त्रैमासिक भविष्य - धनु Quarterly future - Sagittarius

समाजातील छबी उजळेल
त्रैमासिक भविष्य - धनु Quarterly future - Sagittarius

सौ. वंदना अनिल दिवाणे

जुलै - 2021

ग्रहस्थिती- आठवड्याच्या सुरवातीला राशीच्या धनस्थानी शनी-प्लुटो, तृतीयात गुरु, नेपच्यून, पंचमात हर्शल, षष्ठात बुध, राहू, सप्तमात रवि, अष्टमात मंगल, शुक्र, व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास- तुमच्या (धनू) राशीचे चिन्ह शरिराचा वरचा भाग धनुर्धारी सज्ज पुरुषाचा असा पुरुष मुखरहिम घोड्यावर बसलेला आहे. राशी स्वामी गुरु, तत्व-अग्नी त्यामुळे काहीसा रागीट स्वभाव, द्विस्वभाव रास असल्याने लवकर निर्णय घेता येत नाही. लिंग पुुरुष त्यामुळे काही स्त्रियांचे वागणे पुरुषी थाटाचे. वर्ण-क्षत्रिय, स्वभाव-क्रूर, पित्त-प्रकृती. राशीच्या अंमल मांड्यावर आहे. शुभ रत्न-पुष्पराज, शुभ रंग-पिवळा, शुभ दिवस गुरुवार, देवता-विष्णू, शुभ अंक-3 शुभ तारखा 3, 12, 21, 30, मित्रराशी मेष व सिंह, शत्रुराशी कर्क, वृश्चिक, मीन, गुणग्राही वृत्ती, अतिधूर्तता, व्यावहारीकता चांगली. स्वतःला डावलून दुसर्‍याचे कल्याण. मुडी स्वभाव.

अष्टमात शुक्र आहे. पत्नीकडील नातेवाईकांकडून आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता दर्शवित आहे. मात्र धनप्राप्तीच्या बाबतीत दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. धनप्राप्ती शक्यतो स्वकष्टावर आधारीत असावी. कमी श्रमात किंवा विनाश्रम अधिक धनप्राप्तीच्या आशेने त्यासाठी अवैध मार्गाचा अवलंब करु नये. भ्रष्टाचार सुरुवातीला अमृतासारखा गोड वाटला तरी त्याचा परिणाम शेवटी विषासारखा भयंकर असतो.

स्त्रियांसाठी- शुक्र अष्टमात आहे, स्त्री वर्गाला अभिमानाची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व पुढे कष्टकरी असे होऊ नये. यासाठी जागरुक राहावे. पतीराज मात्र खुश राहतील. त्यामुळे कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडू देणार नाहीत.

विद्यार्थ्यांसाठी- माता-पिता, गुरुवर्ग वृद्धांच्या बोलण्याला लेक्चरबाजी न समजता त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा, विशेषतः विद्येची आवड असणार्‍या मित्रांची निवड करावी म्हणजे अभ्यासत उत्तम क्रांती होईल.

शुभ ता. 1, 2, 3, 11, 12, 16, 18, 21, 25, 27, 28, 29.

ऑगस्ट - 2021

महिन्याच्या सुरवातीला राशीच्या धनस्थानी शनी-प्लूटो, तृतीयात गुरु, नेपच्यून, पंचमात हर्शल, षष्ठात राहू अष्टमात रवि-बुध, नवमात मंगल-शुक्र, व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे. अष्टमातील बुध शत्रुंचा नाश करण्यास समर्थ आहे. तुमच्या यशामुळे निर्माण झालेले शत्रू स्वतःच्याच दृष्ट कारवायात अडकून प्रभावहीन होतील. अतिथी सत्काराची आवड असल्याने व्यवसायाच्या संबंधित आलेले पाहुणे खुश होऊन तुमची समाजातील छबी आणखीनच उजळेल. प्रगती होईल. नवमात मंगळ आहे. स्वभाव काहीसा लहरीच उतावला राहिल. शंकराची उपासना केल्यास या दोषावर नियंत्रण होऊ शकेल. पत्नीच्या नातेवाईकांकडून मदतीसाठी विचारणा होण्याची शक्यता आहे.

