Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधकमी श्रमात अधिक धनप्राप्ती

कमी श्रमात अधिक धनप्राप्ती

फेब्रुवारी-2023

महिन्याच्या सुरुवातीला राशी तृतीय स्थानी केतू, पंचमात बुध, षष्टात रवि-प्लुटो, सप्तमात शुक्र-शनि-नेपच्यून, अष्टमात गुरू, नवमात राहू-हर्षल, दशमात मंगळ, अशी ग्रहस्थिती आहे.

- Advertisement -

तुमची रास – राशीची आद्याक्षरे मा,मी,मू,मे,टा,टी, टे अशी आहेत. राशीचे चिन्ह सिंह आहे. तत्त-अग्नी, स्थिर रास असल्याने जीवनात कोणताही बदल नकोसा वाटतो. पूर्व दिशा फायद्याची आहे. लिंग-पुरूष, सत्वगुणी, वर्ण-क्षत्रिय, स्वभाव-क्रूर, प्रकृती पित्तकारक. राशीचा अंमल हृदयावर आहे. हृदयविकारापिषयी सावध रहा. शुभ दिवस-रविवार,बुधवार. सूर्य उपासना लाभदायक आहे. शुभ अंक-1, शुभ तारखा-1/10/19/28. मित्रराशी-मिथून, कन्या, मेष, धनु. शत्रुराशी- तुला, मकर,कुंभ. पराक्रमी, अधिकारप्रिय, अतिआत्मविश्वास धोकादायक ठरू शकतो. याचे सदैव स्मरण असू द्यावे. मितभाषी, स्वतंत्र वृत्ती, मातृभक्त, शेतीची आवड.

सप्तमात नेपच्यून आहे. भागीदरीचे व्यवहार टाळावे. फसवणुकीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. हिच गोष्टी विवाहाच्या बाबतीत समजा. विवाह ठरवतांना नीट चौकशी करावी. प्रेमव्यवहार टाळा.

स्त्रियांसाठी – नातेवाईक व शेजारीपाजारी यांच्याशी संबंध चांगले राहिल्यामुळे महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. गायनवादनादी ललित कलांत प्रगती होईल. कोणतेही काम नीटनेटकेपणाने केल्याने मानसिक समाधान मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी -विद्याथ्यार्र्ंची बुद्धीमत्ता तीक्ष्ण राहील. त्यामुळे वार्षिक परीक्षा देणे सोपे जाईल. लेखनाचा सराव जेवढा जास्त कराल तेवढी टक्केेवारीही वाढेल.

शुभ तारखा -3, 4, 6, 7, 8, 10, 11, 14, 17, 22, 24, 25, 28

मार्च – 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीच्या तृतीयस्थानी केतू, पंचमात – प्लुटो,सप्तमात रवि-बुध-शनि, अष्टमात गुरू- शुक्र-नेपच्यून, नवमात राहू – हर्षल,दशमात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

दशमस्थानी मंगळ आहे. इतरांना उत्तम सल्ला देऊ शकाल. त्यांचा फायदाही होईल. मात्र स्वतःच्या बाबतीत निर्णय घेणे काहीसे कठीण जाईल. आर्थिक स्थिती जेमतेम राहिली तरी खर्चाला पैसा कमी पडणार नाहीत.

अष्टमातील शुक्र पत्नीकडील नातेवाईकांकडून आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता दर्शवित आहे. धनप्राप्तीच्या बाबतीत दोन गोष्टी लक्षात ठेवा. स्वकष्टावर आधारित धनप्राप्ती असावी. कमी श्रमात अधिक धनप्राप्तीचा हव्यास करू नका. भ्रष्टाचार सुरूवातीला गोड वाटला तरी त्याचा परिणाम शेवटी विषासारखा भयंकर असतो.

अष्टमातील बुध शत्रुंचा नाश करण्यास समर्थ आहे. यशामुळे निर्माण झालेले शत्रू स्वतःच्याच दुष्ट कारवायात अडकून प्रभावहीन होतील. अतिथी सत्काराची आवड असल्याने व्यवसायाच्या संबंधित आलेले पाहुणे खुश होऊन तुमची समाजातील छबी आणखीच उजळेल. प्रगती होईल.

स्त्रियांसाठी –अष्टमात शुक्र आहे. महिलांना ‘ग‘ ची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष राहतील. कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांना अभ्यासाच्यादृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परीक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्तास दुर्लक्ष करणे फायद्याचे राहील.

शुभ तारखा – 1, 4, 5, 8, 9, 11, 16, 18, 22, 23, 27, 28, 29, 30, 3े1

एप्रिल -2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयस्थानी केतू, षष्ठात प्लुटो, सप्तमात शनी, अष्टमात गुरू-रवि-बुध- नेपच्यून, नवमात शुक्र-राहू-हर्शल, लाभात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

अष्टमात असलेल्या रविमुळे नवविवाहीतांना लाभ होईल. भाग्योदयास सुरूवात होईल. नववधूवर असलेल्या प्रेमामुळे घरातील इतरांशी पटणार नाही. लहान गोष्टींवरून वाद निर्माण होतील. सास भी कभी बहु थी अशी परिस्थिती निर्माण होईल.

अष्टमस्थानी गुरू आहे. स्वास्थ उत्तम राहील. पचनक्रियेसंबंधी किंवा इतर आजार संभवतात. गंभीर धोका नाही. कमी श्रमात अधिक धनप्राप्ती होईल. मृतधनप्राप्तीचा योग आहे. पण त्याच्या पाठीमागे लागू नये. अन्यथा हा लाभ मिळणार नाही. ढोंगी लोकांच्या नादी लागू नये. तृतीयस्थानी केतू असता भावा बहिणीशी संबंध चांगले रहात नाही. आपापसात कलह निर्माण होतात.

स्त्रियांसाठी – भाग्यात शुक्र आहे. महिलांच्या व्यक्तिमत्वात सौंदर्याच्यादृृष्टीने वृद्धी होईल. पती-पुत्र सुख उत्तम लागेल. कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांसाठी- तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 1, 2, 4, 6, 7, 13, 14, 16, 17, 21, 22, 23, 25, 26, 28, 29, 30

- Advertisment -

ताज्या बातम्या