Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधआर्थिक आवक वाढेल

आर्थिक आवक वाढेल

सौ. वंदना अनिल दिवाणे

जानेवारी – 2023

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी गुरू, द्वितीयात राहू-हर्षल. तृतीयात मंगळ, अष्टमात केतू , दशमात रवि-बुध, लाभात शुक्र-शनी-प्लुटो, व्ययात नेपच्यून अशी ग्रहस्थितीे आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची अशी आहेत. राशीचे चिन्ह एकमेकांच्या विरूद्ध तोंड केलेल्या माश्यांची जोडी आहे. राशी स्वामी गुरू, तत्व जल, राशी द्विस्वभाव असल्याने निर्णयाच्या बाबतीत तळ्यात मळ्यात सुरू असते. उत्तर दिशा फायद्याची आहे. लिंग-स्त्री, सत्वगुणी, वर्ण-ब्राह्मण, स्वभाव-सौम्य, कफ प्रवृत्ती, राशीचा अंमल पायावर आहे. पायाच्या दुखापतीविषयी सावध रहा. शुभ रत्न- पुष्कराज, शुभ रंग-पिवळा, शुभदिवस- गुरूवार, देवता- विष्णु, मित्रराशी-कर्क, वृश्चिक, शत्रुराशी- मेष, सिंह, धनु. अध्यात्मप्रेमी, भावनाप्रधान, अध्ययनयील, विनम्र, कल्पनाप्रिय, उतावळा, अनिश्चितता, परिश्रमी, इमानदार, स्वप्रयत्नाने प्रगती होईल.

दशमस्थानातील रविमुळे खात्रीने महत्त्व प्राप्त होईल. विशेषतः राजकारणी लोकांना याची जास्त प्रचिती येईल. अलिकडच्या काळात पिता पुत्राचे म्हणावे तसे पटत नाही. परंतु तुम्हाला मात्र पितृसुख उत्तम मिळेल.

स्त्रियांसाठी – पती पत्नीचे आपापसात प्रेम चांगले राहील.नातेवाईकांच्या गुप्त कारवाया उघडकीस आणण्यात यश मिळेल. डामडौल दाखविण्यासाठी वायफळ खर्च करू नये काटकसर करावी.

विद्यार्थ्यांसाठी –विद्यार्थ्यांची बुद्धी तीक्ष्ण राहील. त्यामुळे वार्षिक परीक्षा देणे जास्त अवघड वाटणार नाही. या महिन्यात लेखनाचा सराव जितका वाढवाल तितक्या प्रमाणात मार्क्स वाढतील.

शुभ तारखा -1, 4, 5, 9, 11, 14, 15, 22, 24, 26, 27

फेब्रुवारी-2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी गुरू-शुक्र-नेपच्यून, द्वितीयात राहू-हर्शल, तृतीयात- मंगळ, अष्टमात केतू , नवमात – रवि, व्ययात रवि-बुध-शनि अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयास्थानी मंगळ आहे. प्रसिद्धीच्या झोतात याल. पराक्रमाला जोर येईल. सज्जनतेकडे कल राहील. लढाऊ वृत्ती चांगली राहील्यामुळे शत्रुचा पराभव होईल. दैवी कृपेचाही भाग असेल. भावंडासाठी खर्च करावा लागेल. कवी वर्गाला चांगल्या कविता सुचतील.

दशमात बुध आहे. उद्योग, नोकरी व्यवसायाचक स्थान, विद्याव्यासंगात वृद्धी होईल. राजकारण्यांची लोकप्रियता वाढेल. अनेक प्रकारच्या धंद्यात उत्तम यश मिळेल. वक्तृत्त्वाला बहर येईल. प्रतिभेच्या परिस्पर्शाने पुनीत झालेले लेखन लेखकाच्या लेखणीतून उतरेल. सज्जनांची संगत प्राप्त होईल. या सर्वांचा परिणाम म्हणजे आर्थिक आवक वाढेल. ती ही सन्मार्गाने असल्यामुळे तणावरहीत स्थिती राहील.

व्ययातला शनी धार्मिक बाबतीत स्वतंत्र मते असलर तरी ईश्वरावर पूर्ण श्रद्धा राहील. आळसाचा आळस करा. उत्साहाने कामाला लागावे यश तुम्हाला शोधत येईल. शनिला मेहनत व कष्ट करणारी व्यक्ती आवडते. फळ देतांना तो विलंब

करतो खरा पण हात आखडता घेत नाही.

स्त्रियांसाठी – द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक आहे.

विद्यार्थ्यांसाठी – अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेला वेळ परत येत नाही.

शुभ तारखा – 3, 4, 6, 7, 8, 10, 11, 14, 16, 17, 22, 24, 25, 28

मार्च – 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी नेपच्यून-शुक्र-गुरू , द्वितीयात राहू-हर्षल, तृतीयात मंगळ, अष्टमात केतू, नवमात रवि, व्ययात रवि-बुध-शनी अशी ग्रहस्थिती आहे.

लग्नी गुरू आहे. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यकतीमत्व प्रभावशाली राहील. संंसारात फार चातुर्याने घ्याल. उत्तम मित्र मिळतील. धार्मिक ग्रंथ वाचण्याची आवड वाटेल. शरीर प्रकृती चांगली राहील. नावलौकीकात भर पडेल. वाढत्या वयात स्थूल असण्याची भीती असल्याने चालण्याचा व्यायाम करावा. वरिष्ठांच्या कृपेने उच्चपदप्राप्ती होईल. हाताखालच्या लोकांकडून काम करून घेण्याची कला अवगत होईल. सरळ स्वभाव राहील. विद्याव्यासंगात रस राहील. न्यायी व समतोल स्वभावामुळे लोकप्रियता मिळेल. राजकारण्यांना याची विशेष प्रचिती येईल.

द्वितीयातील हर्शल कौटुंबिक खर्चाविषयी अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे. मात्र आर्थिक शिस्त पाळल्यास तसा त्रास होणार नाही. मोठमोठ्या योजना आखण्याचे काम स्थगित ठेवून पुढे ढकलावे. वाहनासंबंधित संस्थांमधून नोकरी मिळण्यास हा काळ चांगला आहे. आंथरूण पाहून पाय पसरावे.

स्त्रियांसाठी –लग्नी शुक्र आहे. सौंदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी-विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परिक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा – 1, 4, 5, 8, 9, 11, 16, 17, 22, 23, 27, 28, 29, 30, 31

- Advertisment -

ताज्या बातम्या