धनसंग्रह करणे शक्य

त्रैमासिक भविष्य - मीन
त्रैमासिक भविष्य - मीन
त्रैमासिक भविष्य - मीन Quarterly future - Pisces

ऑक्टोबर - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी हर्शल, तृतीयात राहू, सप्तमात रवि-मंगळ-बुध, नवमात शुक्र- केतू, दशमात प्लूटो, लाभात शनी- गुरू व्ययात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षर दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची अशी आहेत. राशीचे चिन्ह एकमेकांच्या विरूद्ध तोंड केलेल्या माशांची जोडी असे आहे. राशी स्वामी गुरू, तत्व- जल, राशी द्विस्वभाव असल्याने निर्णयाच्या बाबतीत सदैव तळ्यात मळ्यात चालू असते. उत्तर दिशा फायद्याची आहे. लिंग स्त्री. सत्वगुणी- वर्ण ब्राह्मण, स्वभाव-सौम्य, कफ प्रवृत्ती, राशीचा अंमल पायावर आहे. सावध रहा. शुभ रत्न - पुष्कराज, शुभ रंग- पिवळा, शुभ दिवस - गुरूवार, देवता- विष्णु, मित्र राशी -कर्क,वृश्चिक, शत्रुराशी- मेष, सिंह, धनु. अध्यात्मप्रेमी, विनम्र, कल्पनाप्रिय, हयगय वृत्ती, अनिश्चितता, परिश्रमी, इमानदार, स्वप्रयत्नाने प्रगती होईल.

व्दितीयातील हर्षल कौटुंबिक खर्चाविषयी अडचणी निर्माण करण्याच शक्यता आहे. मात्र आर्थिक

शिस्त पाळल्यास त्रास होणार नाही. वाहनासंबंधित संस्थातून नोकरी मिळण्यास हा काळ चांगला आहे. अंथरूण पाहून पाय पसरावे. अन्यथा मोठ्या योजना अर्ध्यातच राहतील.

स्त्रियांसाठी - भाग्यात शुक्र आहे. महिलांच्या व्यक्तीमत्वात सौर्द्यांच्या दृष्टीने वृद्धी होईल. पती-पुत्र सुख उत्तम राहील. कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे .

विद्यार्थ्यांसाठी - शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा - 2, 3, 8, 10, 12, 13, 14, 15, 17, 18, 19, 20, 21, 24,26, 28, 29

नोव्हेंबर - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशी धनस्थानी हर्षल,तृतीयात राहू, अष्टमात रवि-मंगळ-बुध, नवमात केतू, दशमात शुक्र, लाभात शनि-गुरू-प्लुटो, व्ययात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

लाभात शनि आहे. शनी भरपूर लाभ देईल. धनप्राप्तीच्या बाबतीत साडेसातीतून तूर्त सुटका झाल्याने याची प्रचीती येईल. तेजस्वीपणाला धार चढेल. कुरघोडी करणारे शत्रु नष्ट होतील किंवा सुतासारखे सरळ होतील. धनसंग्रह करणे शक्य होईल. सत्संगाची गोडी वाटेल. स्त्रियांना आवश्यक असलेल्या वस्तूंचा व्यापार करणार्‍या व्यापार्‍यांना विशेष लाभ होतील. मुलांच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे. लबाड नातेवाईक किंवा मित्रांकडून फसवणूक होण्याची शक्यता.

व्ययस्थानी गुरू आहे. वितंडवादावर नियंत्रण ठेवा. ब्रम्हाडाच्या पाठीमागे असलेल्या ईश्वराच्या सत्तेबद्दल विश्वास वाटणार नाही. विनाकारण भटकण्याची सवय कमी करा. पैसा अनाठायी खर्च करू नये. नातेवाईकांशी पटणार नाही. कोणाशी मैत्री करावा व करू नये याचा विवेक बाळगावा. धार्मिक संस्थेचे अधिपत्य करू शकाल. अध्यात्मात प्रगती होईल. एकांत स्थळापासून लाभ होतील. लोकांशी संबंध नसलेल्या खात्यात नोकरी मिळेल.

स्त्रियांसाठी - धार्मिक वृत्तीमुळे महिलांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. परदेशमगन करणार्‍यांचा भाग्योदय होईल. कलाक्षेत्रात विशेष यश मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी -विदयार्थीदशा हा खर म्हणजे जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहिल. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा - 1, 4, 5, 6, 9, 10, 12, 13, 16, 20, 21, 23, 24, 25, 28, 30

डिसेंबर - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशी धनस्थानी गुरु-हर्षल, तृतीयात राहू , चतुर्थात अष्टमात मंगळ, नवमात रवि-बुध-केतू, दशमात शुक्र, लाभाम शनी-प्लुटो, व्ययात गुरू-नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयात राहू आहे. आतापर्यंत भांबावून टाकणार्‍या समस्यांना उत्तरे सापडतील. पराक्रमाला जोर येईल. शत्रूंची वाढती संख्या ही तुमच्या यशाची ओळख आहे. तुमच्या चातुर्याने व त्यांच्या कर्माने शत्रु नष्ट होतील. मोठमोठ्या उलाढालीमुळे व्यापार्‍यांच्या नफ्यात वाढ होईल. नोकरवर्गाला पदोन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल. भयमुक्त वातावरण तयार होईल. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना पशुधनापासून लाभ होतील. राहूच्या समोर असणारा केतू हा भाग्यस्थानी विराजमान आहे. रातू केतू अस्तित्वात नसतांना न दिसणार्‍या हवेप्रमाणे मानवी जीवनावर बरे वाईठ परिणाम करतात. भाग्यातील केतू लोकांच्या सहकार्याने तुमच्या जीवनाच्या नावेची प्रगतीपथाकडे गतीत वृद्धी करेल. त्यासाठी वैध धनप्राप्तीचे पथ्य पाळावे लागेल.

स्त्रियांसाठी - दशमातील शुक्र महिलांना किचनमधील गॅस व मुलांच्या अभ्यासातून वेळ काढून अर्थार्जनासाठी व्यापार करण्याचा संदेश देत आहे. लेखिकांना महिलांसंबंधी चांगले लेख जमतील.

विद्यार्थ्यांसाठी - विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा - 1, 6, 8, 9, 11, 13, 15, 19, 20, 21, 24, 25, 27, 28

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com