स्वप्रयत्नाने धनप्राप्ती

त्रैमासिक भविष्य -वृश्चिक
स्वप्रयत्नाने धनप्राप्ती

सौ. वंदना अनिल दिवाणे

ऑगस्ट - 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी केतू-गुरू-प्लुटो तृतीयात शनी, पंचमात मंगळ,षष्ठात हर्षल, अष्टमात शुक्र- राहू, नवमात बुध, दशमात रवि अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे तो,ना,नी,

नू,ने,नो,या,यी,यू अशी आहेत. राशीचे चिन्ह विंचू आहे. राशी स्वामी मंगळ आहे. उत्तर दिशा फायद्याची. राशी लिंग स्त्री असल्यामुळे स्वभाव सौम्य. वर्ण - ब्राह्मण, कफ प्रवृत्ती, पाठीचे विकार संभवतात. शुभ रत्न -पोवळे, शुभ रंग- लाल, शुभ वार -मंगळवार, देवता- शिव , ेहनुमान व भैरवनाथ, शुभ अंक- 9, शुभ तारखा- 9,18,27. मित्र राशी-कर्क, मीन. शत्रु राशी- मेष, सिंह, धनु. चूक केल्यास क्षमा करणार नाही. सूड घेण्याची वृत्ती. संधी मिळताच शत्रुवर वार करील. प्रिय व्यक्तीच्या संरक्षणासाठी प्र्राण पणाला लावण्याची तयारी. रसायने, औषधी, व डॉक्टर्स यांच्यास्रा्रइभ चांगली रास. दृढनिश्चयी. साहसी, कर्मठ व स्पष्टवादी.

अष्टमात शुक्र आहे. पत्नीकडील नातेवाईकांकडून आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता. मात्र धनप्राप्तीच्या बाबतीत दोन गोष्टी लक्षात ठेवा धनप्राप्ती स्वकष्टावर आधारित असावी. कमी श्रमात किंवा विनाश्रम अधिक धनप्राप्तीच्या आशेने अवैध मार्गाचा अवलंब करू नये. भ्रष्टाचार सुरूवातीला अमृतासारखा गोड वाटला तरी त्याचा परिणाम शेवटी विषासारखा भयंकर असतो.

स्त्रियांसाठी - अष्टमात शुक्र आहे. महिलांना ‘ग‘ ची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष रहातील. कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी - विज्ञान व कला या दोन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवावी. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा - 2, 3, 4, 5, 7, 8, 11, 13, 15, 20, 21, 22, 23, 25, 28, 30, 31.

सप्टेंबर- 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी गुरू-केतू-प्लूटो तृतीयात शनी, चतुर्थात नेपच्यून, षष्ठात मंगळ- हर्षल, अष्टमात राहू, नवमात शुक्र, दशमात रवि, लाभात बुध अशी ग्रहस्थिती आहे.

एकादशात बुध आहे. राजकृपेने चांगले लाभ होतील. इष्ट हेतू साध्य होतील. शत्रुंनादेखील गोड बोलून वश कराल. संगीताची आवड असेल. सभा संमेलनात तेजस्वीपणा दाखवाल. मानसिक उन्नतीला एकादशातील बुध चांगला समजला जातो. अध्यात्मिक उन्नती साध्य करू शकाल. शिक्षक व प्राध्यापकांचा गौरव होईल. ज्योतिषशास्त्रात आवड असल्यास प्रगती होईल. धनस्थानी गुरू आहे. द्वितीय स्थानातील गुरूमुळे विद्वत्तेबद्दल विशेष नावलौकिक होईल. केवळ शब्दाने लोकांवर चांगली हुकूमत गाजवता येईल. आर्थिक आवक विपुल प्रमाणात होईल. सुग्रास भोजन प्राप्त होईल. द्वितीयात गुरु असणे हा भाग्यवृद्धीचा योग आहे. नेहमी आनंदी वृत्ती राहील. कौटुंबिक सुख उत्तम राहील. स्वप्रयत्नाने धनप्राप्ती होईल.

सप्तमात राहू आहे. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. अपघातातून अद्भूतपणे सुटका होईल. वैध मार्गाने विपुल धनप्राप्तीचे योग. प्रवासापासून लाभ होतील.

स्त्रियांसाठी - शुक्र भाग्यात आहे. महिलांच्या व्यक्तीमत्वात सौंद्यार्र्च्या दृष्टीने वृद्धी होईल. पती-पुत्र सुख उत्तम राहील. मात्र कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांसाठी - तीक्ष्ण बुद्धीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात चांगली प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात जास्त रस वाटेल. काहींना धाडसी प्रकारच्या खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा - 2, 3, 4, 6, 7, 10, 13, 14, 18, 24, 25, 26, 28, 29, 30.

ऑक्टोबर - 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी केतू, द्वितीयात गुरू-प्लूटो, तृतीयात शनी, चतुर्थात नेपच्यून, पंचमात मंगळ, षष्ठात हर्षल, सप्तमात राहू, दशमात शुक्र, व्ययात बुध अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमात मंगळ आहे. आर्थिक आवक उत्तम राहील. मित्रसुख कमी राहील. संततीविषयक चिंता निर्माण होण्याची शक्यता. मूर्खांची संगत टाळा. ऐशोआरामाची वृत्ती राहील. सट्ट्यासारख्या व्यवहारापासून दूर रहा. जवळपास प्रवास घडण्याची शक्यता आहे. क्रिडाक्षेत्राची आवड असलेल्यांना खेळात प्रगती होऊन पुढे जाण्याची संधी मिळेल. केमिकल्स, प्राणीशास्त्र, भूगर्भशास्त्र, याविषयाची संबंधित काम करणार्‍या लोकांची प्रगती होईल.

एकादशात रवि आहे. आर्थिक आवक वाढेल. मागे केलेल्या श्रमाचा मोबदला आता चांगल्य प्रकारे मिळू शकेल. पराक्रमाला जोर येईल. धार्मिक वृत्ती राहील. शत्रुंवर विजय मिळेल. संयम चांगला असल्यामुळे चरित्र शुद्ध राहील. मित्र चांगले व मोठ्या कुळातील मिळतील. हाताखालील लोकांकडून कसून काम करून घ्याल.

तृतीयात शनी आहे. शत्रुपक्षात फूट पाडून त्यांच्यावर मात करण्यात यशस्वी व्हाल. अकल्पितपणे भाग्योदय होण्याचा काळ आहे. सरकार दरबारी काम वाढेल. पुत्र व गृह यांचे सुख उत्तम राहील. आहार सिमीत पण समतोल राहील. कामात एकाग्रता साध्य होईल. बौद्धिक कामात प्रगती होईल.

स्त्रियांसाठी - दशमातील शुक्र महिलांना किचनमधील गॅस व मुलांच्या अभ्यासातून वेळ काढून अर्थार्जनासाठी व्यापार करण्याचा संदेश देत आहे. लेखिकांनी महिलांसाठी लेख लिहावे.

विद्यार्थ्यांसाठी -पंचमेश गुरू आहे. विद्येतील प्रगतीसाठी तो अतिशय शुभ आहे. विद्यार्थ्यांना वाडवडिलांच्या पुण्याई व आशिर्वादामुळे अभ्यासात मन एकाग्र होईल व टक्केवारी वाढविणे सोपे जाईल.

शुभ तारखा - 2, 4, 3, 10, 11, 13, 17, 19, 21, 22, 24, 25, 26, 28, 29, 31.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com