सांपत्तीक भरभराट होईल

त्रैमासिक भविष्य - धनु
सांपत्तीक  भरभराट होईल

सौ. वंदना अनिल दिवाणे

जानेवारी - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि-शुक्र, धनस्थानी शनि-बुध- प्लुटो,तृतीयात गुरू-नेपच्यून, पंचमात हर्षल, षष्ठात राहू , व्ययात मंगळ -केतू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीचे चिन्ह शरिराचा वरचा भाग धनुर्धारी सज्ज पुरूषाचा असा पुरूष मुखरहित घोड्यावर बसलेला असा आहे. राशी स्वामी गुरू, तत्त्व अग्नी, त्यामुळे काहीसा रागीट स्वभाव. द्विस्वभाव रास असल्यामुळे निर्णय लवकर घेता येत नाही. पूर्व दिशा फायद्याची आहे. लिंग पुरूष असल्याने काही स्त्रियांचे वागणे पुरूषी थाटाचे आहे. वर्ण - क्षत्रिय, स्वभाव - कूर, पित्त प्रकृती, राशीचा अंमल मांड्यावर आहे. शुभ रत्न पुष्कर, शुभ रंग- पिवळा, शुभ दिवस - गुरुवार, देवता-विष्णू, शुभ अंक -3, शुभ तारखा- 3/12/21/ 30. मित्र राशी- मेष व सिंह. शत्रु राशी- कर्क, वृश्चिक, मीन. गुणग्राही वृत्ती, अतिधूर्तता. व्यावहारिकता चांगली. स्वतःला डावलून दुसर्‍याचे कल्याण. मुडी स्वभाव.

लग्नी शुक्र आहे. व्यक्तिमत्वाला झळाळी येईल. कामात दंग रहाल. स्वतःची जागा व संसार याबद्दल प्रेम वाटेल. हरहुन्नरीपणामुळे कोणतेही नवीन काम लवकर आत्मसात करून धनप्राप्ती कराल.

स्त्रियांसाठी - कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी - तीक्ष्ण बुध्दीमत्ता राहील. त्यामुळे वार्षिक परिक्षा देणे जास्त अवघड जाणार नाही. लेखनाचा जेवढा सराव कराल तेवढी टक्केवारी वाढेल.

शुभ तारखा - 3, 4, 5, 8, 10, 11, 14, 18, 20, 22, 23, 26, 29

फेब्रुवारी - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ-शुक्र, धनस्थानी बुध-शनी-रवि, तृतीयात गुरू- नेपच्यून, पंचमात हर्षल, षष्ठात राहू, व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

धनस्थानातील बुध सांपत्तीक भरभराट प्राप्त करून देतो. कमिशन बेसिसवर चालणारे उद्योग सल्ला मसलत, लेखन, प्रकाशन यापासून उत्तम धनप्राप्ती होईल. धनसंग्रहास हा महिना चांगला आहे. बचत शक्य होईल. मात्र बचत सुरक्षित व खात्रीची वित्तसंस्थातून बचत करा. अभ्यास केल्यास वक्तृत्त् व उत्तम प्रगती करू शकाल. व्यापारी वर्गाला हा महिना उलाढालीच्या दृष्टीने चांगला आहे. धनप्राप्ती स्वतःच्या पराक्रमाने होईल. प्रवासात चोरी होणार नाही याची काळजी घ्या. वाचल्याशिवाय कोणत्याही कागदावर सही करू नये.

द्वितीयात शनी आहे. धनस्थानी शनी असल्याने आर्थिक आवक वाढवून काटकसरीचेे धडे शिकवील. आर्थिक व्यवहार जपून करा. भागीदारीच्या व्यवहारात सतर्क रहा.

स्त्रियांसाठी -महिलांना पतीराजांची उत्तम साथ मिळेल. कलह टाळण्यासाठी नम्रतेचे पथ्य पाळा. उत्साह चांगला राहील. कलाकौशल्यात प्रगती होऊ शकेल.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परिक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा - 3, 5, 6, 7, 13, 14, 15, 17, 18, 20, 21, 22, 24

मार्च - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशी धनस्थानी मंगळ-शुक्र, -बुध-शनि-प्लूटो, तृतीयात रवि-गुरू-नेपच्यून, पंचमात हर्षल, षष्ठात राहू,व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयात गुरू आहे. मनुष्य पराक्रमी असतो. मात्र अपेक्षेप्रमाणे सुस्थिती लवकर लाभणार नाही. पत्नीचा सल्ला फायद्याचा राहील. धनसंग्रहात अडचणी येतील. भावंडाकडून म्हणावे तसे सुख मिळणार नाही. शेजारी व मित्रांचे उत्तम सहकार्य लाभेल. कमी श्रमात अधिक धनप्राप्ती होईल. राजकीय कार्यकर्ते व नेत्यांना हा गुरू विशेष चांगला आहे. विशेष पराक्रम न दाखवता त्यांची भाग्यवृद्धी होईल. पण शत्रुसंख्या वाढेल.

पंचमात हर्षल आहे. सट्टे लॉटरीचा नाद असल्यास तो सोडावा कारण त्यात यश मिळणार नाही. संततीविषयक काही त्रास संभवतो. विवेकाची कास धरा. संततीच्या स्वास्थ्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

स्त्रियांसाठी - द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल.शेजारपाजारच्या सखी हेवा करतील.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थीदशा हा खर म्हणजे जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा - 3, 4, 5, 7, 12, 13, 15, 16, 19, 20, 25, 26, 28

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com