

चतुर्थात शुक्र आहे. आनंदी वृत्ती राहील. आर्थिक आवक उत्तम राहील. न्यायीपणामुळे लोकप्रियतेत भर पडेल. कार्यात प्राविण्य संपादन कराल. आकर्षक व मधुर बोलण्यामुळे घरात व बाहेर खेळीमेळीचे वातावरण राहील. मातेची सेवा कराल. नवीन वाहन खरेदीसाठी हा महिना चांगला आहे. निवासस्थानासंदर्भात चांगल्या घटना घडतील.

पंचमात प्लुटो आहे. नाना साधनांनी सुखप्राप्ती करण्यासाठी धडपड करण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल. बुद्धीचे ज्ञानग्रहण करण्याचे सामर्थ्य चांगले राहील. सतत उत्साह असल्यामुळे कार्यक्षमता उत्तम राहील. हातात घेतलेल्या कामात विजयी व्हाल. शत्रूंच्या कारवाया रोखण्यासाठी जागरूक रहा. विद्याव्यासंग वाढेल. नोकरीपासून सुख मिळेल.

स्त्रियांसाठी – चतुर्थात शुक्र आहे. महिलांचा स्वभाव प्रेमळ राहील. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती राहील. हे मात्र धोक्याचे राहील. सोने म्हणून पितळ हाती लागण्याचा संभव आहे.

विद्यार्थ्यांसाठी –विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा – 1, 4, 5, 6, 9, 10, 12, 13, 16, 20, 21, 23, 24, 25, 28, 30

- Advertisment -

ताज्या बातम्या