त्रैमासिक भविष्य - वृषभ Quarterly Future - Taurus

सुखदायक प्रवासातून आर्थिक लाभ
त्रैमासिक भविष्य - वृषभ Quarterly Future - Taurus

सौ. वंदना अनिल दिवाणे

मे - 2021

आठवड्याच्या सुरुवातीला राशीस्थानी बुध-राहू-शुक्र,द्वितीयात मंगळ, सप्तमात केतू, नवमात शनी-प्लुटो, दशमात गुरू-नेपच्यून, व्ययात रवि-हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास -राशीची आद्याक्षरे इ,उ,ए, ओ, वा,वी,वू,वे,वो अशी आहेत. राशीचे चिन्ह बैल आहे. राशी स्वामी-शुक्र, रास-पृथ्वी, तत्त्त्वाची असल्यामुळे सहनशक्ती चांगली आहे. राशी स्वरूप स्थिर आहे. काहीसा आळशी व ऐषारामाची आवड. दक्षिण दिशा फायद्याची. लिंग स्त्री असल्याने स्वभाव काहीसा लाघवी. रजोगुणी. वर्ण-वैश्य, राशीचा अंमल मुखावर आहे. वाचा स्वष्ट, शुद्ध व प्रभावी असल्याने अभ्यासाने वक्तृत्त्वकला साध्य होऊ शकेल. शुभ रत्न हिरा, शुभ रंग- हिरवा व पांढरा. देवता-लक्ष्मी व संतोषी माता. शुभ अंक -6, शुभ तारीख - 6, 15, 14. मित्र राशी- मकर व कुंभ, शत्रु राशी- सिंह, धनु, मी चिकाटी व निश्चयी, कष्टाळू, स्वभाव तेजस्वी, बुद्धीमान.

लग्नी शुक्र आहे. व्यक्तीमत्वाला झळाळी येईल. हौशी व रंगेल स्वभावाखी त्यात भर पडल्यामुळे दुधात साखर पडल्यासारखे होईल. नेहमी कामात दंग रहाल. स्वतःची जागा व संसार यात दंग रहाल. हरहुन्नरीपणामुळे कोणतेही नवीन काम लवकर आत्मसात करून त्यापासून धनप्राप्ती करू शकाल. कामात व्यस्त रहाणे आवडेल. विवाहोत्सूक सुंदर पत्नी मिळेल.

स्त्रियांसाठी - लग्नी शुक्र आहे. महिलांसाठी सौदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी -मे महिना सुट्टीचा महिना आहे. विद्यार्थी शांत बसणार नाही. अभ्यासाचे दडपण दूर राहील. मनाप्रमाणे खेळात फिरण्यात, व्यायामात भाग घेऊ शकतील.

शुभ तारखा -1, 3, 4, 5, 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 21, 22, 26, 28, 30, 3

जून - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि-बुध-राहू, द्वितीयात शुक्र, तृतीयात मंगळ, सप्तमात केतू, नवमात शनी-प्लुटो, दशमात गुरू-नेपच्यून, व्ययात हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

लग्नी रवि आहे. राजमान्यता मिळेल. पराक्रमास जोर येईल. राजकारणात भाग घेणार्‍या कार्यकर्त्याला याची प्रचिती येईल. कामाच्या घाईगर्दीत भोजनाकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार नाही. त्यामुळे आहार कमी राहील. स्वभाव उदार राहील. थोडा फार लोभी राहील. बुद्धी तीव्र राहील. शारिरीकदृष्ट्या पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घेतली तर गंभीर आजार होणार नाही. मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

तृतीयात मंगळ आहे. प्रसिद्धीच्या झोतात याल. पराक्रमाला जोर येईल. सज्जनतेकडे कल राहील. लढाऊवृत्तीमुळे शत्रुंचा पराभव होईल.भावंडांसाठी खर्च करावा लागेल. कवी वर्गाला चांगल्या कविता सुचतील. दैव कृपेची प्रचिती येईल.

लग्नी राहू आहे. स्वतःच्या कुळाचा अभिमानाला स्वपराक्रमाची जोड देणे अधिक लाभदायक ठरेल. नातेवाईकांशी फारसे पटणार नाही. आयुष्याच्या सुरूवातीला आर्थिक परिस्थिती हलाखीची असली तरी हळुहळु प्रगती होऊन आर्थिक सुस्थिती निर्माण होईल.

स्त्रियांसाठी - द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. शेजारी पाजारी हेवा करतील. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल.

विद्यार्थ्यांसाठी -िविज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा - 2, 3, 6, 12, 13, 15, 16, 17, 19, 20, 25, 28, 29

जुलै - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी बुध-राहू, द्वितीयात रवि, तृतीयात मंगळ-शुक्र, सप्तमात केतू, नवमात शनी-प्लूटो, दशमात गुरू-नेपच्यून, व्ययात हर्शल अशी ग्रहस्थिती आहे.

दशमस्थानी गुरू आहे. पराक्रमाला जोर येईल. बर्‍याच वेळा यश येईल. स्थावर इस्टेटीपासून उपजिवीका होण्याइतके उत्पन्न मिळू शकेल. तेजस्वी वृत्ती राहील. उत्तम सल्लागार म्हणून प्रसिद्धी मिळेल. उठ सूठ रागावणे चांगले नाही. त्यावर नियंत्रण ठेवावे. लष्करी वृत्तीला अंकुश लावावा. काम पूर्ण झाल्याशिवाय चैन पडणार नाही. गुरुजनांवर प्रेम राहील. धैर्यशील वृत्तीमुळे कोणत्याही संकटात माघार घ्यावी लागणार नाही. जनसेंवेची हौस वाटेल. व्यापार, वैद्यकीय, यांत्रिकी कामे अथवा राजकृपा यातून अर्थप्राप्ती होईल.

लग्नी बुध आहे. प्रवास सुखदायक घडतील. आधि आर्थिक लाभही होईल. विद्याव्यासंगात भर पडेल. मित्रमंडळींशी मिळून मिसळून वागाल. चेहर्‍यावर प्रसन्नता झळकेल. अडचणीच्या वेळी मित्रांच्या मदतीला धावून जाल. स्वधर्मावर श्रद्धा राहील.

नवमात प्लूटो आहे. परदेशगमनासाठी यश मिळेल. अध्यात्मिक सामर्थ्य साधनेच्या सातत्यातून प्राप्त होईल. व्यवहार चातुर्यामुळे सांसारिक स्थिती उत्तम राहील.

स्त्रियांसाठी - तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी -विदयार्थीदशा हा खर म्हणजे जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहिल. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा - 1, 2, 3, 11, 12, 16, 18, 21, 25, 27, 28, 29

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com