आर्थिक स्थिती उत्तम राहील

त्रैमासिक भविष्य - मीन
आर्थिक स्थिती उत्तम राहील
त्रैमासिक भविष्य - मीन Quarterly future - Pisces

एप्रिल - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि-बुध, द्वितीयात राहू-हर्षल,अष्टमात केतू लाभात शनी-प्लूटो, व्ययात मंगळ-गुुरू-शुक्र-नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची अशी आहेत. राशीचेचिन्ह एकमेकांच्या विरूद्ध तोंड केलेल्या माशांची जोडी असे आहे. राशी स्वामी- गुरू, तत्त्व- जल, राशी द्विस्वभावी असल्याने निर्णयाच्या बाबतीत सदैव तळ्यात मळ्यात चालू असते. उत्तर दिशा फायद्याची आहे. लिंग स्त्री, सत्वगुणी, वर्ण - ब्राह्मण, स्वभाव-सौम्य, कफ प्रवृत्ती. राशीचा अंमल पायांवर आहे. शुभ रत्न पुष्कराज, शुभ रंग- पिवळा, शुभ दिवस- गुरूवार, देवता- विष्णू, मित्रराशी-कर्क, वृश्चिक. शत्रुराशी- मेष, सिंह, धनु. अध्यात्मप्रेमी, भावनाप्रधान, विनम्र, हयगयी वृत्ती, परिश्रमी, इमानदार.

लग्नी बुध आहे. प्रवास सुखदायक घडतील. त्यातून आर्थिक लाभ होतील. विद्याव्यासंगात भर पडेल. मित्रांशी मिसळून वागाल. चेहर्‍यावर प्रसन्नता झळकेल. स्वधर्मावर चांगली श्रद्धा असेल.

स्त्रियांसाठी - द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक आहे.

विद्यार्थ्यांसाठी - तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा - 2, 6, 7, 8, 10, 11, 13, 14, 15, 17, 21, 24, 26

मे - 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी गुरू-शुक्र-नेपच्यून, द्वितीयात राहू-रवि-हर्षल, तृतीयात-बुध, अष्टमात केतू, लाभात प्लूटो, व्ययात मंगळ-शनि, अशी ग्रहस्थिती आहे.

द्वितीयात रवि आहे. त्यामुळे वडिलमंडळीकडून आर्थिक सहकार्याची शक्यता निर्माण करीत आहे. पिताश्रीकडून आर्थिक सहकार्याची शक्यता आहे. खर्चिक, उदार स्वभावाला अंकुश लावा. अन्यथा कर्जाचा विचार करावा लावेल. पूर्वार्ध चांगला आहे. कर्जापासून शक्यतो दूर रहावे. कर्ज घेतले असल्यास हप्ते वेळेवर भरण्याची काळजी घ्या. पत्नीच्या प्रकृतीची काळजी घ्या.

लग्नी शुक्र आहे. व्यक्तीमत्वाला झळाळी मिळेल. नेहमी कामात दंग रहाल. स्वतःची जागा व संसार याबद्दल प्रेम वाटेल. हरहुन्नरीपणामुळे नवीन काम आत्मसात करून त्यापासून धनप्राप्ती कराल. कामात व्यस्त रहाणे आवडेल. विवाहोत्सुक तरूणांना सुंदर पत्नी मिळेल.

स्त्रियांसाठी - लग्नी शुक्र आहे. सौदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांनी स्वास्थाची काळजी घ्यावी. मे महिना सुट्टीचा महीना खेळ व मनोरंजन याकडे लक्ष न देता पुढील वर्षाच्या अभ्यासाची तयारी करावी म्हणजे शैक्षणिेक वर्ष आरामदायी जाईल.

शुभ तारखा - 1, 3, 4, 6, 7, 9, 10, 11, 13 19, 20, 22, 24, 26

जून - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी गुरू-मंगळ-नेपच्यून, द्वितीयात शुक्र-राहू-हर्षल, तृतीयात रवि- बुध, अष्टमात केतू, व्ययात शनि अशी ग्रहस्थिती आहे.

व्ययात शनि आहे. धार्मिक बाबतीत स्वतंत्र मते असली तरी ईश्वरावर पूर्ण श्रद्धा राहील. आळसाचा आळस करावा. उत्साहाने कामाला लागा यश तुम्हाला शोधत येईल. शनिला कष्ट करणारी व्यक्ती आवडते. फळ देतांना तो विलंब करतो खरा पण देतांना हात आखडता घेत नाही.

लग्नी गुरू आहे. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. संसारात चातुर्याने वागाल. धार्मिक ग्रंथ वाचण्याची आवड वाटेल. शरीरप्रकृती चांगली राहील. नावलौकीकात भर पडेल. वाढत्या वयाबरोबर शरीर स्थूल भिती त्यासाठी चालण्याचा नियमीत व्यायाम करावा. वरिष्ठांच्या कृपेने उच्चपदप्राप्ती होईल. हातखालील लोकांकडून काम करून घेण्याची कला अवगत होईल. सरळ स्वभाव राहील. न्यायी व समतोल स्वभावामुळे लोकप्रियता वाढेल.

स्त्रियांसाठी - द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही.शेजार पाजारच्या सखी तुमचा हेवा करतील.

विद्यार्थ्यांसाठी- शाळा नुकत्याच सुरू झालेल्या असतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेला वेळ परत येणार नाही.

शुभ तारखा - 1, 2, 4, 6, 8, 11, 13, 15, 16, 19, 21, 22, 24, 30े

Related Stories

No stories found.