Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधसांपत्तीक आवक सुरळीत राहील

सांपत्तीक आवक सुरळीत राहील

सौ. वंदना अनिल दिवाणे

सप्टेंबर – 2022

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशी धनस्थानी प्लुटो-शनी, चतुर्थात गुरू-नेपच्यून, पंचमात राहू-हर्षल, षष्ठात मंगळ,नवमात रवि-शुक्र,दशमात बुध, लाभात केतू अशी ग्रहस्थितीे आहे.

तुमची रास – राशीचे चिन्ह शरिराचा वरचा भाग धनुर्धारी सज्ज पुरूषाचा. असा पुरूष मुखरहीत घोड्यावर बसलेला असे आहे. राशी स्वामी गुरू आहे. राशीचे लिंग पुरूष आहे त्यामुळे काही स्त्रीयांचे वागणे पुरुषी थाटाचे. तत्व अग्नी असल्यामुळे काहीसा रागीट स्वभाव. द्विस्वभाव राशी असल्याने लवकर निर्णय घेता येत नाही. पूर्वदिशा फायद्याची आहे. वर्ण- क्षत्रिय, पित्त प्रकृती. राशीचा अंमल मांड्यावर आहे. शुभ रंग-पिवळा, शुभ दिवस-गुरूवार, शुभ रत्न-पुष्कराज, शुभ अंक-3, शुभ तारखा-3/12/21. मित्र राशी- मेष, सिंह. शत्रू राशी- कर्क, वृश्चिक, मीन. गुणग्राही वृत्ती, अतिधूर्तता, व्यावहारिकता चांगली. मुडी स्वभाव.

पंचमात हर्षल आहे. सट्टे लॉटरीचा नाद असल्यास सोडावा कारण त्यात यश मिळणार नाही. संततीविषयक त्रास संभवतो. भावनेच्या भरात प्रेम प्रकरणात चूक होण्याचा संभव आहे.

स्त्रियांसाठी – धार्मिक वृत्तीमुळे मानसिक

स्वास्थ्य उत्तम राहील. परदेशगमन करणार्‍या महिलांचा भाग्योदय होईल. कलाक्षेत्रात विशेषतः लेखनात चांगले यश. पुत्रसुख उत्तम मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 1, 4, 7, 8, 10, 11, 12, 14, 17, 21, 22, 26, 27, 30

ऑक्टोबर – 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशी धनस्थानी शनी-प्लुटो, तृतीयात-नेपच्यून, चतुर्थात गुरू, पंचमात राहू- हर्षल, षष्ठात मंगळ, नवमात रवि-शुक्र-बुध, लाभात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

भाग्यातील रविमुळे जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण होईल. नावलौकीक वाढेल व नावाचा उदो उदो होईल. घरातील लोकांचा आनंद वाटण्याऐवजी तुमचा उत्साह भंग करण्याचा प्रयत्न करतील. मातापित्याशी म्हणावे तसे पटणार नाही. धार्मिक बाबतीत समभाव राहील.

षष्ठात मंगळ आहे. शत्रुंच्या कारवाया हाणून पाडण्याचे सामर्थ्य त्यात आहे. त्यामुळे शत्रुचा नाश करणे सहज शक्य होईल. स्थावरासंबंधी शुभ घटना घडतील. कौटुंबिक वातावरण शांत राहील. पंडीतजनांशी मैत्री वाढेल. वेळोवेळी मार्गदर्शनही मिळेल.

नवमात बुध आहे. पुत्र सुख उत्तम मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. तिही सरळ मार्गाने असेल. परदेशमगनाची संधी मिळेल. नवीन विचारप्रवाहाचे स्वागत कराल.

स्त्रियांसाठी –शुक्र भाग्यात आहे. महिलांच्या व्यक्तिमत्वात सौंदर्याच्या दृष्टीने वृद्धी होईल. पती-पुत्र सुख उत्तम राहील. मात्र कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांसाठी – बुद्धीमत्ता तीक्ष्ण राहील. त्यामुळे परीक्षा देणे जास्त अवघड जाणार नाही. लेखनाचा सराव जेवढा कराल तेवढा मार्कांचा टक्का वाढेल.

शुभ तारखा – 3, 4, 5, 8, 10, 11, 17, 18, 19, 21, 24, 26, 30, 31

नोव्हेंबर- 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशी धनस्थानी शनी-प्लुटो, तृतीयात नेपच्यून, चतुर्थात-गुरू, पंचमात राहू-हर्शल, सप्तमात मंगळ, लाभात रवि-बुध-शुक्र-केतू अशी ग्रहस्थिती आहे.

चतुर्थस्थानातील गुरूमुळे संसारात सुखी व्हाल. नावलौकीकात भर पडेल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. धिमा व समाधानी स्वभाव असल्यामुळे कोणत्याही अडचणीत पराभव होणार नाही. ज्येष्ठांना याचा विशेष अनुभव येईल. सांपत्तीक आवक नेहमीप्रमाणे सुरळीत राहील. भाग्योदयासाठी घरापासून जास्त दूर जाण्याची गरज नाही. भपक्याची हौस वाटेल. पोकळ डौल मिरवण्याची हौस निर्माण होईल. त्यामुळे लोकात हसू होण्याची शक्यता आहे. परदेशगमन करून भाग्य आजमावे.

द्वितीयातील शनी आर्थिक आवक चालू ठेवील. पण गती मात्र धीमी राहील. शनीची तृतीयदृष्टी सुखस्थानावर आहे. घरातील वातावरणात तणाव राहू नये. याविषयी काळजी घेणे आवश्यक आहे. धनस्थानचा आलेला शनी आर्थिक आवक वाढवून काटकसरीचे म्हणजे बचतीचे धडे शिकवील. आर्थिक व्यवहार जपून करावेत. भागीदारीच्या व्यवहारात सतर्क रहावे किंवा शक्यतो टाळावे.

स्त्रियांसाठी – ग्रहांची चौकट महिलांसाठी चांगली आहे. फॅशनची नवीन वस्त्रे व अलंकार खरेदी यासंबंधी मनाजोग्या गोष्टी घडतील. त्यासाठी पतीराजांची उत्तम साथ मिळेल. मुलांवर नियंत्रण ठेवावे.

विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यासात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. क्लासेसमुळे बरीच धावपळ होईल.

शुभ तारखा – 2, 3, 5, 6, 10, 12, 13, 14, 17, 20, 26, 28, 29

- Advertisment -

ताज्या बातम्या