Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधआर्थिक आवक उत्तम राहील

आर्थिक आवक उत्तम राहील

जून – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी तृतीयात शनी, चतुर्थात गुरू-नेपच्यून, पंचमात-मंगळ-राहू-हर्षल, षष्ठात-शुक्र , सप्तमात रवि- बुध, लाभात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

- Advertisement -

तुमची रास – राशीचे चिन्ह शरीराचा वरचा भाग धनुर्धारी सज्ज पुरूषाचा असा पुरूष मुखरहित घोड्यावर बसलेला असे आहे. राशी स्वामी – गुरू, तत्त्व-अग्नी, त्यामुळे काहीसा रागीट स्वभाव, द्विस्भाव रास असल्याने लवकर निर्णय घेता येत नाही. पुर्व दिशा फायद्याची आहे. लिंग पुरूष असल्याने काही स्त्रियांचे वागणे पुरूषी थाटाचे असते. वर्ण-क्षत्रिय, स्वभाव-क्रूर, पित्त-प्रकृती, राशीचा अंमल पायांवर आहे. शुभ रत्न-पुष्कराज, शुभ रंग-पिवळा, शुभ दिवस-गुरूवार, देवता-विष्णु, शुभ अंक-3, मित्र राशी- मेष, सिंह, शत्रुराशी-कर्क, वृश्चिक,मीन. गुणग्राही वृत्ती, अतिधूर्तता, व्यावहारिकता चांगली. मुडी स्वभाव.

पंचमात हर्षल आहे. सट्टे, लॉटरीचा नाद सोडा त्यात यश मिळण्याची शक्यता नाही. संततीविषयक काही त्रास संभवतो. प्रेम व्यवहारात सावध रहा. भावनेच्या भरात चूक होण्याचा संभव आहे. संततीची काळजी घेणे आवश्यक आहे.

स्त्रियांसाठी – धार्मिक वृत्तीमुळे महिलांचे मानसिक स्वास्थ उत्तम राहील. परदेशगमन करणार्‍या महिलांचा भाग्योदय होईल. कला क्षेत्रात विशेषतः लेखनात चांगले यश मिळेल. पुत्रसुख उत्तम मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थीदशा हा खरा तर जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा – 1, 2, 4, 6, 8, 11, 13, 15, 16, 19, 21, 22, 24, 30

जुलै – 2022

महिन्याच्या सुरूवातीला धनस्थानी प्लूटो, तृतीयात -शनि, चतुर्थात गुरू-नेपच्यून, पंचमात मंगळ-राहू-हर्षल, षष्ठात – शुक्र, सप्तमात रवि-बुध, व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

सप्तमात रवि आहे. प्रामाणिकपणामुळे व्यापार्‍यांना भागीदारीत व नोकरी करणार्‍यांना पदोन्नतीच्या रुपाने लाभ होण्याचा योग आहे. पूर्वार्धातील आनंदी वृत्तीला नंतर रागीटपणाचे गालबोट लागू नये याची काळजी घ्यावी. सन्माननीय व्यक्तीशी वादविवाद करण्याची हौस वाटेल. पण नकळत अपमान होऊ नये यावर लक्ष ठेवा. स्पर्धेत विजय मिळेल. राजकारणी लोकांनाची विशेष प्रचिती येईल.

पंचमस्थानी मंगळ आहे. आर्थिक आवक उत्तम राहील. मित्रसुख कमी. पुत्राविषयी काही चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. मुर्खांची संगत टाळा. ऐशोआरामाची वृत्ती राहील. क्रिडा क्षेत्रात रस असणार्‍यांना खेळात प्रगती होऊन पुढे जाण्याची संधी मिळेल. केमिकल्स, वैद्यकीय, भूगर्भशास्त्र विषयाशी संबंधित काम करणार्‍या लोकांची प्रगती होईल.

स्त्रियांसाठी – व्यक्तिमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेंट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी – शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा – 1, 2, 7, 8, 15, 18, 20, 21, 24, 29

ऑगस्ट – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशी धनस्थानी शनि- प्लूटो, चतुर्थात गुरू-नेपच्यून, पंचमात राहू-हर्षल, षष्ठात मंगळ, अष्टमात रवि-शुक्र , नवमात बुध, लाभात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

अष्टमातील शुक्र पत्नीकडील नातेवाईकांकडून आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता आहे. मात्र धनप्राप्तीच्या बाबतीत दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या. धनप्राप्ती स्वकष्टावर आधारित असावी. कमी श्रमात किंवा विनाश्रम अधिक धनप्राप्तीच्या आशेने त्यासाठी अवैध मार्गांचा अवलंब करू नये. भ्रष्टाचार सुरूवातीला गोड वाटला तरी परिणाम शेवटी भयंकर असतो.

चतुर्थ स्थानातील गुरूमुळे संसारात सुखी व्हाल. नावलौकीकात भर पडेल. धिमा व समाधानी स्वभााव असल्यामुळे कोणत्याही अडचणीत पराभव होणार नाही. ज्येष्ठ नागरिेकांना याचा विशेष अनुभव येईल. सांपत्तीक आवक सुरळीत चालू राहील. भाग्योदयासाठी घरापासून जास्त दूर जाण्याची गरज नाही. पोकळ डौल मिरवण्याची हौस वाटेल. त्यामुळे लोकांत हसे होण्याची शक्यता आहे. अशा लोकांनी परदेशगमन करून भाग्य आजमावे.

स्त्रियांसाठी –अष्टमात शुक्र आहे. महिलांना ‘ग‘ ची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष रहातील. कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी- विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा – 2, 3, 4, 9, 10, 13, 15, 16, 17, 20, 22, 28, 29, 30, 31

- Advertisment -

ताज्या बातम्या