Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधकमी श्रमात अधिक धनप्राप्ती

कमी श्रमात अधिक धनप्राप्ती

सप्टेंबर – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी प्लूटो-शनी, तृतीयात गुरु-नेपच्यून, चतुर्थात राहू-हर्षल, पंचमात मंगळ,अष्टमात रवि-शुक्र, दशमात केतू अशी ग्रहस्थितीे आहे.

- Advertisement -

तुमची रास – राशीची आद्याक्षरे भो, जा, जी, खी,खू, खे, खो, गा, गी अशी आहेत. राशीचे चिन्ह मगर आहे. राशी स्वामी शनी, तत्त्व – पृथ्वी असल्याने सहनशक्ती चांगली आहे. चर रास असल्याने सतत काही बदल हवा असे वाटते. दक्षिण दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग स्त्री असल्याने स्वभाव सौम्य, तमोगुणी . वात प्रकृती. स्थूलपणा टाळण्यासाठी दररोज हलका व्यायाम करा. राशीचा अंमल गुडघ्यावर आहे. काळजी घ्या. शुभ रत्न- निलम, शुभ रंग- निळा, आकाशी, काळा. शुभ दिवस- शनिवार, देवता – शनि. शुभ अंक – 8, शुभ तारखा- 8/17/26. मित्रराशी-कुंभ, शत्रु राशी – सिंह. उत्तम प्रशासक. कतंव्यदक्ष. सतत कामात मग्न.

धनस्थानी असलेला नेपच्यून धनप्राप्तीसाठी नवनवीन कल्पनांचे भांडार उघडे करील. अन्य जनांचे लक्षही जाणार नाही. अशा कल्पना सुचतील. त्या कृतीत आणल्याने उद्योगधंदे ललित कला, कथालेखन, यापासून द्रव्यलाभ होईल. खर्चाच्या बाबतीत नियंत्रण आवश्यक आहे. चतुर्थात राहू आहे. हा ग्रह आघाडीवर काळजी करावयास लावील. नीच संगतीपासून दूर रहावे.

स्त्रियांसाठी – ग्रहांची चौकट महिलांसाठी चांगली आहे. फॅशनची नवीन वस्त्रे व अलंकार खरेदी यासंबंधी मनासारख्या गोष्टी घडतील. त्यासाठी पतिराजांची उत्तम साथ मिळेल. मुलांंवर नियंत्रण ठेवावे.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. क्लासेसमुळे बरीच धावपळ होईल.

शुभ तारखा – 1, 4, 7, 8, 10, 11, 12, 14, 17, 21, 22, 26, 27, 30

ऑक्टोबर – 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी -लुटो,द्वितीयात-नेपच्यून, तृतीयात गुरू, चतुर्थात -राहू, पंचमात मंगळ, अष्टमात रवि-शुक्र-बुध, दशमात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमात मंगळ आहे. आर्थिक आवक उत्तम राहील. मित्रसुख कमी राहील. पुत्राविषयी चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. मुर्खाची संगत टाळावी. सठ्ट्यासारख्या व्यवहारापासून दूर रहा. जवळपास प्रवास घडण्याची शक्यता आहे. क्रिडा क्षेत्राची आवड असलेल्यांना खेळात प्रगती होऊन पुढे जाण्याची संधी मिळेल. केमिकल्स, प्राणीशास्त्र, भूगर्भशास्त्र, व शास्त्रीय विषयाशी संबंधित काम करणार्‍या लोकांची प्रगती होईल.

भाग्यातील रविमुळे जनमानसात चांगली प्रतिमा तयार होईल. नावलौकीक वाढेल. उदो उदो होईल. घरच्यांना आनंद वाटण्याऐवजी ते उत्साह भंग करण्याचा प्रयत्न करतील. मातापित्याशी म्हणावे तसे पटणार नाही. धार्मिक बाबतीत समभाव राहील.

अष्टमातील बुध शत्रुंंचा नाश करण्यास समर्थ आहे. यशामुळे निर्माण झालेले शत्रु स्वतःच्या दुष्ट कारवायात अडकून प्रभावहीन होतील. अतिथी सत्काराची आवड असल्याने व्यवसायासंबंधी आलेले पाहुणे खुष होऊन तुमची समाजातील छबी उजळेल.

स्त्रियांसाठी –अष्टमात शुक्र आहे. महिलांना ‘ग‘ ची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष रहातील. कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांनी स्वास्थाची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहीण्याचा सराव वाढविणे फायद्याचे राहिल.

शुभ तारखा – 3, 4, 5, 8, 10, 11, 17, 18, 19, 21, 24, 26, 30, 31

नोव्हेंबर- 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शनी-प्लूटो, द्वितीयात नेपच्यून, तृतीयात-गुरू, चतुर्थात राहू-हर्शल, षष्ठात मंगळ, दशमात रवि-बुध-शुक्र-केतू अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयस्थानी गुरु असता मनुष्य पराक्रमशील बनतो. मात्र अपेक्षेप्रमाणे सुस्थिती लवकर लाभणार. पत्नीचा सल्ला फायद्याचा राहील. कंजूसपणाकडे कल राहील. धनसंग्रहात अडचणी येतील. बांधवाकडून म्हणावे तसे सुख मिळणार नाही. शेजारी व मित्र यांचे उत्तम सहकार्य मिळेल. कमी श्रमात अधिक धनप्राप्ती होईल. राजकीय कार्यकर्ते व नेत्यांना हा गुरू विशेष चांगला आहे. विशेष पराक्रम न दाखविता ही भाग्यवृदधी होईल. शत्रुसंख्या वाढेल.

दशमातील केतूमुळे शत्रुंचा नाश करणे तुम्हाला सहज शक्य होईल. नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्यांना नोकरी मिळण्याचा योग आहे. वाहनांपासून अपघात होऊ नये याची काळजी घ्यावी. बुद्धी तीक्ष्ण राहील. कारागिरी आवश्यक असलेले काम चांगले जमेल. नीचांची संगत टाळा. प्रवासातून आर्थिक प्राप्ती होईल.

स्त्रियांसाठी – दशमातील शुक्र महिलांना किचनमधील गॅस व मुलांच्या अभ्यासातून वेळ काढून अर्थार्जनासाठी व्यापार करण्याचा संदेश देत आहे. लेखिकांना महिलांसंबंधित लेख चांगले जमतील.

विद्यार्थ्यांसाठी– विेज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा – 2, 3, 5, 6, 10, 12, 13, 14, 17, 20, 26, 28, 29

- Advertisment -

ताज्या बातम्या