Saturday, April 27, 2024
Homeभविष्यवेधआर्थिक आवक उत्तम राहील

आर्थिक आवक उत्तम राहील

सौ. वंदना अनिल दिवाणे

ऑगास्ट – 2021

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी रवि- बुध, तृतीयात मंगळ -शुक्र ,षष्ठात केतू, अष्टमात शनि- केतू, अष्टमात राहू, अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे का, की, कु, घ, गं, छ, के, को, हा अशी आहेत. मिथुन राशीचे चिन्ह स्त्री पुरूष युगुल असून स्त्रीच्या हातात वीणा व पुरूषाच्या हातात गदा आहे. राशी स्वामी -बुध, तत्त्व-वायू असल्याने मधून मधून भडकण्याची सवय आहे. द्विस्वभावी रास असल्याने लवकर निर्णय घेता येत नाही.

पश्चिम दिशा फायद्याची आहे. लिंग- पुरूष्र त्यामुळे काही स्त्रीयांची वागणूक पुरूषी थाटाची असते. रजोगुणी, स्वभाव क्रूर, प्रकृती कफ-वात-पित्त. शुभ रत्न-हिरा, शुभ रंग- सफेद, शुभ दिवस- बुधवार, देवता- लक्ष्मी, संतोषी, शुभ अंक- 6, शुभ तारखा- 6,15,24.मित्र राशी- मिथून, मकर, कुंभ, धनू, कर्क, शत्रुराशी- सिंह.

तरल बुद्धी, हास्य विनोदी स्वभाव, बोलण्यात चातुर्य.

वडिलाधार्‍यांकडून आर्थिक सहकार्याची शक्यता आहे. पण तुमच्या आर्थिक बाबतीत उदार स्वभावास अंकूश लावा. अन्यथा कर्जाचा विचार करावा लागेल.

स्त्रियांसाठी – तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. गायनादी ललित कलात प्रगती होईल. कोणतेही काम नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी – विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा – 3, 5, 9, 10, 11, 13, 14, 15, 19, 20, 23 ,24, 25, 26, 27, 28

सप्टेंबर – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयथानी रवि-मंगळ, चतुर्थात बुध-शुक्र, षष्ठात केतू, अष्टमात शनी-प्लुटो, नवमात गुरू-नेपच्यून, व्ययात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

चतुर्थात शुक्र असल्याने आनंदी वृत्ती राहील. आर्थिक आवक उत्तम राहील. न्यायीपणामुळे लोकप्रियतेत भर पडेल. आपल्या कार्यात प्राविण्य संपादन कराल. आकर्षक व मधुर बोलण्यामुळे घरात व बाहेर खेळीमेळीचे वातावरण राहील. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. मातेची सेवा कराल. वाहनसुख मिळेल. नवीन वाहन खरेदी कराल. निवासस्थानासंबंधी काही शुभ घटना घडतील. योग साधनेसाठी गुरू चांगला आहे. कमी श्रमात अधिक धनप्राप्ती होईल. मृतधन प्राप्तीचे योग आहे. पण त्याच्या पाठीमागे लाागू नये अन्यथा असा लाभ मिळता मिळता राहून जाईल. खालच्या वर्गातील दुःखी व उदास लोकांचा सहवास मिळेल. त्याचा स्वतःच्या जीवनावर परिणाम होऊ देऊ नये.

स्त्रियांसाठी – चतुर्थात शुक्र आहे. महिलांचा स्वभाव प्रेमळ राहील. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती राहील हे मात्र धोक्याचे आहे. सोने म्हणून पितळ हाती लागण्याचा संभव आहे.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. क्लासेसमुळे बरीच धावपळ होईल.

शुभ तारखा – 1, 2, 7, 8 9 10, 13, 14, 15, 16, 19, 21, , 23, 29

ऑक्टोबर – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या चतुर्थात बुध-रवि-मंगळ, षष्ठात केतू-शुक्र, सप्तमात प्लूटो, अष्टमात शनि-गुरू, लाभात हर्षल व्ययात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

चतुर्थात मंगळ आहे. पत्नीचा शब्द टाळता येणार नाही. साहजिकच त्याचा परिणाम मातृसुखात अडचणी येण्याची शक्यता दर्शवितो. वाहनापासून अपघात होणार नाही याची खबरदारी घ्या. चोरीची भिती आहे. सावध रहा. इस्टेटीचे व्यवहार पुढे ढकलावे. वृद्धांनी घरच्या मंडळींशी जमवून घ्यावे. अन्यथा मनस्ताप सहन करावा लागेल. नोकरी उद्योग व्यवसायाच्या बाबतीत परिस्थिती उन्नतीकारक राहील. बंधु सुख उत्तम राहील.

चतुर्थात बुध आहे. एकाच उद्योधंद्यात काम करत राहील्यामुळे कदाचित कंटाळा येईल परंतू अशी धरसोड वृत्ती फायद्याची नाही. पैसा, वेळ, प्रयत्न वाया जातात आणि पदरात काही पडत नाही. नातेवाईकाशी म्हणावे तसे पटणार नाही. त्यातल्या त्यात पिताश्रींकडून काही मिळण्याची अपेक्षा ठेवू नये. आर्थिक सहकार्याची शक्यता कमी आहे.

स्त्रियांसाठी – षष्ठातील शुक्र नोकरी करू इच्छिणार्‍या तरूणींना तशी संधी उपलब्ध करून देईल. मात्र अष्टमातील गुरूमुळे विवाह जुळण्यात अडचणी संभवतात. स्त्रियांच्या सहनशीलतेत वाढ होईल.

विद्यार्थ्यांसाठी – विदयार्थीदशा हा खर म्हणजे जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहिल. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा – 2, 3, 7, 10, 12, 13, 14, 15, 17, 18, 19, 20, 21, 24,26, 28, 29, 30

- Advertisment -

ताज्या बातम्या