सांपत्तीक आवक सुरळीत राहील

त्रैमासिक भविष्य - वृश्चिक
सांपत्तीक आवक सुरळीत राहील

ऑक्टोबर - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी केतू -शुक्र, द्वितीयात प्लूटो, तृतीयात शनि-गुरू, चतुर्थात नेपच्यून, षष्ठात हर्षल,सप्तमात राहू, दशमात लाभात रवि-मंगळ-बुध अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू अशी आहेत. राशीचे चिन्ह विंचू आहे. राशी स्वामी मंगळ, उत्तर दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग स्त्री आहे म्हणून स्वभाव सौम्य. वर्ण ब्राह्मण, कफ प्रवृत्ती, पाठीसंबंधी विकारांची काळजी घ्या. शुभ रत्न पोवळे. शुभ रंग-लाल, शुभवार- मंगळवार, देवता - शिव,हनुमान, भैरव. शुभ अंक - 8, शुभ तारखा- 8, 18, 27. मित्र राशी- कर्क, मीन. शत्रुराशी- मेष, सिंह, धनु. क्षमा करणार नाही. सूड घेण्याची वृत्ती. संधी मिळताच शत्रुवर वार कराल. प्रिय व्यक्तीच्या संरक्षणासाठी प्राण पणाला लावण्याची तयारी.

लग्नी शुक्र आहे. व्यक्तीमत्वाला झळाळी येईल. रोजच्या कामात दंग रहाल. स्वतःची जागा व संसार याबद्दल प्रेम राहील. हरहुन्नरीपणामुळे नवीन काम शिकून त्यापासून धनप्राप्ती कराल.

स्त्रियांसाठी -लग्नी शुक्र आहे. सौदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी - शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा - 2, 3, 8, 10, 12, 13, 14, 15, 17, 18, 19, 20, 21, 24,26, 28, 29

नोव्हेंबर - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शुक्र-केतू, द्वितीयात शुक्र, तृतीयात शनी- गुरू, चतुर्थात -नेपच्यून, षष्ठात हर्षल, सप्तमात राहू , व्ययात रवि-मंगळ-बुध अशी ग्रहस्थिती आहे.

चतुर्थात गुरू आहे. चतुर्थस्थानातील गुरुमुळे संसारात सुखी व्हाल. नावलौकीकात भर पडेल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. धिमा व समाधानी स्वभाव असल्यामुळे कोणत्याही अडचणीत पराभव होणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना याचा विशेष अनुभव येईल. जमीन जुमला व सांपत्तीक आवक सुरळीत राहील. भाग्योदयासाठी घरापासून दूर जाण्याची आवश्यकता नाही. पोकळ डामडौल मिरवण्याची हौस वाटेल. पण यामुळे लोकांत हसच होईल. अशा लोकांनी परदेशगमन करून भाग्य आजमावे.

तृतीयात शनि आहे. शत्रुपक्षामध्ये फाटाफूट करून त्यांच्यावर मात करण्यात यश मिळेल. अकल्पितपणे भाग्योदय होण्याचा योग आहे. सरकार दरबारी काम वाढेल. पुत्र व गृह यांचे उत्तम सुख लाभेल. आहार सिमीत व समतोल राहील. कामात एकाग्रता साध्य होईल. बौद्धिक कामात प्रगती होईल.

स्त्रियांसाठी - द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी - विदयार्थीदशा हा खर म्हणजे जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा - 1, 4, 5, 6, 9, 10, 12, 13, 16, 20, 21, 23, 24, 25, 28, 30

डिसेंबर - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी बुध-रवि-केतू, द्वितीयात शुक्र, तृतीयात शनि-प्लुटो, चतुर्थात गुरु-नेपच्यून, षष्ठात हर्षल, सप्तमात राहू, व्ययात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

लग्नी रवि आहे. राजमान्यता मिळेल. पराक्रमाला जोर येईल. कामाच्या गर्दीत भोजनाकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार नाही त्यामुळे आहार कमी राहील. स्वभाव उदार राहील. बुद्धी तीव्र राहील. मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

लग्नी बुध आहे. प्रवास सुखदायक घडतील. त्यातून आर्थिक लाभही होतील. विद्याव्यासंगात भर पडेल. मित्रमंडळींशी मिळून मिसळून वागाल. चेहर्‍यावर प्रसन्नता झळकेल. अडचणीच्या वेळी मित्रांच्या मदतीला धावून जाल. स्वधर्मावर श्रद्धा बसेल.

सप्तमात राहू आहे. पत्नीच्या स्वास्थ्याची काळजी घ्या. वैधमार्गाने विपुल धनप्राप्तीचे योग. प्रवासापासून लाभ होतील.

स्त्रियांसाठी - व्यक्तीमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी -विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा - 1, 3, 8, 9, 11, 13, 15, 19, 20, 21,24 , 25, 27, 28

Related Stories

No stories found.