Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधसांपत्तिक लाभ होतील

सांपत्तिक लाभ होतील

ऑगस्ट – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि- शुक्र, द्वितीयात बुध, चतुर्थात केतू, अष्टमात प्लूटो-शनी, नवमात गुरु-नेपच्यून, दशमात राहू-हर्शल. लाभात मंगळ अशी ग्रहस्थितीे आहे.

- Advertisement -

तुमची रास – राशीची आद्याक्षरे ही, हू, हे, हो, डा,डी, डू, डे, डो अशी आहेत. राशीचे चिन्ह खेकडा आहे. राशी स्वामी चंद्र, तत्त्व-जल, चर राशी असल्याने स्वभाव चंचल, उत्तर दिशा फायद्याची आहे. सत्वगुणी, वर्ण ब्राह्मण, स्वभाव सौम्य, कफ प्रवृत्ती, राशीचा अंमल छातीवर आहे. शुभ रत्न मोती, शुभ रंग पांढरा, शुभ दिन-सोमवार, शंकराची उपासना फायद्याची आहे. शुभ अंक-2, शुभ तारखा- 2/11/21. मित्र राशी- वृश्चिक, मीन, तुला. शत्रु राशी- मेष, सिंह, धनु, मिथून, मकर, कुंभ. अध्ययनाची आवड वाटेल. जलप्रिय, भावनाप्रधान. कुशल प्रबंधक, प्रामाणिक, भावुक, परोपकारी.

लग्नी शुक्र आहे. व्यक्तीमत्वाला झळाळी येईल. हौशी व रंगेल स्वभावाची त्यात भर पडेल. कामात कायम दंग रहाल. हरहुन्नरीपणामुळे कोणतेही नवीन काम आत्मसात करून त्यातून धनप्राप्त कराल. कामात व्यस्त रहाणे आवडेल.

स्त्रियांसाठी -लग्नी शुक्र आहे. सौदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. लेखनाचा सराव जेवढा वाढवाल तेवढी टक्केवारी वाढेल.

शुभ तारखा – 2, 3, 4, 9, 10, 13, 15, 16, 17, 20, 22, 28, 29, 30, 31

सप्टेंबर – 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशीच्या धनेस्थानी रवि- शुक्र, तृतीयात बुध, चतुर्थात केतू, सप्तमात शनी-प्लुटो, नवमात गुरू-नेपच्यून, लाभात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

द्वितीयात रवि आहे. यामुळे वडील मंडळीकडून आर्थिक सहकार्याची शक्यता निर्माण होते. पिताश्रींकडून आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. खर्चिक स्वभावाला अंकुश लावाल. अन्यथा केर्जाचा विचार करावा लागेल. पण यापासून दूर रहा कर्ज घेतलेच असेल तर हप्ते वेळेवर द्या. कुटुंबासाठी दगदग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकादशस्थानी मंगळ आहे. सांपत्तिक लाभ होतील. मित्रांचे सहकार्य उत्तम मिळेल. मात्र चांगल्या मित्रांची पारख करा. सामाजिक कार्याची आवड वाटेल. वाईट संगत टाळा. स्थावर इस्टेटीसंबंधी लाभ होण्याचा संभव आहे.

चतुर्थस्थानी केतू आहे. नातेवाईक व भाऊ बहिणींचे सौख्य नाही. स्थावर मिळकतीसंबंधी वृद्धी झाली तर घटही होणार नाही. याठिकाणी केतू असल्याने पराक्रमी व धनधान्याने युक्त रहाल. सत्यवादी व पराक्रमी असाल. बोलणे, गोड, मधुर व आकर्षक राहील.

स्त्रियांसाठी – द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. विद्येेच्या जोरोवर धनप्राप्ती कराल. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी –विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परिक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा – 1, 4, 7, 8, 10, 11, 12, 14, 17, 21, 22, 26, 27, 30

ऑक्टोबर- 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ, रवि-बुध-शुक्र, चतुर्थात केतू, सप्तमात शनी-प्लूटो, अष्टमात नेपच्यून, नवमात गुरू, दशमात राहू-हर्शल, लाभात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

भाग्यस्थानी गुरू आहे. धार्मिक वृत्ती राहील. लोकांना दिलेला सल्ला यांच्यासाठी उपयोगी व लाभदायक ठरल्यामुळे उत्तम सल्लागार म्हणून नावलौकीक होईल. त्यामुळे पुष्कळ लोकांचा विश्वास संपादन होईल. जनशक्तीच्या आधारावर उद्योग व्यवसायात प्रगती होईल. विद्वान लोकात गौरव प्राप्त कराल. परदेशग केलेल्यांचा भाग्योदय होईल. शक्तीप्रमाणे देशसेवा घडेल. काटकसरी वृत्ती ठेवल्यास आर्थिक अडचणी येणार नाहीत. दिलेल्या सल्ल्याचा उपयोग व्यापाार्‍यांना उलाढाली वाढविण्यासाठी तर नोकरवर्गाला वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी होईल. आर्थिक लाभ होतील.

तृतीयस्थानी बुध आहे. व्यापारी वर्गासाठी चांगला आहे. अनेक मोठ मोठ्या व्यापार्‍यांशी ओळख होईल. आर्थिक आवक वाढेल. भावी घटनांविषयी स्वप्नाद्वारे सूचना प्राप्त होतील. विद्याव्यासंगात भर पडेल. लोकहिताची कामे कराल. व्यापारी लोकांशी मैत्री होईल.

स्त्रियांसाठी – तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.

शुभ तारखा – 3, 4, 5, 8, 10, 11, 17, 18, 19, 21, 24, 26, 30, 31

- Advertisment -

ताज्या बातम्या