त्रैमासिक भविष्य - सिंंह Quarterly Future - Lion

सन्मार्गाने आर्थिक आवक वाढेल
त्रैमासिक भविष्य - सिंंह Quarterly Future - Lion

सौ. वंदना अनिल दिवाणे

जून - 2021

आठवड्याच्या सुरुवातीला राशीच्या चतुर्थ स्थानी केतू, षष्ठात शनी- प्लूटो, सप्तमात गुरू -नेपच्यून, नवमात हर्षल, दशमात रवि-बुध, लाभात शुक्र, व्ययात मंगळ, अशी ग्रहस्थिती आह

तुमची रास राशीची अध्याक्षरे मा,मी, तू, हे, टा, टी ई आहेत. राशीचे चिन्ह सिंंह आहे. तत्त्व अग्नी. चर राशी असल्याने जीवनात कोणताही बदल नकोसा वाटतो. पूर्व दिशा फायद्याची आहे. लिंग पुरुष. सत्वगुणी, वर्ण क्षत्रिय, स्वभाव क्रूर, प्रकृती पित्तकारक. राशीचा अंमल हृदयावर आहे. हृदयविकारांविषयी सतर्क राहावे. शुभ दिवस रविवार, बुधवार. सूर्य उपासना लाभदायक आहे. शुभ तारखा 1, 10, 19, 28. मित्रराशी- मिथुन, कन्या, मेष, धनु. शत्रुराशी- तुला., मकर, कुंभ. पराक्रमी. अधिकार प्रिय . अतिआत्मविश्वास धोकादायक ठरू शकतो याची सदैव स्मरण असू द्यावे. मितभाषी. स्वतंत्र व्यक्तीमत्व, मातृभक्त. शेतीची आवड.

दशमस्थानातील रवीमुळे महत्त्व प्राप्त होईल. राजकारणी लोकांना याची प्रचिती येईल. निवडणुकीच्या संदर्भात पुढारी, कार्यकर्ता यांना प्रचार कार्य करण्यात चांगले यश मिळेल. अलीकडच्या काळात पिता पुत्राचे म्हणावे तसे पटत नाही पण तुम्हाला मातृ-पितृ सुख उत्तम मिळेल.

स्त्रियांसाठी - धार्मिक वृत्तीमुळे महिलांचे मानसिक स्वास्थ उत्तम राहील. परदेशगमन करणार्‍या महिलांचा भाग्योदय होईल. कला क्षेत्रात विशेषतः लेखनात चांगले यश मिळेल. पुत्रसुख उत्तम मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी - िविदयार्थीदशा हा खर म्हणजे जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहिल. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा -2, 3, 6, 12, 13, 15, 16, 17, 19, 20, 25, 28, 29

जुलै - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या चतुर्थस्थानी केतू, षष्ठात शनी-प्लूटो, सप्तमात गुरू-नेपच्यून, नवमात हर्षल, दशमात बुध-राहू, लाभात रवी, व्ययात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे

दशमात बुध आहे. दशमस्थान म्हणजे कर्मस्थान. तुमच्या नोकरी उद्योगाचे स्थान बुद्धीचा कारक बुध विद्याव्यासंगात भर पडेल. नावलौकीक वाढेल. राजकारण्यांची लोकप्रियता वाढेल. अनेक प्रकारच्या धंद्यात यश मिळेल. प्रतिभेच्या पुनित स्पर्शाने पावन असलेले लेखन कविंकडून निर्माण होईल. आर्थिक आवक वाढेल. सन्मार्गाने ही आवक असल्याने तणावरहीत स्थिती राहील.

षष्ठात शनी आहे. शत्रुवर मात कराल. थोरामोठ्यरांशी मैत्री होईल. देश व धर्माविषयी आदर वाटेल. हाताखालचे लोक खूष असतील.

हातून सत्कर्मे घडतील. शेतकर्‍यांना पशूधनाासून लाभ होतील. अध्यात्माची आवड वाटेल. गूढशास्त्राविषयी आकर्षण वाटेल. अविश्रांत परिश्रमाने मोठ मोठी कामे पार पाडाल. नावलौकीकात भर पडेल. आर्थिक आवक चांगली राहील. जठराग्नी प्रबळ राहील. मात्र बाहेरचे खाणे टाळा.

स्त्रियांसाठी -व्ययात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक आहे.

विद्यार्थ्यांसाठी -शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा - 1, 2, 3, 11, 12, 16, 18, 21, 25, 27, 28, 29

ऑगस्ट - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ-शुक्र, चतुर्थात केतू, षष्ठात शनि-प्लूटो, सप्तमात गुरू-नेपच्यून, नवमात हर्शल, दशमात राहू, व्ययात रवि-बुध अशी ग्रहस्थिती आहे.

लग्नी शुक्र आहे. व्यक्तीमत्वाला झळाळी येईल. नेहमी कामात दंग रहाल. स्वतःची जागा व संसार याबद्दल खूप प्रेम वाटेल. हरहुन्नरीपणामुळे कोणतेही नवीन काम आत्मसात करून धनप्राप्ती करू शकाल. कामात दंग रहाल. विवाहोत्सुक तरूणांना सुंदर पत्नी मिळेल.

सप्तमात गुरू आहे. विवाहोत्सुक तरूण तरूणींना सद्बुणी जोडीदार मिळेल. थोर संगत प्राप्त होईल. चांगल्या स्थळी प्रवास घडेल. लबाडांना वश कराल. नवविवाहीतांचा भाग्योदय होईल. कोर्टकचेरीच्या कामात वारंवार यशप्राप्ती होईल. स्वतःच्या सामर्थ्याबद्दल गर्व वाटेल. गर्वाविषयी संयम पाळा अन्यथा गर्वाचे घर खाली. विद्वान लोकात मान मिळेल.

स्त्रियांसाठी - द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परिक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा - 4, 5, 9, 10, 11, 13, 14, 15,19, 20, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 30, 31

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com