Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधसांपत्तिक लाभ होतील

सांपत्तिक लाभ होतील

सौ. वंदना अनिल दिवाणे

नोव्हेंबर – 2022

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या चतुर्थस्थानी रवि-बुध-शुक्र-केतू, सप्तमात शनी-प्लूटो,अष्टमात नेपच्यून, नवमात गुरू, दशमात राहू-हर्षल. व्यात मंगळ अशी ग्रहस्थितीे आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे ही, हू, हे,हो, डा, डी, डू, डे, डो ही आहेत. राशीचे चिन्ह खेकडा आहे. राशी स्वामी चंद्र आहे. तत्त्च- जल, चर राशी असल्याने स्वभाव चंचल. उत्तर दिशा फायद्याची आहे. सत्वगुणी, वर्ण-ब्राह्मण, स्वभाव सौम्य, कफ प्रवृत्ती, राशीचा अंमल छातीवर आहे. शुभ रत्न-मोती, शुभ रंग- पांढरा, किम कलर. शुभ दिन-सोमवार, शंकराची उपासना फायद्याची आहे. शुभ अंक-2, शुभ तारखा- 2/11/20/29. मित्र राशी- वृश्चिक, मीन, तुला. शत्रू राशी- मेष, सिंह, धनु, मिथून, मकर. अध्ययनाची आवड. जलप्रिय, भावनानप्रधान, कुशल प्रबंधक, कल्पनाशील, परोपकारी, विचारी.

चतुर्थात बुध आहे. एकाच उद्योगधंद्यात सारखे काम करीत रहाण्याचा कदाचित कंटाळा येईल. पण तसे करणे फायद्याचे ठरणार नाही. धरसोड वृत्तीमुळे पैसा व वेळ वाया जातो. नातेवाईकांशी पटणार नाही. त्यात पिताश्रींकडून काही मिळण्याची अपेक्षा करू नये.

स्त्रियांसाठी – ग्रहांची चौकट महिलांसाठी चांगली आहे. फॅशनची नवीन वस्त्रे व अलंकार खरेदी यासंबंधी मनासारख्या गोष्टी घडतील. त्यासाठी पतिराजांची उत्तम साथ मिळेल. मुलांंवर नियंत्रण ठेवावे.

विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्ण बुद्धीमत्तेमुळे वार्षिक परीक्षा देेणे जास्त अवघड जाणार नाही. लेखनाचा सराव जेवढा वाढवाल तेवढी टक्केवारी वाढेल.

शुभ तारखा – 2, 3, 5, 6, 10, 12, 13, 14, 17, 20, 26, 28, 29

डिसेंबर – 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशी चतुथस्थानी केतू, पंचमात रवि, षष्ठात बुध-शुक्र, सप्तमात शनि-प्लूटो, अष्टमात नेपच्यून, नवमात गुरू, दशमात राहू-हर्शल, लाभात- मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमात रवि आहे. चंचल बुद्धीमुळे प्रवासास निघावेसे वाटेल. विद्याभ्यासात चंचल बुद्धीमुळे खंड पडेल. काहीही करून पैसा मिळवलाच पाहिजे अशी मनाला ओढ लागेल. त्यासाठी शेअर्स, बिनभरवश्याच्या बँकांत गुंतवणूक कराल. काहींना त्यातून पैसा मिळेलही पण असे व्यवहार जपून करावेत. विनाकारण विषाची परीक्षा घेणे तोट्याचे ठरेल.

षष्ठस्थानी शुक्र आहे. नोकरीपासून सुख मिळेल. आहार विहारात फार जपून रहाल. कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने उच्छश्रृंखलपणा योग्य नाही.

चतुर्थस्थानी केतू आहे. याठिकाणी केतू असता तर पराक्रमी व धनधान्याने युक्त रहाल. सत्यवादी व पराक्रमी असाल. बोलणे गोड, मधुर व आकर्षक राहील.

स्त्रियांसाठी – पतीराजांच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. पती पत्नीमध्ये चांगले पटेल. मतभेद होणार नाहीत. नोकरी करणार्‍या महिलांना चांगला महिना आहे.

विद्यार्थ्यांसाठी – अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परीक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ आणि टी.व्ही.कडे तूर्तास दुर्लक्ष करणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा – 2, 4, 5, 8, 9, 10, 12, 14, 16, 17, 19, 24, 27, 30, 31

जानेवारी – 2023

महिन्याच्या सुरुवातीला चतुर्थस्थानी केतू,षष्ठात रवि-बुध, सप्तमात शनी-शुक्र-प्लूटो, अष्टमात नेपच्यून, नवमात गुरू, दशमात राहू-हर्षल, लाभात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

भाग्यस्थानी गुरू आहे. धार्मिक वृत्ती राहील. लोकांना दिलेला सल्ला त्यांच्यासाठी लाभदायक ठरल्यामुळे उत्तम सल्लागार म्हणून नावलौकीक होईल. त्यामुळे पुष्कळ लोकांचा विश्वास संपादन कराल. जनशक्तीच्या आधारावर आपल्या उद्योग व्यवसायात प्रगती होईल. विद्वान लोकांत गौरव प्राप्त होईल. वृद्धांना तीर्थयात्रा घडतील. देशसेवा घडेल. काटकसरी वृत्ती ठेवल्यास आर्थिक अडचणी येणार नाही. ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्राची आवड वाटेल.

एकादशस्थानी मंगळ आहे. सांपत्तिक लाभ होतील. त्यासाठी मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. मात्र मित्रांची पारख अवश्य करा. काही मतलबी, ढोंगी असण्याची शक्यता आहे.

स्त्रियांसाठी – धार्मिकतेची आवड राहील. बोलताना कटू शब्द वापरण्याचे टाळल्यास घरात तणावरहीत वातावरण राहील. अपघातातून आश्चर्यकारक सुटका होईल. पतीराज तुमच्या शब्दाबाहेर नसतील.

विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यासात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. सध्याच्या क्लास पद्धतीमुळे बरीच धावपळ होईल.

शुभ तारखा – 1, 4, 5, 9, 11, 12, 14, 15, 22, 28, 26, 27

- Advertisment -

ताज्या बातम्या