आर्थिक आवक उत्तम राहील

त्रैमासिक भविष्य - वृषभ
आर्थिक आवक उत्तम राहील

मे - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी बुध,षष्ठात केतू नवमात प्लुटो, दशमात लाभात मंगळ-शनी, लाभात गुूरू-शुक्र-नेपच्यून, व्ययात रवि-राहू-शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो अशी आहेत. राशीचे चिन्ह बैल आहे. राशी स्वामी-शुक्र, रास-पृथ्वी, तत्वाची असल्याने सहनशक्ती चांगली. राशी स्वरूप स्थिर. काहीसा आळशी स्वभाव. ऐषोआरामाची आवड. दक्षिण दिशा फायद्याची. लिंग स्त्री असल्याने स्वभाव लाघवी. रजोगुणी, वर्ण-वैश्य, राशीचा अंमल मुखावर आहे. वाचा स्पष्ट, शुध्द व प्रभावी असल्याने अभ्यासाने वक्तृत्वकला साध्य होऊ शकेल. शुभ रत्न-हिरा, शुभ रंग- हिरवा, पांढरा. देवता-श्री लक्ष्मी व संतोषी माता. शुभ अंक- 6, शुभ ता- 6/15/24. मित्र राशी- मकर, कुंभ. शत्रु राशी - सिंह, धनु, मीन. चिकाटी व निश्चयी, कष्टाळू, तेजस्वी, बुद्धीमान.

दशमात मंगळ आहे. इतरांना उत्तम सल्ला देऊ शकाल. त्यातून त्यांचा फायदाही होईल. स्वतःच्या बाबतीत निर्णय घेणे कठीण जाईल. आर्थिक स्थिती जेमतेम राहील. खर्चाला पैसा मात्र कमी पडणार नाही.

स्त्रियांसाठी - पती पत्नीचे आपापसातील प्रेम चांगले राहील. शत्रुसमान नातेवाईकांच्या गुप्त कारवाया उघडकीस आणण्यात यश मिळेल. डामडौल दाखविण्यासाठी वायफळ खर्च करू नका. काटकसर करा.

विद्यार्थ्यांसाठी - मे महिना सुट्टीचा. विद्यार्थी वर्ग शांत बसणार नाही. मनाप्रमाणे खेळात, फिरण्यात, व्यायामात भाग घेऊ शकतील. अभ्यासाचे दडपण दूर राहील.

शुभ तारखा - 1, 3, 4, 6, 7, 9, 10, 11, 13 19, 20, 22, 24, 26

जून - 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी रवि-बुध, षष्ठात केतू, नवमात प्लूटो, दशमात शनि, लाभात मंगळ-गुरू-नेपच्यून , व्ययात शुक्र-राहू- हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

लग्नी रवि आहे. राजमान्यता मिळेल. पराक्रमाला जोर येईल. राजकारणात भाग घेणार्‍या कार्यकर्ता किंवा उमेदवार यांना प्रचिती येईल. कामाच्या घाईत जेवणाकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार नाही यामुळे आहार कमी राहील. स्वभाव उदार राहील. थोडासा लोभीही राहील. बुद्धी तीव्र राहील. मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

दशमात शनी आहे. भाग्याचे दरवाजे उघडतील. बुद्धीमत्तेने लोकांना चकीत कराल. त्यामुळे जनमानसात आदर निर्माण होईल. आर्थिक आवक उत्तम राहील. धाडसाने कामे कराल. सत्ताधारी पक्षातील प्रतिनीधींना मंत्रीपद प्राप्त होण्याची शक्यता आहे.

नवमात प्लूटो आहे. परदेशगमनाच्या प्रयत्नात असाल तर त्यात यश मिळेल. हे विश्वची माझे घर इशी विश्वबंधुत्वाची भावना असेल. अध्यात्मिक सामर्थ्य साधनेच्या सातत्यातून प्राप्त होईल. व्यवहार चातुर्यामुळे सांसारीक स्थिती उत्तम राहील.

स्त्रियांसाठी - द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक आहे.

विद्यार्थ्यांसाठी - शाळा नुकत्याच सुरू झाल्या असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेला वेळ परत येणार नाही.

शुभ तारखा - 1, 2, 4, 6, 8, 11, 13, 15, 16, 19, 21, 22, 24, 30

जुलै - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शुक्र , द्वितीयात रवि- बुध, षष्ठात केतू, नवमात प्लूटो, दशमात शनि, लाभात गुरू-नेपच्यून, व्ययात मंगळ-राहू-हर्षल, अशी ग्रहस्थिती आहे.

लाभस्थानी गुरु आहे. तो लाभदायक आहे. अनेक उत्तम मित्र मिळतील. मित्रांचा चांगला फायदा होईल. वाहनसुख चांगले राहील. वाहनखरेदीचा विचारअसेल तर आताच उरकून घ्या. थोर लोकांचा स्नेह संपादन होईल. संततीसुख चांगले राहील. पुत्र जन्माबरोबर भाग्योदयास प्रारंभ होईल. बुद्धी तीक्ष्ण राहील. करिअरमध्ये मोठा अधिकार प्राप्त होईल. अंतर्मनाने भविष्यातील घटनांचा सुगावा लागेल.

लग्नी शुक्र आहे. व्यक्तीमत्वाला झळाळी येईल. नेहमी कामात दंग रहाल. स्वतःची जागा व संसार यात दंग रहाल. हरहुन्नरीपणामुळे कोणतेही नवीन काम लगेच आत्मसात कराल. व धनप्राप्तीही कराल. कामात व्यस्त रहाणे आवडेल. विवाहोेत्सुक तरूणांना सुंदर पत्नी लाभेल.

स्त्रियांसाठी - लग्नी शुक्र आहे. सौदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी- शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा - 1, 2, 7, 8, 15, 18, 20, 21, 5628, 29

Related Stories

No stories found.