Saturday, April 27, 2024
Homeभविष्यवेधनवीन कल्पनांद्वारे अर्थप्राप्ती होईल

नवीन कल्पनांद्वारे अर्थप्राप्ती होईल

जून – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयस्थानी केतू, चतुर्थात शनी, पंचमात-गुरू-नेपच्यून, षष्ठात मंगळ-राहू-हर्षल, सप्तमात शुक्र, अष्टमात रवि- बुध, व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

- Advertisement -

तुमची रास – राशीची आद्याक्षरे तो, ना,नी, नू, ने, नो, या, यी, यू अशी आहेत. राशीचे चिन्ह विंचू आहे. राशी स्वामी मंगळ. उत्तर दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग स्त्री आहे. म्हणून स्वभाव सौम्य. वर्ण- ब्राह्मण, कफ प्रवृत्ती. पाठविकारांनी त्रस्त रहाल. शुभ रत्न-पोवळे, शुभ रंग-लाल, शुभ वार – मंगळवार, देवता-विष्णु, हनुमान. शुभ अंक-9, शुभ तारखा-9/18/27, मित्रराशी- कर्क, मीन. शत्रु राशी- मेष, सिंंह, धनु. सूड घेण्याची वृत्ती. प्रिय व्यक्तीच्या संरक्षणासाठी प्राण पणाला लावाल. साहसी, कर्मठ, स्पष्टवादी.

अष्टमातील बुध शत्रुंचा नाश करण्यास समर्थ आहे. यशामुळे निर्माण झालेले शत्रू स्वतःच्या दुष्ट कारवायात अडकून प्रभावहीन होतील. समाजात छबी उजळेल व प्रगती होईल.

स्त्रियांसाठी – महिलांना पतीराजांचे सहकार्य उत्तम मिळेल. मात्र कलह टाळण्यासाठी नम्रतेचे पथ्य पाळणे चातुर्याचे ठरेल. उत्साह चांगला राहील. कलाकौशल्यात प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परीक्षेसाठी चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही.कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्यादृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा – 1, 2, 4, 6, 8, 11, 13, 15, 16, 19, 21, 22, 24, 30

जुलै – 2022

महिन्याच्या सुरूवातीला तृतीयात प्लूटो, चतुर्थात -शनि, पंचमात गुरू-नेपच्यून, षष्ठात मंगळ-राहू-हर्षल, सप्तमात – शुक्र, अष्टमात रवि-बुध, व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमस्थानातील गुरू हा स्वतंत्र भाग्ययोग आहे. वैभव प्राप्त होईल. विद्वत्तेचा लौकीक सर्वत्र पोहोचेल. सत्पुत्र प्राप्त होईल. वाडवडिलांच्या पुण्याईने भाग्योदय होईल. संततीसुख चांगले राहील. लेखनाची आवड असल्यास उत्तम लेखन होईल. लोकशिक्षात भाग घेण्याची संधी मिळेल. सट्ट्यासारख्या व्यवहारात भाग घ्यावा वाटेल.

अष्टमस्थानी असलेल्या रविमुळे नवविवाहीतांना लाभ होईल. विवाहानंतर अशा लोकांचा भाग्योदय होईल. नववधूवरील प्रेमाामुळे म्हणा किंवा अन्य काही कारणामुळे घरातील इतर मंडळींशी पटणार नाही. लहान गोष्टींवरून कलह निर्माण होईल.

षष्ठात राहू आहे. पराक्रमाला जोर येईल. ऐश्वर्य उपभोगावयास मिळेल. बुद्धीमत्ता तीक्ष्ण होईल. मोकळा स्वभाव असल्याने उदारपणा राहील.

स्त्रियांसाठी – महिलांचा स्वभाव प्रेमळ राहील. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती राहील. हे मात्र धोक्याचे राहील. सोने म्हणून पितळ हाती लागण्याचा संभव आहे.

विद्यार्थ्यांसाठी – पंचमात नेपच्यून आहे. विद्यार्थीदशा हा खरा तर जन्मभर चालविण्याचा वसा आहे. त्यातल्या त्यात तुम्ही नवीन शैक्षणिक वर्षाच्या उंबरठ्यावर असाल तर पंचमातील नेपच्यून योग्य शाखेत प्रवेश करून देईल.

शुभ तारखा – 1, 2, 7, 8, 15, 18, 20, 21, 24, 29

ऑगस्ट – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशी तृतीयस्थानी शनि- प्लूटो, षष्ठात गुरू-नेपच्यून, षष्ठात राहू-हर्षल, सप्तमात मंगळ, नवमात रवि-शुक्र , दशमात बुध अशी ग्रहस्थिती आहे.

सप्तमात मंगळ आहे. कौटुंबिक सुखात अडथळे येण्याची शक्यता आहे. अविवाहीतांनी प्रेमविवाहाच्या भानगडीत पडू नये. घरातील कलह घरातच मिटवावे. नवीन संबंध जोडू नये. व्यापार्‍यांनी सौदेे पुढ ढकलावे.

मगळ गुरू नवपंचम योग होत आहे. नवनवीन कल्पना काढून तुम्ही अर्थप्राप्ती करू शकाल. क्रीडा क्षेत्रात संबंधितांना उत्तम यश प्राप्त होईल. सामाजिक कार्य करणार्‍यांना समाजात आदर व सन्मान प्राप्त होईल. प्रकृतीची उत्तम साथ राहील.

तृतीयात शनी आहे. शत्रुपक्षावर मात करण्यात यश मिळेल. अकल्पित भाग्योदयाचे योग आहे. कामात एकाग्रता साध्य होईल. बौद्धिक कामात याची विशेष प्रगती होईल. पत्नीच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

स्त्रियांसाठी – भाग्यात शुक्र आहे. महिलांच्या व्यक्तीमत्वात सौंदर्याच्यादृष्टीने वृद्धी होईल. पती पुत्र सुख उत्तम राहील. मात्र कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांसाठी– पंचमात शुक्र आहे. विद्येतील प्रगतीसाठी तो शुभ आहे. वाडवडिलांच्या पुण्याई व आशिर्वादाने अभ्यासात मन एकाग्र होईल व टक्केवारी वाढविणे सोपे जाईल.

शुभ तारखा – 2, 3, 4, 9, 10, 13, 15, 16, 17, 20, 22, 28, 29, 30, 31

- Advertisment -

ताज्या बातम्या