इष्ट हेतू  सिद्धीस जातील
भविष्यवेध

इष्ट हेतू सिद्धीस जातील

त्रैमासिक भविष्य - कन्या

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जुलै - 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या चतुर्थस्थानी केतू-गुरू-प्लुटो षष्ठात शनी, पंचमात शनी, षष्ठात नेपच्यून सप्तमात मंगळ, अष्टमात हर्षल, नवमात शुक्र, दशमात रवि- बुध-राहू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे टो, पा, पी, पु, पा, णा, ठा, अशी आहेत. राशीचे चिन्ह एका हातात धान्याची लोंबी व दुसर्‍या हातात अग्नी घेऊन नौकेत बसलेली स्त्री असे आहे. राशी स्वामी बुध, राशी तत्त्व पृथ्वी असल्याने स्वभाव सहनशील. द्विस्वभाव राशी असल्याने निर्णय घेण्यास वेळ लागतो आणि त्वरीत निर्णय घेतला तरी कृतीत उशीर लागतो. दक्षिण दिशा फायद्याची आहे. लिंग स्त्री असल्याने स्वभाव सौम्य, लाजाळू व धीटही. परंतु उद्धटपणा नाही. राशीचा अंमल पोटावर असल्याने पोटांच्या विकारांची काळजी घ्या.

शुभ रंग - हिरवा, वार - रविवार,

शुभ अंक - 5, शुभ तारीख - 5/14/23. मित्र राशी-तुला, शत्रुराशी-कर्क, गणरायाची उपासना फायद्याची आहे.

दशमस्थानातील रविमुळे महत्त्व प्राप्त होईल. विशेषतः राजकारणी लोकांना याची प्रचिती येईल. असे म्हटले जाते की, आजकालच्या काळात पितापुत्राचे म्हणावे तसे पटत नाही. परंतु तुम्हाला मात्र पितृसुख उत्तम लाभेल.

स्त्रियांसाठी - नवमात शुक्र आहे. महिलांच्या व्यक्तिमत्त्वात सौद्याच्या दृष्टीने वृद्धी होईल. पती-पुत्र सुख उत्तम राहील. मात्र कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे..

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांनी स्वास्थ्याची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबबरोबर लिहिण्याचा सराव वाढविणे फायद्याचे ठरेल.

शुभ तारखा - 2, 5, 7, 9, 10, 12, 13, 14, 21, 25, 26, 29.

ऑगस्ट - 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या चतुर्थ स्थानी गुरू-केतू-प्लुटो, पंचमात शनी, षष्ठात नेपच्यून, सप्तमात मंगळ, अष्टमात हर्षल, दशमात शुक्र-राहू, लाभात बुध व्ययात रवि अशी ग्रहस्थिती आहे.

एकादशात बुध आहे. राजकृपेने चांगले लाभ होतील, इष्ट हेतू सिद्धीस जातील. शत्रूंनाही गोड बोलून वश कराल. संगीताची आवड वाटेल. सभासंमेलनात तेजस्वीपणा दाखवाल. मानसिक उन्नतीला एकादशातील बुध फार चांगला समजला जातो. आध्यात्मिक प्रगती साध्य करू शकाल. शैक्षणिक क्षेत्रातील प्राध्यापक व शिक्षकांच्या विद्वत्तेचा गौरव होईल. ज्योतिषशास्त्राची आवड असल्यास त्यात प्रगती होईल.

दशमात शुक्र आहे. सर्व प्रकारचे भाग्य प्राप्त करून देणारा असा हा शुभ योग आहे. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना याची प्रचिती येईल. राजमान्यता मिळेल. नोकरीच्या प्रतीक्षेत असणार्‍यांना नोकरी मिळेल. मातृ-पितृ सुख उत्तम राहील. उद्योग, व्यवसाय, नोकरी सर्वत्र प्रगती होईल. कमी श्रमात विपुल धनप्राप्ती होईल. त्याचबरोबर बोनस म्हणून मोठेपणाही मिळेल. प्रकृती उत्तम राहील. विलासी व सौंर्याची आवड वाटेल.

स्त्रियांसाठी - दशमातील शुक्र महिलांना किचनमधील गॅस व मुलांच्या अभ्यासातून वेळ काढून अर्थार्जनासाठी व्यापार करण्याचा संदेश देत आहे. लेखिकांना महिलांसंबंधित लेख चांगले जमतील.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यासात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. सध्याच्या क्लास पद्धतीमुळे बरीच धावपळ होईल.

शुभ तारखा - 2, 3, 4, 5, 7, 8, 11, 13, 15, 20, 21, 22, 23, 25, 28, 30, 31.

सप्टेंबर - 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी बुध, चतुर्थात गुरू-प्लुटो-केतू, पंचमात शनी, षष्ठात नेपच्यून, अष्टमात मंगळ, हर्षल दशमात राहू, लाभात शुक्र, व्ययात रवि अशी ग्रहस्थिती आहे.

चतुर्थात गुरू आहे. या गुरूमुळे संसारात सुखी व्हाल. नावलौकिकात भर पडेल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. धिमा व समाधानी स्वभाव असल्यामुळे कोणत्याही अडचणीत पराभव होणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना याचा विशेष अनुभव येईल. जमीनजुमला सांपत्तिक आवड नेहमीप्रमाणे सुरळीत चालू राहील. भाग्योदयासाठी घरापासून दूर जाण्याची गरज नाही. पोकळ डौल मिरवण्याची आवड निर्माण होईल. त्यामुळे लोकात हसे होण्याची शक्यता आहे. अशा लोकांनी परदेश गमन करून भाग्य आजमावे.

पंचमात शनी आहे. शरीर प्रकृती सुदृढ राहील. शत्रूवर विजय मिळेल. स्थावरासंबंधित लाभ होतील. सार्वजनिक संस्था, राजकारण, व्हीआयपी लोकांशी संबंधात चांगले यश मिळेल. मुलांची प्रगती होईल. व्यापार्‍यांना लाभ होतील.

चतुर्थात केतू आहे. नातेवाईक व भावाबहिणींचे सौख्य मिळण्यात अडचणी निर्माण होतील. बोलणे गोड व मधुर व आकर्षक राहील. द ुसर्‍याचे दोष काढण्याची वृत्ती कमी करा..

स्त्रियांसाठी - ग्रहांची चौकट महिलांसाठी चांगली आहे. फॅशनची नवीन वस्त्रे व अलंकार खरेदी यासंबंधी मनासारख्या गोष्टी घडतील. त्यासाठी पतिराजांची उत्तम साथ मिळेल. मुलांंवर नियंत्रण ठेवावे.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थीदशा हा जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा - 2, 3, 4, 6, 7, 10, 13, 14, 18, 24, 25, 26, 28, 29, 30.

Deshdoot
www.deshdoot.com