त्रैमासिक भविष्य - मिथुन

व्यापार, वैद्यकीय, यांत्रिकी काम यातून अर्थप्राप्ती
त्रैमासिक भविष्य - मिथुन
त्रैमासिक भविष्य - मिथून Quarterly future - Gemini

मे - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी पंचमस्थानी केतू, अष्टमात प्लूटो, नवमात लाभात मंगळ-शनी, दशमात गुूरू-शुक्र-नेपच्यून, लाभात रवि-राहू-शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे का, की, कू, ध, मं, छा, के, को अशी आहेत. राशीचे चिन्ह स्त्री-पुरूष युगल असमन स्त्रीच्या हातात वीणा तर पुरूषाच्या हातात गदा आहे. राशी स्वामी बुध, तत्त्व-वायु असल्याने अधून मधून भडकण्याची सवय. द्विस्वभावी राशी असल्याने निर्णय लवकर घेता येत नाही. लिंग पुरूष असल्याने काही स्त्रियांचे वागणे हे पुरूषी थाटाचे असेल. पश्चिम दिशा फायद्याची आहे. वर्ण शूद्र, स्वभाव-क्रूर, त्रिदोष प्रकृती, खांद्यावर अंमल आहे. शुभवार- बुधवार, उत्तम ग्रहणशक्ती, अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी,हास्य विनोदी स्वभाव, बोलण्यात चातुर्य,

दशमात शुक्र आहे. उत्तम शुभयोग. सर्व प्रकारचे भाग्य चालत येईल. ग्रामीण व शहरी याबाबतीत भेद रहाणार नाही. पितृसुख उत्तम मिळेल. उद्योग, व्यवसायात प्रगती होईल. कमी श्रमात विपुल धनप्राप्ती होईल.

स्त्रियांसाठी - दशमातील शुक्र महिलांना किचनमधील गॅस व मुलांच्या अभ्यासातून वेळ काढून अर्थार्जनासाठी व्यापार करण्याचा संदेश देत आहे. लेखिकांना महिलांसंबंधित लेख चांगले जमतील.

विद्यार्थ्यांसाठी - मे महिना सुट्टीचा. विद्यार्थी वर्ग शांत बसणार नाही. मनाप्रमाणे खेळात, फिरण्यात, व्यायामात भाग घेऊ शकतील. अभ्यासाचे दडपण दूर राहिल.

शुभ तारखा - ी1, 3, 4, 6, 7, 9, 10, 11, 13 19, 20, 22, 24, 26

जून - 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थाच्या पंचमस्थानी केतू, अष्टमात प्लूटो, नवमात शनि, दशमात मंगळ-गुरू-नेपच्यून , लाभात शुक्र-राहू- हर्षल, व्ययात रवि-बुध अशी ग्रहस्थिती आहे.

दशमात मंगळ आहे. इतरांना उत्तम सल्ला देऊ शकाल. त्यातून फायदाही होईल स्वतःच्या बाबतीत निर्णय घेणे कठीण होईल. आर्थिक स्थिती जेमतेम राहील. तरी खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

दशमस्थानी गुरू आहे. पराक्रमाला जोर येईल. बर्‍याच वेळा यश येईल.स्थावर इस्टेटीपासून उपजिवीका चालेल इतपत उत्पन्न मिळू शकेल. तेजस्वी वृत्ती राहील. उत्तम सल्लागार म्हणून प्रसिद्धी मिळेल. उठसूट रागावणे चांगले नाही. रागावर नियंत्रण ठेवा. लष्करी वृत्तीवर अंकुश लावावा. हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय चैन पडणार नाही. गुरूजनांवर प्रेम राहील. धैर्यशील वृत्तीमुळे कोणत्याही संकटात माघार घ्यावी लागणार नाही. वडिलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या. जनसेवेची हौस वाटेल. व्यापार, वैद्यकीय, यांत्रिकी कामे अथवा राजकृपा यातून अर्थप्राप्ती होईल.

स्त्रियांसाठी - धार्मिक वृत्तीमुळे महिलांचे मानसिक स्वास्थ उत्तम राहील. परदेशगमन करणार्‍या महिलांचा भाग्योदय होईल. कला क्षेत्रात विशेषतः लेखनात चांगले यश मिळेल. पुत्रसुख उत्तम मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी - शाळा नुकत्याच सुरू झाल्या असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेला वेळ परत येणार नाही.

शुभ तारखा 1, 2, 4, 6, 8, 11, 13, 15, 16, 19, 21, 22, 24, 30

जुलै - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि- बुध, चतुर्थात केतू, अष्टमात प्लूटो, नवमात शनि, दशमात राहू- गुरू-नेपच्यून, लाभात मंगळ-हर्षल, अशी ग्रहस्थिती आहे. लग्नी रवि आहे. राजमान्यता मिळेल. पराक्रमास जोर येईल. राजकारणी लोकांना याची प्रचिती येईल.कामाच्या घाईगर्दीत जेवणाकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार नाही यामुळे आहार कमी राहील.स्वभाव उदार राहील. बुद्धी तीव्र राहील. मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

लग्नी बुध आहे. प्रवास सुखदायक घडतील. आर्थिक लाभ होतील. विद्याव्यासंगात भर पडेल. मित्रांशी मिळून मिसळून वागाल. चेहर्‍यावर प्रसन्नता झळकेल. अडी अडचणीच्या वेळी मित्रांच्या मदतीला धावून जाल. स्वधर्मावर श्रद्धा राहील.

चतुर्थात केतू आहे. संसार सुखात अडचणी येतील. मुलांच्या प्रकृतीविषयी अडचणी येतील. पत्नीचा चेहरा उतरलेला राहील.

स्त्रियांसाठी - द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक आहे.

विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.

शुभ तारखा - 1, 2, 7, 8, 15, 18, 20, 21, 24, 29

Related Stories

No stories found.