आर्थिक आवक उत्तम राहील

त्रैमासिक भविष्य - वृषभ
त्रैमासिक भविष्य - वृषभ
त्रैमासिक भविष्य - वृषभQuarterly future - Taurus

सौ. वंदना अनिल दिवाणे

ऑगस्ट - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ, तृतीयात रवि- शुक्र, चतुर्थात बुध, षष्ठात केतू, नवमात प्लूटो-शनी, व्ययात राहू-हर्शल अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे इ, उ, ऐ, ओ, वी, वे, वो अशी आहेत. राशीचे चिन्ह बैल आहे. राशी स्वामी शुक्र. रास पृथ्वी तत्त्वाची असल्याने सहनशक्ती चांगली आहे. राशी स्वरूप स्थिर. काहीसा ऐशोआरामाची आवड. दक्षिण दिशा फायद्याची आहे. लिंग स्त्री असल्याने स्वभाव लाघवी. रजोगुणी. वर्ण वैश्य. राशीचा अंमल मुखावर. वाचा स्पष्ट शुद्ध व प्रभावी अभ्यासाने वक्तृत्त्वकला साध्य होऊ शकेल. शुभ रत्न हिरा. शुभ रंग- हिरवा, पांढरा. देवता-श्री लक्ष्मी, संतोषी माता. शुभ अंक-6, शुभ तारीख-6/15/24. मित्रराशी-मकर, कुंभ. शत्रू राशी- सिंह, धनु, मीन. चिकाटी, निश्चयी, कष्टाळू, स्वभाव तेजस्वी, बुद्धीमान,

नवमात प्लुटो आहे. परदेशगमनाच्या प्रयत्नात असाल तर यश मिळेल. हे विश्वची माझे घर अशी विश्व बंधुत्वाची भावना राहील. आध्यात्मिक सामर्थ्य साधनेच्या सातत्यातून प्राप्त होईल. व्यवहार चातुर्यामुळे सांसारिक स्थिती उत्तम राहील.

स्त्रियांसाठी - द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल. शेजारणी हेवा करतील.

विद्यार्थ्यांसाठी -तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा - 2, 3, 4, 9, 10, 13, 15, 16, 17, 20, 22, 28, 29, 30, 31

सप्टेंबर - 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी-मंगळ, चतुर्थात रवि- शुक्र, पंचमात बुध, षष्ठात केतू, नवमा शनी-प्लुटो, लाभात गुरू-नेपच्यून, व्ययात राहू-हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

चतुर्थस्थानी शुक्र आहे. आनंदी वृत्ती राहील. आर्थिक आवक उत्तम राहील. आनंदी वृत्ती राहील. लोकप्रियतेत भर पडेल. कार्यात प्राविण्य संपादन कराल. मधुर बोलण्यामुळे घरात व बाहेर खेळीमेळीचे वातावरण राहील. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. मातेची सेवा कराल. वाहनसुख मिळेल. राजकारणी लोकांना जनतेकडून सन्मान मिळेल. निवासस्थानासंबंधी शुभ घटना घडतील.

पंचमात बुध आहे. परिस्थितीत बदल होईल. उपासनेत मन लागेल. त्यामुळे मानसिक शांती प्राप्त होईल. विद्याव्यासंगात वृद्धी होईल. आर्थिक आवक वाढेल. राजकारणी लोकांना प्रतिष्ठेचे पद मिळेल.

स्त्रियांसाठी - चतुर्थात शुक्र आहे. आनंदी वृत्ती प्रदान करील. कुटुंबात हुकूमाची राणी व्हाल. हातात पैसा खेळत राहील. मनासारखी शॉपिंग कराल. पतीराजांची मर्जी बहाल होईल.

विद्यार्थ्यांसाठी -विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा - 1, 4, 7, 8, 10, 11, 12, 14, 17, 21, 22, 26, 27, 30

ऑक्टोबर- 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ, पंचमात रवि-बुध-शुक्र, षष्ठात केतू, नवमात शनी-प्लूटो, दशमात नेपच्यून, लाभात गुरू, व्ययात राहू-हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमात रवि आहे. चंचल बुद्धीमुळे प्रवासास निघावे वाटेल. विद्याभ्यासात चंचलतेमुळे खंड पडेल. काहीही करून पैसा मिळवलाच पाहिजे. अशी मनाला ओढ वाटेल. त्यासाठी शेअर्स, व्यापार,बिनभरवश्याच्या बँकेत गुंतवणूक अशा प्रकारचे व्यवहार कराल. काही ना त्यातून पैसा मिळेलही परंतु असे व्यवहार जपून करावे. विनाकारण विषाची परीक्षा घेणे तोट्याचे आहे.

लाभस्थानी गुरू आहे. हा गुरू लाभदायक आहे. अनेक उत्तम मित्र मिळतील. मित्रांना तुमच्यामुळे चांगला फायदा होईल. वाहनसुख चांगले राहील. थोर लोकांचा स्नेह संपादन होईल. संततीसुख चांगले राहील. पुत्र जन्माबरोबर भाग्योदय होईल. बुद्धी अतिशय तीक्ष्ण राहील. करिअरमध्ये मोठा अधिकार प्राप्त होईल. मौल्यवान वस्तुंनी तिजोरी भरलेली असेल. आंतर्मनाने पुडे घडणार्‍या घटना आधीच कळून येतील.

स्त्रियांसाठी -व्यक्तिमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी- माता पिता, गुरूजन वर्ग, वृद्धांच्या बोलण्याला लेक्चरबाजी न समजता त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा. विशेषतः विद्येची आवड असणार्‍या मित्रांची निवड करावी म्हणजे अभ्यासात प्रगती होईल.

शुभ तारखा - 3, 4, 5, 8, 10, 11, 17, 18, 19, 21, 24, 26, 30, 31

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com