कमी श्रमात अधिक धनप्राप्ती

त्रैमासिक भविष्य - कर्क
कमी श्रमात अधिक धनप्राप्ती

फेब्रुवारी - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या पंचमस्थानी केतू, षष्ठात मंगळ-शुक्र , सप्तमात रवि-बुध-शनी-प्लुटो, अष्टमात गुरू-नेपच्यून, दशमात हर्षल, लाभात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो अशी आहेत. राशीचे चिन्ह खेकडा आहे. राशी स्वामी- चंद्र, तत्त्व जल, चर राशी असल्याने स्वभाव चंचल. उत्तर दिशा फायद्याची आहे. सत्व गुणी, वर्ण ब्राह्मण, स्वभाव सौम्य, कफ प्रकृती. राशीचा अंमल छातीवर आहे. शुभ रत्न मोती, शुभ रंग पांढरा. क्रिम कलर. शुभ दिन सोमवार. शुभ अंक-2, शुभ तारखा- 2/11/20/21. मित्र राशी -वृश्चिक, मीन, तुला. शत्रु राशी- मेष, सिंह, धनु, मिथून, मकर, कुंभ. अध्यनाची आवड. जलप्रिय, भावनाप्रधान, कुशलप्रबंधक, कल्पनाशील, योजना तयार करण्यात प्रविण, भावुक, परोपकारी, ईश्वरभक्तीमध्ये रस.

षष्ठात मंगळ आहे. शत्रुंच्या कारवाया हाणून पाडण्याचे सामर्थ्य त्यात आहे. त्यामुळे शत्रुंचा नाश करणे सहज सोपे होईल. स्थावरासंबंधी शुभ घटना घडतील. कुटुंबात निष्कपटपणे वागल्यामुळे कौटुंबिक वातावरण शांत राहील. पंडितजनांशी मैत्री राहील. वेळोवेळी त्यांच्याकडून उत्तम मार्गदर्शन मिळेल.

स्त्रियांसाठी - धार्मिकतेमुळे मानसिक स्वास्थ चांगले राहील. परदेशगमन करणार्‍या महिलांचा भाग्योदय होईल. कलाक्षेत्रात विशेषतः लेखनात चांगले यश. पुत्रसुख उत्तम मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता तीक्ष्ण राहील. त्यामुळे वार्षिक परीक्षा देणे सोपे जाईल. लेखनाचा सराव वाढवल्यास टक्केवारी चांगली येईल.

शुभ तारखा - 3, 5, 6, 7, 13, 14, 15, 17, 18, 20, 21, 22, 24

मार्च - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या पंचमस्थानी केतू, सप्तमात मंगळ-बुध-शुक्र-शनि-प्लूटो. अष्टमात रवि- गुरू-नेपच्यून, दशमात हर्षल, लाभात रा अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमात केतू आहे. हा केतू तुम्हाला धर्माचरणाची ओढ लावेल. उपासनेत चांगले यश मिळेल. आणि संसारात अडचणी येतात. मुलांच्या प्रकृतीविषयी चिंता निर्माण होतील. मोठया मुलांची वागणूक पित्याच्या विरोधात दिसून येते. पत्नीचा चेहरा उतरलेला राहील.

राजकारणी लोकांना काही ना काही त्रास होण्याची संभावना आहे. केतू मांत्रिक विद्येची आवड निर्माण करेल. हलक्या लोकांच्या संगती होण्याची शक्यता आहे.

अष्टमात गुरू आहे. स्वास्थ्य उत्तम राहील. पचनक्रियेसंबंधी किंवा अन्य आजार होण्याची शक्यता आहे. योगासनांना प्राधान्यक्रम द्या. कमी श्रमात अधिक धनप्राप्ती होईल. पण फार मागे लागू नका. अन्यथा लाभ मिळता मिळता राहून जाईल. ढोंगी लोकांच्या नादी लागू नये.

स्त्रियांसाठी - पती पत्नीचे आपापसात प्रेम चांगले राहील. नातेवाईकांच्या गुप्त कारवाया उघडकीय आणण्यात यश मिळेल. काटकसर करा.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.

शुभ तारखा - 3, 4, 5, 7, 12, 13, 15, 16, 19, 20, 25, 26, 28

एप्रिल - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या चतुर्थस्थानी केतू , सप्तमात प्लूटो-शनी, अष्टमात गुरू-मंगळ-शुक्र-नेपच्यून,नवमात रवि-बुध, दशमात हर्शल-राहू अशी ग्रहस्थिती आहे.

भाग्यातील रविमुळे जनमानसात चांगली प्रतिमा तयार होईल. नावलौकिक वाढेल. बाहेर वाह वाह होईल घरातील लोकांना आनंद वाटण्याऐवजी ते तुमचा उत्साह भंग करण्याचा प्रयत्न करतील. माता पित्यांशी जनरेशन गॅपमुळे विचारातील तफावतीमुळे पटणार नाही.

अष्टमात शुक्र आहे. सासरवाडीकडून आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता दर्शवत आहे. धनप्राप्तीच्या बाबतीत दोन गोष्टी लक्षात ठेवा धनप्राप्ती स्वकष्टावर आधारित ठेवा. कमी श्रमात जास्त धन मिळवण्याच्या लालसेने अवैध मार्गाचा अवलंब करू नका.

सप्तमात बुध आहे. विवाहोत्सुकांचे विवाह जुळतील. व्यापार्‍यांना चांगले भागीदार मिळतील. आर्थिक आवक वाढेल. कलाकौशल्यात प्रगती होईल. विनोदी स्वभावामुळे घरात व बाहेर तणाव राहणार नाही.

स्त्रियांसाठी - अष्टमात शुक्र आहे. महिलांना ‘ग‘ ची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष रहातील. कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी-विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परिक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा - 2, 6, 7, 8,10, 11, 13, 14, 15, 17, 21, 24, 26

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com