स्वप्रयत्नाने धनप्राप्ती होईल
मकरCapricorn

स्वप्रयत्नाने धनप्राप्ती होईल

त्रैमासिक भविष्य - मकर

ऑक्टोबर - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शनि-गुरू, द्वितीयात नेपच्यून, चतुर्थात हर्शल, पंचमात राहू, नवमात रवि-मंगळ-बुध, व्ययात प्लूटो अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे भो, जा, जी, खी, खू, गा, गी अशी आहेत. राशीचे चिन्ह मगर आहे. राशी स्वामी- शनि, तत्त्व पृथ्वी असल्याने सहनशक्ती चांगली आहे. चर रास असल्याने सतत काही नवीन बदल हवा असे वाटत असते. दक्षिण दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग स्त्री असल्याने स्वभाव सौम्य व तमोगुणी, वातप्रकृती. स्थूलपणा टाळण्यासाठी दररोज हलका व्यायाम करा. राशीचा अंमल गुडघ्यावर आहे. काळजी घ्या. शुभ रत्न-नीलम. शुभ रंग- निळा, आकाशी, पांढरा. शुभ दिवस- शनिवार. देवता- शनि. शुभ अंक- 8, शुभ तारखा- 8/17/26.मित्र राशी- कुंभ, शत्रुराशी- सिंह. उत्तम प्रशासक, कर्तव्यदक्ष, सतत कामात मग्न.

भाग्यातील रविमुळे जनमानसात चांगली प्रतिमा तयार होईल. नावलौकिक वाढेल. बाहेर उदो उदो होईल पण घरातील लोकांना आनंद होण्याऐवजी वाईट वाटेल. उत्साह भंग करण्याचा प्रयत्न करतील. विचारातील जनरेशन गॅपमुळे मातापित्यांशी पटणार नाही.

स्त्रियांसाठी - नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल. गायनवादनादी ललीत कलांमध्ये प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी - तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा - 2, 3, 8, 10, 12, 13, 14, 15, 17, 18, 19, 20, 21, 24,26, 28, 29

नोव्हेंबर - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शुक्र, शनी- प्लुटो, द्वितीयात -नेपच्यून, चतुर्थात हर्षल, पंचमात राहू, दशमात रवि-मंगळ-बुध, लाभात केतू, व्ययात शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

एकादशात बुध आहे. नोकरी, उद्योगाचे स्थान, विद्याव्यासंगात वृद्धी होईल. नावलौकीक वाढेल. अनेेक प्रकारच्या धंद्यात यश येईल. वक्तृत्त्वाला बहर येईल. प्रतिभेच्या परिसस्पर्शाने पुनीत झालेले लेखन लेखकाच्या लेखनीतून उतरेल. सज्जन लोकांची संगत प्राप्त होईल. या सर्वांचा परिणाम म्हणून आर्थिक आवक वाढेल. ती सन्मार्गाने असल्यामुळे तणावरहित असेल.

लग्नी शुक्र आहे. व्यक्तीमत्वाला झळाळी येईल. हरहुन्नरीपणामुळे कोणतेही नवीन आत्मसात केेलेले कामातून धनप्राप्ती कराल.

धनस्थानी असलेल्या नेपच्यून धनप्राप्तीसाठी नवनवीन कल्पनांचे भांडार उघडेल. अन्य जणांच्या लक्षातही येणार नाही अशा कल्पना सुचतील. त्या कृतीत आणल्याने द्रव्यलाभ होतील.

स्त्रियांसाठी - द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक आहे.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. आळस टाळा. गेलेला वेळ परत मिळणार नाही. त्यासाठी वेळेचा अपव्यय करू नका.

शुभे तारखा - 1, 4, 5, 6, 9, 10, 12, 13, 16, 20, 21, 23, 24, 25, 28, 30

डिसेंबर - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शनि-प्लुटो, द्वितीयात गुरु-नेपच्यून, चतुर्थात हर्षल, पंचमात राहू, लाभात रवि-बुध-केतू, व्ययात शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

दशमात मंगळ आहे. इतरांना उत्तम सल्ला देऊ शकाल. त्यातून त्यांचा फायदाही होईल. मात्र स्वतःच्या बाबतीत निर्णय घेणे काहीसे कठीण होईल. आर्थिक स्थिती जेमतेम राहीली तरी खर्चाला पैसे कमी पडणार नाहीत.

द्वितीयातील गुरूमुळे विद्वत्तेबद्दल विशेष नावलौकीक होईल. अभ्यास केल्यास वक्तृत्त्वात नावलौकीक होईल. केवळ शब्दांनी लोेकांवर हुकूमत गाजविता येईल. राजकारणी लोकांना याचा विशेष फायदा होईल. द्वितीयात गुरू असणे हा भाग्यवृद्धीचा एक स्वतंत्र योग आहे. नेहमी आनंदी वृत्ती राहील. कौटुंबिक सुख उत्तम राहील. स्वप्रयत्नाने धनप्राप्ती होईल.

लग्नी शनी आहे. तक्ष्ण बुद्धीमुळे अभ्यासू वृत्ती राहील. उद्योगशीलतेत वृद्धी होईल. हिशोबीपणामुळे धनसंग्रह करणे शक्य हेोईल. शिवाय नियमीत बचत करणे सोपे जाईल. प्रामाणिकपणामुळे नोकरीत उन्नती होईल.

स्त्रियांसाठी - महिलांना पतीचे सहकार्य मिळेल. मात्र कलह टाळण्यासाठी नम्रतेचे पथ्य पाळणे जास्त चातुर्याचे ठरेल. कला कौशल्यात प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परिक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा - 1, 3, 8, 9, 11, 13, 15, 19,े 20, 21,24 , 25, 27, 28

Related Stories

No stories found.