Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधप्रवाहातून आर्थिक प्राप्ती

प्रवाहातून आर्थिक प्राप्ती

जुलै – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शनी, द्वितीयात शनी, तृतीयात गुरू-नेपच्यून, चतुर्थात-मंगळ-राहू-हर्षल, पंचमात-शुक्र , सप्तमात रवि- बुध, दशमात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

- Advertisement -

तुमची रास – राशीची आद्याक्षरे भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी अशी आहेत. राशीचे चिन्ह मगर आहे. राशी स्वामी शनी, तत्त्व पृथ्वी असल्याने सहनशक्ती चांगली आहे. चर रास असल्याने सतत काही तरी बदल हवा असे वाटत असते. दक्षिण दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग स्त्री असल्याने स्वभाव सौम्य तमोगुणी. वातप्रकृतीचा आहे. स्थूलपणा टाळण्यासाठी व्यायाम करा. राशीचा अंमल गुडघ्यावर आहे. इजा होऊ नये ही काळजी घ्या. शुभरत्न-निलम, शुभ रंग-निळा,आकाशी, काळा. शुभ अंक-8, शुभ तारखा- 8/17/26. मित्रराशी-कुंभ, शत्रु राशी-सिंह. उत्तम प्रशासक, कर्तव्यदक्ष, सतत कामात मग्न. चतुर्थात मंगळ आहे. पत्नीचा शब्द टाळता येणार नाही. साहजिचक त्याचा परिणाम मातृसुखात अडचणी येण्याची शक्यता दर्शवितो. वाहनापासून अपघात होऊ नये याची काळजी घ्या. घरात चोरी किंवा अन्य वाईट घटनांची भीती आहे. सावध राहणे चांगले. इस्टेटीचे व्यवहार शक्यतो पुढे ढकलावे. वृद्धांनी घरच्या मंडळींशी जमवून घ्यावे.

स्त्रियांसाठी – नातेवाईक व शेजारी पाजारी यांचे संबंध चांगले राहिल्यामुळे महिलांचा स्वभाव आनंदी व उत्साही राहील. गायनादी ललीत कलात प्रगती होईल. कोणतेही काम नीटनटकेपणाने केल्यामुळे मानसिक समाधान वाटेल.

विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 1, 2, 7, 8, 15, 18, 20, 21, 24, 29

ऑगस्ट – 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी प्लूटो-शनी, तृतीयात गुरू-नेपच्यून, चतुर्थात राहू-हर्षल, पंचमात -मंगळ, सप्तमात रवि- शुक्र, अष्टमात बुध, दशमात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयस्थानी गुरू असता मनुष्य पराक्रमीशील असतो. मात्र अपेक्षेप्रमाणे सुस्थिती लाभणार नाही. पत्नीचा सल्ला फायद्याचा राहील. कंजूषपणा करण्याकडे कल राहील. धनसंग्रहात अडचणी येतील. बांधवाकडून म्हणावे तसे सुख मिळणार नाही. शेजारी व मित्र यांचे उत्तम सहकार्य राहील. राजकीय कार्यकर्त्यांना हा गुरू विशेष चांगला राहील.विशेष पराक्रम न दाखवताही भाग्यवृद्धी होईल. मात्र शत्रुसंख्या वाढेल.

दशमातील केतूमुळे शत्रुचा नाश करणे सहज शक्य होईल. नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्यांना नोकरी मिळण्याचे योग आहे. वाहनापासून अपघात होऊ नये याची काळजी घ्यावी. बुध्दी तीक्ष्ण राहील. कारागिरी आवध्यक असलेले काम चांगले जमेल. नीचांची संगत टाळावी. नाही तर नसत्या भानगडीत अडकावे लागेल. प्रवास घडतील व त्यातून आर्थिक प्राप्ती होण्याची शक्यता आहे. वाहन सावकाश चालवा.

स्त्रियांसाठी – सप्तमस्थानात शुक्र आहे. वैवाहिक सुख चांगले राहील. नवविवाहीतांचा भाग्योदय होईल. लोकरंजन करणार्‍या संस्थामधून प्रगती होऊन प्रयत्न केल्यास आर्थिक लाभ होतील.

विद्यार्थ्यांसाठी – अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात त्यामुळे आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेला वेळ परत येणार नाही.

शुभ तारखा – 2, 3, 4, 9, 10, 13, 15, 16, 17, 20, 22, 28, 29, 30, 31

सप्टेंबर – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशी धनस्थानी शनि- प्लूटो, तृतीयात गुरू-नेपच्यून, चतुर्थात राहू-हर्षल, पंचमात मंगळ, अष्टमात रवि-शुक्र , नवमात बुध, दशमात केतू अशी ग्रहस्थिती आहे

अष्टमातील असलेल्या रविमुळे नवविवाहीतांना लाभ होईल. विवाहानंतर भाग्योदयास सुरूवात होईल. नववधूवर असलेल्या प्रेमामुळे म्हणा किंवा अन्य कारणामुळे घरातील इतरांशी पटणार नाही. लहान गोष्टींवरून कलह होतील. सास भी कभी बहु थी अशी स्थिती निर्माण होईल.

नवमात बुध आहे. पुत्रसुख उत्तम आहे. आर्थिक आवक चांगली राहील. ती ही सरळ मार्गाने सत्संग व सत्पुरूषाच्या सेवेपासून लाभ होतील. लेखक वर्गाच्या हातून प्रतिभासंपन्न लेखन निर्माण होईल. काहींना परदेशगमनाची संशी मिळेल. धार्मिक मते जुन्या वळणाची असूनही नवीन विचारप्रवाहाचे स्वागत कराल.

तनुस्थानी शनी आहे. तीक्ष्ण बुद्धीमुळे अभ्यासू वृत्ती राहील. उद्योगशीलतेत वृद्धी होईल. हिशोबीपणामुळे धनसंग्रह करणे जमेल शिवाय बचत करणेही सोपे होईल. प्रामाणिकपणामुळे नोकरीत उन्नती होईल. भाविकपणामुळे जनमानसात चांगली छबी निर्माण होईल. स्वमताचा हट्ट करू नये.

स्त्रियांसाठी -अष्टमात शुक्र आहे. महिलांना ‘ग‘ ची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष रहातील. कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी– विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परिक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा – 1, 4, 7, 8, 10, 11, 12, 14, 17, 21, 22, 26, 27, 30

- Advertisment -

ताज्या बातम्या