इस्टेटीसंबंधी लाभ होतील

त्रैमासिक भविष्य - मकर
इस्टेटीसंबंधी लाभ होतील
मकरCapricorn

सौ. वंदना अनिल दिवाणे

जानेवारी - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शनि-बुध- प्लूटो,द्वितीयात गुरू-नेपच्यून, चतुर्थात हर्षल, पंचमात राहू , लाभात मंगळ -केतू, व्ययात रवि-शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे भो, जा, जी, खू, खे, खो, गा, गी अशी आहेत. राशीचे चिन्ह मगर आहे. राशी स्वामी - शनी. तत्त्व- पृथ्वी असल्याने सहनशक्ती चांगली. चर रास असल्याने सतत काही तरी बदल हवा असे वाटत राहते. दक्षिण दिशा फायद्याची. राशीचे लिंग स्त्री असल्याने स्वभाव सौम्य तमोगुणी, वात प्रकृती, स्थूलपणा टाळण्यासाठी दररोज हलका व्यायाम करा. राशीचा अंमल गुडघ्यावर आहे. काळजी घ्या. शुभ रत्न- निलम, शुभ रंग - निळा, आकाशी व काळा. .शुभ दिवस- शनिवार. देवता- शनि. शुभ अंक- 8, शुभ तारखा- 8/17/26. मित्र राशी - कुंभ, शत्रु राशी- सिंह. उत्तम प्रशासक. कर्तव्यदक्ष, सतत कामात मग्न.

एकादशस्थानी मंगळ आहे. सांपत्तीक लाभ होतील. त्यासाठी मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. मात्र मित्रांची पारख आवश्यक आहे. काही मतलबी, ढोंगी असण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्याची आवड वाटेल. वाईट संगती धरू नका. इस्टेटीसंबंधी लाभ होण्याचा संभव आहे.

स्त्रियांसाठी - ग्रहांची चौेकट चांगली आहे. फॅशन, नवीन वस्त्रे, अलंकार खरेदी यासंबंधी मनाजोग्या गोष्टी घडतील. त्यासाठी पतीराजांची उत्तम साथ मिळेल. मुलांवर नियंत्रण ठेवावे.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.

शुभ तारखा - 3, 4, 5, 8, 10, 11, 14, 18, 20, 22, 23, 26, 29

फेब्रुवारी - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि-बुध-शनी-प्लुटो, द्वितीयात गुरू- नेपच्यून, पंचमात राहू, लाभात केतू, व्ययात मंगळ-शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

तनुस्थानी रवि आहे. राजमान्यता मिळेल. पराक्रमाला जोर येईल. पराक्रमाला जोर येईल. राजकारणातील कार्यकर्ता / उमेदवाराला याची प्रचिती येईल. कामाच्या गर्दीमध्ये भोजनाकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार नाही. त्यामुळे आहार कमी होईल. स्वभाव उदार . थोडा लोभीही असेल. बुद्धी तीव्र राहील. शारीरीकदृष्ट्या पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे. मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

लग्नी बुध आहे. प्रवास सुखदायक घडतील. त्यातून आर्थिक लाभही होतील. विद्याव्यासंगात भर पडेल. मित्रमंडळांशी मिसळून वागाल. अडचणीच्या वेळी मित्र मदतीला धावून येतील.

लाभात केतू आहे. बहुजन समाजाविषयी प्रेम वाटेल. समाधानी वृत्ती राहील. मान्यता मिळेल.सत्कर्माची फळे लवकर मिळतील. हाती घेतलेली कामे पूर्ण कराल.

स्त्रियांसाठी - द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक आहे.

विद्यार्थ्यांसाठी - विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा - 3, 5, 6, 7, 13, 14, 15, 17, 18, 20, 21, 22, 24

मार्च - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ-शुक्र, -बुध-शनि-प्लूटो, द्वितीयात रवि-गुरू-नेपच्यून, चतुर्थात हर्षल, पंचमात राहू, लाभात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

लग्नी शनि आहे. तीक्ष्ण बुद्धीमुळे अभ्यासू वृत्ती राहील. उद्योगशीलतेत वृद्धी होईल. हिशोबीपणामुळे धनसंग्रह करणे जमेल शिवाय बचतही कराल. स्वमत हट्टाचा जास्त आग्रह करू नये.

धनस्थानी नेपच्यून धनप्राप्तीसाठी नवीन संकल्पनांचे भांडार समोर खुले करेल. अन्य जनांच्या लक्षातही येणार नाही अशा कल्पना असतील. त्या कृतीत आणल्यास ललीतकला, लेखन, वक्तृत्व यापासून द्रव्यलाभ होईल. खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे.

द्वितीयस्थानातील गुरुमुळे विद्वत्तेबद्दल विशेष नावलौकीक होईल. अभ्यास केल्यास वक्तृत्वात विशेष यश मिळेल. शब्दाने लोकांवर हुकूमत गाजवता येईल. आर्थिक आवक विपुल प्रमाणात होईल. द्वितीयात गुरू असणे हा भाग्यवृद्धीचा एक स्वतंत्र योग आहे. कौटुंबिक सुख प्राप्त होईल.

स्त्रियांसाठी - लग्नी शुक्र आहे. सौदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल

विद्यार्थ्यांसाठी - तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा -3, 4, 5, 7, 12, 13, 15, 16, 19, 20, 25, 26, 28

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com