त्रैमासिक भविष्य - मकर Quarterly future - Capricorn

आर्थिक आवक विपूल प्रमाणात होईल
त्रैमासिक भविष्य - मकर Quarterly future - Capricorn
मकरCapricorn

सौ. वंदना अनिल दिवाणे

जुलै - 2021

ग्रहस्थिती- आठवड्याच्या सुरुवातीला राशिस्थानी शनि-प्लुटो, द्वितीयात गुरु-नेपच्यून, चतुर्थात हर्षल, पंचमात राहु-बुध, षष्ठात रवी, सप्तमात मंगळ शुक्र, लाभात केतू अशी ग्रहस्थिती आहे

तुमची रास- राशीची अद्याक्षरे भो, जा, जी, खू, खे, खो जा, जी अशी आहेत. राशी चिन्ह मगर आहे. राशी स्वामी शनि, तत्त्व पृथ्वी असल्याने सहन शक्ती चांगली. चर रास असल्याने सतत काहीतरी बदल हवा असे वाटत राहते. राशी लिंग स्त्री असल्याने स्वभाव सौम्य. तमोगुणी, वात प्रकृती. स्थूलपणा टाळण्यासाठी हलका व्यायाम नियमाने घ्यावा.राशीचा अंमल गुडघ्यावर आहे. गुडघ्याला इजा होऊ नये याची काळजी घ्यावी. शुभरत्न- नीलम, शुभ रंग- निळा, आकाशी, व काळा. शुभ दिवस- शनिवार. देवता- शनि, शुभ अंक -8, शुभ तारखा- 8, 18, 27. मित्रराशी -कुंभ, शत्रु राशी- सिंह. उत्तम प्रशासक कर्तव्यदक्ष. सतत कामात मग्न.

सप्तमात मंगळ आहे कौटुंबिक सुखामध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. अविवाहित तरुण-तरुणींनी प्रेमाच्या भानगडीत पडू नये फसगत होण्याची शक्यता आहे. विवाहित यांनी घरातील कटकटी घरातच मिटवाव्या, व्यापार्‍यांनी सौदे पुढे ढकलावे.

स्त्रियांसाठी - पती पत्नीचे आपापसात प्रेम चांगले राहील. शत्रुसमान नातेवाईकांच्या कारवाया उघडकीस आणण्यास यश मिळेल. काटकसर करा.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. क्लासेसमुळे बरीच धावपळ होईल.

शुभ तारखा -2, 3, 6, 11, 12, 16, 17, 19, 20, 25, 28, 29

ऑगस्ट - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशिस्थानी शनि-प्लूटो, द्वितीयात गुरु-नेपच्यून, चतुर्थात हर्षल, पंचमात मंगळ, सप्तमात रवि-बुध, अष्टमात मंगळ -शुक्र, लाभात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

सप्तमात रवि आहे. प्रामाणिकपणामुळे व्यापार्‍यांना भागीदारीत व नोकरी करणार्‍यांना पदोन्नतीच्या रूपाने लाभ होण्याची योग आहे. पूर्वार्धातील आनंदी वृत्तीला नंतर रागीटपणाचे गालबोट लागू नये याची काळजी घ्यावी. सन्माननीय व्यक्तीशी वादविवाद करण्याची हौस वाटेल. पण बोलण्यात कळत-नकळत अपमान होऊ नये याची काळजी घ्यावी. स्त्री वर्गाशी तर वादविवाद न करणे चांगले.

सभेत किंवा स्पर्धेत विजय मिळेल. लग्नी शनि आहे. तीक्ष्ण बुद्धीमुळे अभ्यासूवृत्ती राहील. उद्योगात वृद्धी होईल. हिशोबीपणामुळे धनसंग्रह करणे तर जमेल. शिवाय नियमित बचत करणे सोपे जाईल. प्रामाणिकपणामुळे नोकरीत उन्नती होईल. भावनिकपणामुळे जनमानसात चांगली छबी निर्माण होईल. स्वमताचा आग्रह करू नये.

पंचमात राहु आहे. स्त्री वर्गाला स्वास्थ हानी होऊन काही विकारांना तोंड द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येण्याचे विचित्र अनुभव येतील.

स्त्रियांसाठी -अष्टमात शुक्र आहे. महिलांना ‘ग‘ ची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष रहातील. कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी - विदयार्थीदशा हा खर म्हणजे जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहिल. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा - 4, 5, 9, 10, 11, 13, 14, 15,19, 20, 22, 25, 26, 27, 28, 30, 31

सप्टेंबर - 2021

ग्रहस्थिती- महिन्याच्या सुरुवातीला राशिस्थानी शनि-प्लुटो-गुरु- नेपच्यून, चतुर्थात हर्षल,पंचमात राहू, अष्टमात रवि मंगळ, नवमात बुध शुक्र, लाभात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीय स्थानातील गुरुमुळे तुमचा विद्वतेबद्दल विशेष नावलौकिक होईल. अभ्यास केल्यास वक्तृत्वात विशेष यश मिळेल. केवळ शब्दाने लोकांवर हुकुमत गाजवता येईल. राजकारणी लोकांना याचा विशेष फायदा होईल आर्थिक आवक विपूल प्रमाणात होईल सुग्रास भोजन प्राप्त होईल. गुरु असणे हा भाग्यवृद्धीचा एक स्वतंत्र योग आहे. नेहमी आनंदी राहाल. कौटुंबिक सुख उत्तम राहील. स्वप्रयत्नाने धनप्राप्ती होईल.

एकादशी स्थानी केतू आहे. पराक्रमाकडे कल राहील. बहुजन समाजाविषयी प्रेम वाटेल. समाधानी वृत्ती राहील. सत्कर्मे कराल मान्यता प्राप्त होईल. हाती घेतलेले काम पूर्ण करा. धनस्थानी असलेला नेपच्यून धनप्राप्तीसाठी नवनविन कल्पनांचे भांडार तुमच्या पुढे करेल. अन्य जनांची लक्षही जाणार नाही अशा कल्पना सुचतील. त्या कृतीत ाणल्याने उद्योगधंदे, ललितकला, कथालेखन, वक्तृत्व यापासून द्रव्य लाभ होईल. खर्चाच्या बाबतीत नियंत्रण आवश्यक आहे

स्त्रियांसाठी - व्यक्तिमत्त्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेंट द्यावीशी वाटेल. पतिराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी - शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा -1, 3, 7, 8, 9, 10, 13, 14, 15, 16, 19, 21, 23, 29, 30

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com