Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधधनसंग्रहात वाढ होईल

धनसंग्रहात वाढ होईल

मे – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी चतुर्थ स्थानी केतू, सप्तमात प्लूटो, अष्टमात मंगळ-शनी, नवमात गुूरू-शुक्र-नेपच्यून, दशमात रवि-राहू-शुक्र अशी लाभात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

- Advertisement -

तुमची रास – राशीची आद्याक्षरे हा,ही , हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो अशी आहेत. राशीचे चिन्ह खेकडा आहे. राशी स्वामी चंद्र, तत्त्व जल, चर राशी असल्याने स्वभाव चंचल, उत्तर दिशा फायद्याची आहे. सत्वगुणी, वर्ण – ब्राह्मण, स्वभाव-सौम्य, कफ प्रवृत्ती, राशीचा अंमल छातीवर आहे. शुभ रत्न मोती, शुभ रंग- पांढरा, शुभ दिवस-सोमवार, शंकराची उपासना फायद्याची आहे. शुभ अंक-2, शुभ तारखा-2/11/20. मित्रराशी- वृश्चिक, मीन, तुला. शत्रुराशी- मेष, सिंह, धनु, मिथून, मकर. अध्ययनाची आवड. जलप्रिय, भावनाप्रधान, कुशल प्रबंधक. कल्पनाशील योजना तयार करण्यात प्रवीण.

दशमस्थानीतील रविमुळे खात्रीने महत्त्व प्राप्त होईल. विशेषतः राजकारणी लोकांना याची जास्त प्रचिती येईल. साधारणपणे अलीकडील काळात पिता पुत्राचे पटत नाही पण तुमच्या घरातील पिता पुत्र संबंध अपवाद असतील.

स्त्रियांसाठी – यक्तीमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी – मे महिना सुट्टीचा. विद्यार्थी वर्ग शांत बसणार नाही. मनाप्रमाणे खेळात, फिरण्यात, व्यायामात भाग घेऊ शकतील. अभ्यासाचे दडपण दूर राहील.

शुभ तारखा – 1, 3, 4, 6, 7, 9, 10, 11, 13 19, 20, 22, 24, 26

जून – 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानाच्या चतुर्थात केतू, सप्तमात प्लुटो, अष्टमात शनि, नवमात मंगळ-गुरू-नेपच्यून, दशमात शुक्र-राहू- हर्षल, लाभात रवि-बुध अशी ग्रहस्थिती आहे.

एकादशात बुध आहे. राजकृपेेने चांगले लाभ होतील. इष्ट हेतू सिद्धीस जातील. शत्रुंना गोड बोलून वश कराल. संगीताची आवड वाटेल. सभा संमेलनात तेजस्वीपणा दाखवाल. मानसिक उन्नतीला एकादशातील बुध चांगला समजला जातो. त्यातून अध्यात्त्मिक उन्नती साधू शकाल. ज्योतिषशास्त्राची आवड असल्यास त्यात प्रगती होईल.

नवमात मंगळ आहे. स्वभाव काहीसा लहरी व उतावळा राहील. शंकराची उपासना केल्यास या दोषावर नियंत्रण होऊ शकेल. पत्नीच्या नातेवाईकांकडून मदतीसाठी विचारणा होईल.

दशमात शुक्र आहे. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना याची विशेष प्रचिती येईल. राजमान्यता मिळेल. नोकरीच्या प्रतिक्षेत असणार्‍यांना मोठ्या अधिकाराची नोकरी मिळेल.

स्त्रियांसाठी – नातेवाईक व शेजारी यांचे संबंध चांगले राहील्यामुळे महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. गायनवादनादी ललीत कलात प्रगती होईल. कोणतेही काम नीटनेटकेपणाने केल्यामुळे मानसिक समाधान मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परीक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्यादृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा 1, 2, 4, 6, 8, 11, 13, 15, 16, 19, 21, 22, 24, 30

जुलै – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशी तृतीय स्थानी केतू, सप्तमात प्लूटो, अष्टमात शनि, नवमात राहू- गुरू-नेपच्यून, लाभात शुक्र, व्ययात रवि-बुध अशी ग्रहस्थिती आहे.

नवमात गुरू आहे. धार्मिक वृत्ती राहील. लोकांना दिलेला सल्ला लाभदायक ठरल्यामुळे उत्तम सल्लागार म्हणून नावलौकीक होईल. लोकांचा विश्वास संपादन होईल. जनशक्तीच्या आधारावर उद्योग व्यवसायात प्रगती होईल. विद्वान लोकांत गौरव प्राप्त होईल. परदेशगमन केलेल्यांचा भाग्योदय होईल. देशसेवा घडेल. काटकसरी वृत्ती ठेवल्यास आर्थिक अडचण येणार नाही.

तृतीयस्थानी केतू असता भावंडांशी संबंध चांगले राहाणार नाही. आपासपास कलह उत्पन्न होण्याची शक्यता असते. मातेशीही पटणे कठीण जाते. शत्रुंचा नाश होईल. धनसंग्रहात वाढ होईल. याठिकाणी केतू असता भाग्यवृध्दी होते.

स्त्रियांसाठी – महिलांचा स्वभाव प्रेमळ राहील. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती राहील. हे मात्र धोक्याचे राहील. सोने म्हणून पितळ हाती लागण्याचा संभव आहे.

विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.

शुभ तारखा – 1, 2, 7, 8, 15, 18, 20, 21, 24, 29

- Advertisment -

ताज्या बातम्या