सांपत्तिक आवक सुरळीत राहील

त्रैमासिक भविष्य - धनू
सांपत्तिक आवक सुरळीत राहील

एप्रिल - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी शनि-प्लूटो, तृतीयात मंगळ-गुरू-शुक्र- नेपच्यून, चतुर्थात रवि-बुध, पंचमात राहू-हर्षल, लाभात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीचे चिन्ह शरीराचा वरचा भाग धर्नुधारी सज्ज पुरूषाचा असा पुरूष मुखरहीत घोड्यावर बसलेला असे आहे. राशी तत्त्व गुरू, तत्त्व अग्नी, त्यामुळे काहीसा रागीट स्वभाव. द्विस्वभाव राशी असल्याने लवकर निर्णय घेता येत नाही. पूर्व दिशा फायद्याची आहे. लिंग पुरूष असल्याने काही स्त्रीयांचे वागणे पुरुषी थाटाचे. वर्ण क्षत्रिय, स्वभाव क्रूर, पित्त प्रकृती, राशीचा अंमल मांड्यावर आहे. शुभ रत्न पुष्कराज, शुभ रंग-पिवळा, शुभ दिवस- गुरूवार, देवता- विष्णु, शुभ अंक-3, शुभ तारखा- 3/12/21/30. मित्र राशी- मेष, सिंह. शत्रु राशी- कर्क, वृश्चिक, मीन. गुणग्राही वृत्ती, अतिधूर्तता, व्यावहारिकता चांगली आहे.

चतुर्थात बुध आहे. एकाच उद्योगधंद्यात सारखे काम करत राहण्याचा कदाचित कंटाळा येईल. पण तसे करणे नुकसानकारक आहे. अशा धरसोड वृत्तीमुळे पैसा व वेळ वाया जातो. व पदरात काहीच पडत नाही. नातेवाईकांशी म्हणावे तसे पटणार नाही.

स्त्रियांसाठी - तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल. ललित कलात प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. क्लासेसमुळे बरीच धावपळ होईल.

शुभ तारखा - 2, 6, 7, 8, 10, 11, 13, 14, 15, 17, 21, 24, 26

मे - 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशीच्या धनुस्थानी प्लूटो, तृतीयात मंगळ-शनि, चतुर्थात गुरू-शुक्र-नेपच्यून, पंचमात राहू-रवि-हर्षल, षष्ठात-बुध, लाभात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयस्थानी मंगळ आहे. प्रसिद्धीच्या झोतात रहाल. पराक्रमाला जोर येईल. लढाऊ वृत्ती चांगली असल्यामुळे शत्रुंचा पराभव होईल. त्यात दैवी कृपेचा सहभाग असेल. भावंडासाठी खर्च करावा लागेल. दैवी कृपेची प्रचिती येईल.

चतुर्थस्थानातील गुरूमुळे संसारात सुखी व्हाल. नावलौकीकात भर पडेल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. समाधानी स्वभाव असल्यामुळे कोणत्याही अडचणीत पराभव होणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना याचा विशेष अनुभव येईल. जमीन जुमला व सांपत्तिक आवक सुरळीत राहील. भाग्योदयासाठी घरापासून जास्त दूर जाण्याची गरज नाही.

एकादशाला केतू आहे. पराक्रमाकडे कल राहील. सत्कर्मे कराल.

स्त्रियांसाठी - चतुर्थातील शुक्र महिलांना आनंदी वृत्ती प्रदान करील. कुटूंबात हुकूमाची राणी होऊ शकाल. हातात पैसा खेळत राहील. मनाप्रमाणे खरेदी कराल. पतीराजांची मर्जी बहाल होईल.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांनी स्वास्थाची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहीण्याचा सराव वाढविणे फायद्याचे राहि

शुभ तारखा - 1, 3, 4, 6, 7, 9, 10, 11, 13 19, 20, 22, 24, 26

जून - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी प्लूटो, तृतीयात शनि, चतुर्थात गुरू-मंगळ-नेपच्यून, पंचमात शुक्र-राहू-हर्षल, षष्ठात रवि- बुध, लाभात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमात शुक्र आहे. सरकार दरबारी वजन वाढेल. कन्यांचे सुस्थळी विवाह होऊन जावई सज्जन भेटतील. गूढशास्त्राचे आकर्षण वाटेल. देवीची उपासना लाभदायक असेल. शत्रुवर विजय मिळवाल. नवविवाहितांचा भाग्योदय होईल. तीर्थयात्रा घडण्याचे योग आहेत. ललितकला, लेखन, सट्टे, शेअर्स यांपासून लाभ होतील. सरकार दरबारी चांगले वजन राहील. कन्येचा विवाह जुळण्याचे योग आहेत.

पंचमात हर्षल आहे. सट्टे, लॉटरीचा नाद असेल तर तो सोडावा. संततीविषयक काही त्रास संभवतो. प्रेवप्रकरणात सावध रहावे. भावनेच्या भरात प्रेमप्रकरणात चूक होण्याच संभव आहे.

स्त्रियांसाठी - पती पत्नीचे आपापसात प्रेम राहील. शत्रुसमान नातेवाईकांच्या गुप्त कारवाया उघडकीस आणण्यात यश मिळेल. डामडौल दाखविण्यासाठी वायफळ खर्च करू नये. काटकसर करावी.

विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात अर्थिक प्रगती. आळस टाळावा. गेलेला वेळ परत येणार नाही.

शुभ तारखा - 1, 2, 4, 6, 8, 11, 13, 15, 16, 19, 21, 22, 24, 30

Related Stories

No stories found.