सौ. वंदना अनिल दिवाणे
फेब्रुवारी-2023
महिन्याच्या सुरुवातीला राशी चतुर्थ स्थानी केतू, षष्टात रवि-बुध, सप्तमात रवि-प्लुटो, अष्टमात शुक्र-शनि-नेपच्यून, नवमात गुरू, दशमात राहू-हर्षल, लाभात मंगळ अशी ग्रहस्थितीे आहे.
तुमची रास - राशीची आद्याक्षरे ही,हू,हे,हो,डा,डी,डू,डे अशी आहेत. राशीचे चिन्ह खेकडा आहे. राशी स्वामी- चंद्र, तत्त्व जल, चर राशी असल्यामुळे स्वभाव चंचल आहे. उत्तर दिशा फायद्याची आहे. सत्वगुणी, वर्ण-ब्राह्मण, स्वभाव-सौम्य, कफ प्रवृत्ती, राशीचा अंमल छातीवर आहे. शुभ रत्न-मोती, शुभ रंग- पांढरा, शुभ दिन-सोमवार, शंकराची उपासना फलदायी आहे. शुभ अंक-2, शुभ तारखा-2/11/7/21. मित्र राशी - वृश्चिक, मीन, तुला. शत्रु राशी - मेष, सिंह, धनु. अध्ययनाची आवड, जलप्रिय, भावनाप्रधान, कुशल प्रबंंंंंंंंधक, कल्पनाशील, योजना तयार करण्यात प्रविण, विचारी, परोवकारी, ईश्वरभक्तीत रस. सप्तमस्थानी रवि आहे. थोर सन्माननीय व्यक्मीशी वादविवाद करण्याची हौस वाटेल. पण त्यांचा न कळत अपमान होणार नाही याची काळजी घ्या. स्त्री वर्गाशी वाद न घालणे चांगले राहील.
स्त्रियांसाठी - अष्टमात शुक्र आहे. महिलांना ‘ग‘ ची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष रहातील. कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही.
विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परिक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे राहील.
शुभ तारखा -3, 4, 6, 7, 8, 10, 11, 14, 17, 22, 24, 25, 28

एप्रिल -2023
महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या चतुर्थस्थानी केतू, सप्तमात प्लूटो, अष्टमात शनी, नवमात गुरू-रवि-बुध- नेपच्यून, दशमात शुक्र-राहू-हर्शल, व्ययात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.
दशमात शुक्र हा उत्तम शुभयोग आहे. सर्व प्रकारचे भाग्य चालत येईल. मातृ-पितृ सुख उत्तम राहिल. उद्योग, व्यवसाय, नोकरी सर्वच बाबतीत प्रगती होईल. कमी श्रमात विपुल धनप्राप्ती होईल. बोनस म्हणून मोठेपणाही मिळेल. प्रकृती उत्तम राहील. विलासी साधनांची व सौंदर्याची आवड वाटेल. राजमान्यता मिळेल. प्रकृती उत्तम राहील. नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्यांना मोठ्या अधिकारांची नोकरी मिळेल.
नवमात बुध आहे. पुत्र सुख उत्तम लाभेल. सरळ मार्गाने आर्थिक आवक चांगली राहील . सत्संग व सत्पुषांच्या सेवेचे लाभ होतील. लेखक वर्गाच्या हातून प्रतिभासंपन्न लेखन निर्माण होईल. परदेशगमनाची संधी मिळेल. धार्मिक मते जुन्या वळणाची असूनही नवीन विचार प्रवाहाचे स्वागत कराल.
चतुर्थात केतू असता जवळच्या व्यक्तीच्या मनात मत्सराची आग पेटल्याने अशी व्यक्ती तुमच्या नकळत खाद्यपदार्थातून विषप्रयोग करणार नाही ही काळजी घ्यावी.
स्त्रियांसाठी - दशमातील शुक्र महिलांना किचनमधील गॅस व मुलांच्या अभ्यासातून वेळ काढून अर्थार्जनासाठी व्यापार करण्याचा संदेश देत आहे. लेखिकांना महिलांसंबंधित लेख चांगले जमतील.
विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थीदशा हा खरा तर जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहीेंना सरकारी मदत मिळेल.
शुभ तारखा - 1, 2, 4, 6, 13, 14, 16, 17, 21, 22, 23, 25, 26, 28, 29, 30