पंचमात हर्शल आहे. सट्टे लॉटरीचा नाद असल्यास तो सोडावा कारण त्यात यश मिळण्याची शक्यता नाही. संतती विषयक काही त्रास संभवतो. प्रेम व्यवहारात सावध राहावे. कायद्याला व शिष्टाचाराला धरुन नसतात. प्रेमाचे व्यवहार विलक्षण राहतील. भावनेच्या भरात प्रेमप्रकरणात चूक होण्याचा संभव आहे. विवेकाची श्वास धरावी.

संततीच्या स्वास्थ्याची काळजी घेणे आवश्यक आहे. द्वितीयात शनी आहे. आर्थिक आवक चालू राहील; परंतु गती मात्र धीमी राहील. शनीची तृतीय दृष्टी सुखस्थानावर आहे. घरातील वातावरणात तणाव राहू नये. या विषयी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार जपून करावेत. भागीदारीचे व्यवहारात सतर्क राहावे किंवा शक्य तो टाळावेत.

स्त्रियांसाठी- नवमात शुक्र आहे. महिलांच्या व्यक्तीमत्वात सौंदर्याच्यादृष्टीने वृद्धी होईल. पती-पुत्र सुख उत्तम राहील मात्र कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांसाठी- तीक्ष्ण बुद्धीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात चांगली प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात जास्त रस वाटेल. काहींना धाडसी प्रकारच्या खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ ता.- 4, 5, 9, 10, 11, 13, 14, 15, 19, 20, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 30, 31.

सप्टेंबर - 2021

ग्रहस्थिती- महिन्याच्या सुरवातीला राशीच्या धनस्थनी शनी-प्लुटो, तृतीयात गुरु नेपच्यून, पंचमात हर्शल, षष्ठात राहू नवमात रवि-मंगल, दशमात बुध, शुक्र, व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

भाग्यातील रविमुळे जनमासात चांगली प्रतिमा तयार होईल. नावलौकीक वाढेल. बाहेर उदोउदो होईल. घरच्या लोकांना त्याचा आनंद वाटण्याऐवजी उलट ते तुमचा उत्साह भंग करण्याचा प्रयत्न करतील. माता-पित्याशी म्हणावे असे पटणार नाही. विचारातील ‘जनरेगशन गॅप’मुळे एकमेकांचे विचार पटणार नाही. धार्मिक बाबतीत समभाव राहील.

तृतीयस्थानी गुरु असता मनुष्य पराक्रमशील असतो. मात्र अपेक्षेप्रमाणे सुस्थिती लवकर लाभणार नाही. पत्नीचा सल्ला फायद्याचा राहील. कृपणपणा (कंजुसपणा) करण्याकडे कल राहिल. धन संग्रहात अडचणी येतील. बांधवाकडून म्हणावे असे सुख मिळणार नाही. शेजारी व मित्र यांचे उत्तम सहकार्य प्राप्त होईल. राजकीय कार्यकर्ते नेत्यांना हा गुरु विशेष चांगला आहे.

पराक्रम न दाखविताही त्यांची भाग्यवृद्धी होईल. मात्र शत्रू संख्या वाढेल. जेष्ठात राहू आहे. आतापर्यंत त्रासदायक ठरलेल्या शत्रुंचा समाचार घेण्याची वेळ आता प्राप्त झाली आहे. त्यांच्याशी धाडसाने दोन हात केल्यास त्यांचा पूर्ण पराभव करण्यास निश्चितपणे यश मिळेल. त्यानंतर मात्र विरोधी लोकांना तुमच्यासमोर उभे राहण्याचे देखील धाडस राहणार नाही.

स्त्रियांसाठी-दशमातील शुक्र महिलांना किचनमधील गॅस व मुलांच्या अभ्यासातून वेळ काढून अर्थाजनासाठी व्यापार करण्याचा संदेश देत आहे. लेखिकांना महिला संबंधित लेख चांगले जमतील.

विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यासात मन लागेल. उत्साह दांडगा राहिल. सध्याच्या क्लास पद्धतीमुळे बरीच धावपळ होईल.

शुभ ता. 1, 3, 7, 8, 9, 10, 13, 14, 15, 16, 19, 21, 23, 29, 30.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com