उत्तम धनप्राप्तीचे योग
भविष्यवेध

उत्तम धनप्राप्तीचे योग

त्रैमासिक भविष्य - सिंह

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

सौ. वंदना अनिल दिवाणे

जुलै - 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या पंचमस्थानी केतू-गुरू-प्लुटो षष्ठात शनी, सप्तमात नेपच्यून, अष्टमात मंगळ, दशमात शुक्र लाभात रवि, बुध-राहू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे मा, मी, मू, ख, मे, मो, टा, टी, टू, टे अशी आहेत. राशीचे चिन्ह सिंह आहे. तत्त्व-अग्नी, स्थिर रास असल्याने जीवनात कोणताही बदल नकोसा वाटतो. पूर्व दिशा फायद्याची आहे. लिंग-पुरुष, सत्त्वगुणी, वर्ण-क्षत्रिय, स्वभाव-क्रूर, पकृती-पित्तकारक, राशीचा अंमल हृदयावर आहे. शुभ अंक-1, शुभ तारखा-1, 10, 19, 28. मित्र राशी- मिथुन, कन्या, मेष, धनू. शत्रुराशी- तुला, मकर, कुंभ. पराक्रमी, अधिकारप्रिय, अतिआत्मविश्वास धोकादायक ठरू शकतो याचे सदैव स्मरण असू द्यावे. मितभाषी स्वतंत्र वृत्ती, मातृभक्त, शेतीची आवड.

पंचमात प्लुटो आहे. नाना साधनांनी सुखप्राप्ती करण्यासाठी धडपड करण्याची तीव्र इच्छा निर्माण होईृल. बुद्धीचे ज्ञानग्रहण सामर्थ्य चांगले राहील. सतत उत्साह असल्यामुळे कार्यक्षमता उत्तम राहील. हातात घेतलेल्या कामात विजय मिळेल. मात्र शत्रूच्या कारवाया रोखण्यासाठी जागृत रहाणे आवश्यक आहे. रात्र वैर्‍याची आहे. नोकरीपासून सुख वाढेल.

स्त्रियांसाठी - महिलांच्या हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष असतील. मधुर बोलण्याने घराकडे तणाव येणार नाही. शेजारपाजारच्या सखी हेवा करतील. सुशिक्षित महिलांना विद्येच्या बळावर धनप्राप्ती होईल.

विद्यार्थ्यांसाठी - माता, पिता, गुरुवर्ग, वृद्धांच्या बोलण्याला लेक्चरबाजी न समजता त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा. विद्येची आवड असणार्‍या मित्रांची निवड करावी म्हणजे अभ्यासात उत्तम प्रगती होईल..

शुभ तारखा - 2, 5, 7, 9, 10,12, 13, 14, 21, 25, 26, 29.

ऑगस्ट - 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि, पंचमात गुरू-केतू-प्लुटो, षष्ठात शनी, सप्तमात नेपच्यून, अष्टमात मंगळ, नवमात हर्षल, लाभात शुक्र-राहू, व्ययात बुध अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमात गुरू आहे. या स्थानातील गुरू हा स्वतंत्र भाग्ययोग आहे. वैभव प्राप्त होईल. विद्वत्तेचा लौकिक सर्वत्र पसरेल. सत्पुत्र सुख प्राप्त होईल. सद्गुरू कृपेने व वाडवडिलांच्या पुण्याईने भाग्योदय होईल. संततीसुख चांगले राहील. लेखनाची आवड असल्यास प्रतिभेचा परिसस्पर्श असलेले उत्तम लेखन होईल. लोकशिक्षणात सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल. सट्ट्यासारख्या व्यवहार व व्यापार यात भाग घ्यावासा वाटेल.

सप्तमात नेपच्यून आहे. भागीदारीचे व्यवहार टाळावेत. फसवणुकीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. हीच गोष्ट विवाहाच्या बाबतीत समजावी. विवाह ठरविताना नीट चौकशी करावी. अन्यथा विश्वासघातकी जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.

षष्ठात शनि आहे. शत्रुवर मात कराल. शत्रुचा पराभव मोठ्या कौशल्याने करू शकाल. थोर लोकांशी मैत्री होईल. हातून सत्कर्मे घडतील. हाताखालचे लोक खूश राहतील. देश व धर्म याबद्दल आदर वाटेल.

स्त्रियांसाठी - व्यक्तिमत्त्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेंट द्यावीशी वाटेल. पतिराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी - पंचमेष गुरू पंचमात आहे. विद्यार्थी अध्ययनात विशेष प्रगती करू शकतील.मात्र आळस झाडून नियमितपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. ‘केल्याने होत आहे रे’ हे संतवचन लक्षात ठेवावे.

शुभ तारखा - 2, 3, 4, 5, 7, 8, 11, 13, 15, 20, 21, 22, 23, 25, 28, 30, 31.

सप्टेंबर - 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि, द्वितीयात बुध, पंचमात गुरू - प्लुटो-केतू, सप्तमात नेपच्यून, नवमात मंगळ, लाभात राहू व्ययात शुक्र अशी ग्रहस्थिती आहे..

नवमात मंगळ आहे. स्वभाव काहीसा लहरी व उतावळा आहे. शंकराची उपासना केल्यास हा दोष नियंत्रणात येईल. पत्नीच्या नातेवाईकांकडून मदतीसाठी विचारणा होईल.

द्वितीयात बुध आहे. धनस्थानातील बुध सांपत्तिक भरभराट प्राप्त करून देतो. कमिशन बेसिसवर चालणारे धंदे, सल्लामसलत करणे, लेखन, प्रकाशन यांपासून उत्तम धनप्राप्ती होईल. धनसंग्रह करण्यास हा महिना चांगला आहे. बचत शक्य होईल. सध्याच्या काळी बचत संस्थातील अनिश्चितता पाहून योग्य व सुरक्षित सरकारी बँक अथवा वित्त संस्थांमधून गुंतवणूक करणे शहाणपणाचे ठरेल. अभ्यास केल्यास वक्तृत्चकलेमध्ये उत्तम प्रगती करू शकाल. रजकारणात असलेल्यांना याचा विशेष फायदा घेता येईल. व्यापारी वर्गालाही हा महिना उलाढालीच्या दृष्टीने चांगला जाईल. धनप्राप्ती स्वतःच्या पराक्रमाने होईल. प्रवासात आपले सामान व पैसे चोरी जाणार नाही याची काळजी घ्या. वाचून पाहिल्याशिवाय कोणत्याही कागदावर सही करू नका.

स्त्रियांसाठी - द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक आहे.

विद्यार्थ्यांसाठी - पंचमात गुरू आहे. विद्येतील प्रगतीसाठी तो अतिशय शुभ आहे. वाडवडिलांच्या पुण्याईृ व अशीर्वादामुळे अभ्यासात मन एकाग्र होईल. व टक्केवारी वाढविणे सोपे जाईल.

शुभ तारखा - 2, 3, 4, 6, 7, 10, 13, 14, 18, 24, 25, 26, 28, 29, 30.

Deshdoot
www.deshdoot.com