धनसंग्रहाचे योग

त्रैमासिक भविष्य -सिंंह Quarterly Future - Leo
धनसंग्रहाचे योग

सप्टेंबर - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ -शुक्र , चतुर्थात केतू, षष्ठात शनि-प्लूटो, नवमात हर्षल. सप्तमात गुरू-नेपच्यून, नवमात हर्षल, दशमात राहू, व्ययात रवि बुध अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू, टे अशी आहेत. राशीचे चिन्ह सिंह आहे. तत्त्व अग्नी, स्थिर रास असल्याने जीवनात कोणतेही बदल नकोसे वाटतात. पूर्व दिशा फायद्याची आहे. लिंग- पुरूष, सत्व- गुणी, वर्ण- क्षत्रिय, स्वभाव कू्रर, प्रकृती पित्तकारक. राशीचा अंमल ह्दयावर आहे. सतर्क रहा. शुभ दिवस रविवार व बुधवार. सूर्य उपासना लाभदायक आहे. शुभ अंक- 1, शुभ तारखा- 1,10,19,28. मित्र राशी- मिथून, कन्या,मेष. शत्रु राशी- तुला,मकर, कुंभ. पराक्रमी, अधिकारप्रिय. अति आत्मविश्वास धोकादायक ठरू शकतो. याचे स्मरण ठेवा. मितभाषी, स्वतंत्र वृत्ती, मातृभक्त.

लग्नी शुक्र आहे. व्यक्तीमत्वास झळाळी येईल. नेहमी कामात दंग रहाल. स्वतःची जागा व संसार याबद्दल प्रेम वाटेल. हरहुन्नरीपणामुळे कोणतेही नवीन काम आत्मसात करून त्यापासून धनप्राप्ती कराल. नेहमी कामात व्यस्त रहाणे आवडेल. विवाहोत्सुक तरूणांना सुंदर पत्नी मिळेल.

स्त्रियांसाठी - लग्नी शुक्र आहे. सौदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी -पंचमेश गुरू आहे. विद्यार्थी अध्ययनात विशेष प्रगती करू शकतील. मात्र आळस झाडून नियमीत अभ्यास करणे आवश्यक आहे. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. हे संत रामदासांचे वचन लक्षात ठेवा.

शुभ तारखा - 1, 3, 7, 8 9 10, 13, 14, 15, 16, 19, 21, 23, 29, 30

ऑक्टोबर- 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या द्वितीयस्थानी रवि-मंगळ-बुध, चतुर्थात शुक्र-केतू, पंचमात प्लूटो, षष्ठात शुक्र-गुरू, सप्तमात -नेपच्यून, नवमात हर्षल, दशमात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

धनस्थानातील बुध सांपत्तीक भरभराट प्राप्त करून देतो. कमिशन बेसिसवर चालणारे धंदे, सल्ला मसलत देणे घेणे. लेखन. प्र्रकाशन यापासून उत्तम धनप्राप्ती होईल. धनसंग्रहास हा महिना चांगला आहे. बचत शक्य होईल. सुरक्षित वित्त संस्था किंवा बँकामध्येच बचत करा. अभ्यास केल्यास वक्तृत्त्व कलेत उत्तम प्रगती होईल. राजकारणात असलेल्यांना याचा फायदा होईल. व्यापारी वर्गास उलाढालीच्या दृष्टीने हा महिना चांगला जाईल. धनप्राप्ती स्वपराक्रमाने होईल. प्रवासात चोरी होणार नाही याची काळजी घ्या. वाचून पाहिल्याशिवाय कोणत्याही कागदावर सही करून नका.

षष्ठात गुरू आहे. या स्थानाचा गुरू चांगला नाही असे समजले जाते. शत्रू जिंकण्याची शक्यता असते. वैदयकीय धंद्याला हा गुरू पोषक आहे. सार्वजनिक प्रश्नांची चर्चा करणे आवडेल. नोकरवर्गालाही हा गुरू विशेष चांगला आहे. नोकरी पदोन्नती होण्याची शक्यता आहे.

स्त्रियांसाठी - चतुर्थात शुक्र आहे. महिलांचा स्वभाव प्रेमळ राहील. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती राहील. सोने म्हणून पितळ हाती येण्याच ा संभव आहे.

विद्यार्थ्यांसाठी - तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा - 2, 3, 8, 10, 12, 13, 14, 15, 17, 18, 19, 20, 21, 24, 26, 28, 29, 30

नोव्हेंबर - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयस्थानी बुध-रवि-मंगळ, चतुर्थात केतू, पंचमात शुक्र, षष्ठात गुरु-शनी-प्लूटो, सप्तमात नेपच्यून, नवमात हर्षल, दशमात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयात रवि आहे. पराक्रमास जोर येईल. शरीरप्रकृती उत्तम राहील. समोरच्या व्यक्तीवर तुमच्या प्रभावी व्यक्तीमत्वाची छाप राहील. ललितकला व शास्त्रीय विषयात आवड राहील. स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. प्रवासाची आवड वाटेल. राजकारणी लोकांची सत्तेकडे वाटचाल राहील. कोंणत्याही प्रकारच्या लोकांशी सहज जमून त्यांच्याशी मैत्री होईल. स्पर्धात्मक कार्यक्रमात भाग घ्यावा वाटेल. यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक चांगली राहील.

तृतीयात मंगळ आहे. प्रसिद्धी झोतात याल. सज्जनतेकडे कल राहील. लढाऊ वृत्ती चांगली असल्यामुळे शत्रुंचा पराभव होईल. त्यात दैवी कृपेचाही भाग असेल. कवी वर्गाला चांगल्या कविता सुचतील.

सप्तमात नेपच्यून आहे. भागीदारीचे व्यवहार टाळावे. फसवणुकीची शक्यता. हिच गोष्ट विवाहाच्या बाबतीत समजावी. विवाह ठरवितांना नीट चौकशी करावी.

स्त्रियांसाठी - विवाहोत्सुक तरूणींचे विवाह जुळतील. संगीताची आवड वाटेल. मुलाबाळात रमून जाल. लेखन करणार्‍या महिलांचा योग्य मानधन मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी - माता पिता, गुरूजन वर्ग, वृद्धांच्या बोलण्याला लेक्चरबाजी न समजता त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा. विशेषतः विद्येची आवड असणार्‍या मित्रांची निवड करावी म्हणजे अभ्यासात प्रगती होईल.

शुभ तारखा - 1, 4, 5, 6, 9, 10, 12, 13, 16, 20, 21, 23, 24, 25, 28, 30

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com