Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधसासरवाडीकडून आर्थिक सहकार्याची शक्यता

सासरवाडीकडून आर्थिक सहकार्याची शक्यता

सौ. वंदना अनिल दिवाणे

ऑगस्ट – 2020

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी केतू-गुरू-प्लुटो द्वितीयात शनी, तृतीयात नेपच्यून, चतुर्थात मंगळ,पंचमात हर्षल, सप्तमात शुक्र- राहू, अष्टमात बुध, नवमात रवि अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीचे चिन्ह शरीराचा वरचा भाग धनुर्धारी सज्ज पुरूषाचा असा पुरुष मुखरहीत घोड्यावर बसलेला आहे. राशी स्वामी गुरू, तत्त्व-अग्नी, त्यामुळे काहीसा रागीट स्वभाव, द्विस्वभाव रास असल्याने लवकर निर्णय घेता येत नाही. पर्व दिशा फायद्याची. लिंग पुरूष असल्याने काही स्त्रियांचे वागणे हे पुरूषी थाटाचे आहे. वर्ण – क्षत्रिय, स्वभाव- क्रूर, पित्त प्रकृती, राशीचा अंमल मांड्यावर आहे. शुभ रत्न – पुष्कराज, शुभ रंग पिवळा, शुभ दिवस गुरूवार, देवता- विष्णु, शुभ अंक- 3, शुभ तारखा – 3,12,21,30. मित्र राशी- मेष व सिंह, शत्रु राशी-कर्क, वृश्चिक, मीन. गुणग्राही वृत्ती, अतिधुर्तता, व्यावहारिकता चांगली. स्वतःला डावलून दुसर्‍यांचे कल्याण, लहरी स्वभाव. नवमात रवि आहे. जनमानसात चांगली प्रतिमा तयार होईल. नावलौकिक वाढेल. बाहेर उदो उदो होईल. घरच्या लोकांना आनंद वाटण्याऐवजी उत्साहात भंग करण्याचा प्रयत्न करतील. माता-पित्याशी म्हणवे तसे पटणार नाही. विचारातील जनरेशन गॅपमुळे एकमेकांचे विचार एकमेकांना पटणार नाही. धार्मिक बाबतीत समभाव राहील.

स्त्रियांसाठी – सप्तमात शुक्र आहे. वैवाहिक सुख चांगले राहील. नवविवाहीतांचा भाग्योदय होईल. लोकरंजन करणार्‍या संस्थातून प्रगती होऊन प्रयत्न केल्यास आर्थिक लाभ होऊ शकतो.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांची शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू असतील.

शुभ तारखा – 2, 3, 4, 5, 7, 8, 11, 13, 15, 20, 21, 22, 23, 25, 28, 30, 31.

सप्टेंबर- 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशी गुरूस्थानी गुरू-केतू-प्लूटो द्वितीयात शनी, तृतीयात नेपच्यून, पंचमात मंगळ- हर्षल, सप्तमात राहू, अष्टमात शुक्र, नवमात रवि, दशमात बुध अशी ग्रहस्थिती आहे. अष्टमात शुक्र आहे. पत्नीकडील नातेवाईकांकडून आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता दर्शवित आहे. मात्र धनप्राप्तीच्या बाबतीत दोन गोष्टी लक्षात ठेवा धनप्राप्ती शक्यतो स्वकष्टाची असावी. कमी श्रमात किंवा विनाश्रम अधिक धनप्राप्तीच्या आशेने त्यासाठी अवैध मार्गाचा अवलंब करू नये. भ्रष्टाचार सुरूवातीला अमृतासारखा गोड वाटला तरी त्याचे परिणाम विषासारखे भयंकर होतो. लग्नी गुरू आहे. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यक्तीमत्व प्रभावशाली होईल. संसारात चातुर्याने वागाल. उत्तम मित्र मिळतील. धार्मिक ग्रंथ वाचनाची आवड लागेल. नावलौकिकात भर पडेल. कायद्याबाहेर जाणे आवडणार नाही. वाढत्या वयात शरीर स्थूल होण्याची भिती आहे. चालण्याचा व्यायाम करा. उच्चपदाची प्राप्ती होईल. विद्याव्यासंगात रस वाटेल. समतोल व न्यायी स्वभावामुळे लोकप्रियता वाढेल.

स्त्रियांसाठी – अष्टमात शुक्र आहे. अभिमानाची बाधा संभवते. त्यातून वाद होण्याची संभावना आहे. पतीदेव खूष असतील. कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही..

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थीदशा हा खर तर जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील.

शुभ तारखा – 2, 3, 4, 6, 7, 10, 13, 14, 18, 24, 25, 26, 28, 29, 30.

ऑक्टोबर – 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी गुरू-प्लूटो, द्वितीयात शनी, तृतीयात नेपच्यून, चतुर्थात मंगळ, षष्ठात राहू, नवमात शुक्र, दशमात रवि, लाभात बुध, व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

चतुर्थात मंगळ आहे. पत्नाचा शब्द टाळता येणार नाही. त्याचा परिणाम मातृसुखात अडचणी येण्याचा परिणाम दर्शवतो. वाहनामुळे अपघात होऊ नये याची काळजी घ्या. सावध रहाणे चांगले. इस्टेटीचे व्यवहार पुढे ढकला. घरातील वृद्धांशी जमवून घ्या. नोकरी- व्यवसायाच्या बाबतीत परिस्थिती उन्नतीकारक राहील. कापूस, चांदी, हिरे व्यापार्‍यांसाठी चांगला महिना आहे. बंधुसुख उत्तम आहे.

पंचमात हर्शल आहे. सट्टा, लॉटरीचा नाद असल्यास तो सोडावा. संततीविषयी काही त्रास संभवतो. भावनेच्या भरात प्रेम प्रकरणांमध्ये काही चूक होण्याचा संभव आहे. विवेकाची कास धरावी.संततीच्या स्वास्थ्याची काळजी घेणे आवश्य आहे.

स्त्रियांसाठी – नवमात शुक्र आहे. सौंदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल. कामाचा ताण वाढेल.

विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्ण बुद्धीमत्ता व स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात जास्त रस वाटेल. काहींना धाडसी प्रकारच्या खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 2, 4, 3, 10, 11, 13, 17, 19, 21, 22, 24, 25, 26, 28, 29, 31.

- Advertisment -

ताज्या बातम्या